Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यHoroscope : रविवार 20 ऑक्टोबर ते शनिवार 26 ऑक्टोबर 2024

Horoscope : रविवार 20 ऑक्टोबर ते शनिवार 26 ऑक्टोबर 2024

Subscribe

मेष :- धंद्यात चांगला निर्णय घेता येईल. फायदा वाढेल. जम बसवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला नव्याने डावपेच तयार करता येतील. घरामध्ये कठीण समस्येवर सर्वानुमते तोडगा काढला जाईल. सभोवतालच्या व्यक्तींची काहीही गरज असो, पण तुम्ही मात्र जीवनाचा आस्वाद घ्यायचा ठरवाल. नोकरीमध्ये एखादे किचकट आणि कंटाळवाणे काम संपण्याची चिन्हे दिसू लागतील. प्रवासात घाई करू नका. वाहन हळू चालवा. आर्थिक सहाय्य मिळवता येईल. कला-क्रीडा स्पर्धेत जिंकाल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांनी आळस सोडून स्वतःची प्रगती करून घ्यावी. योग्य व्यक्तींचा सल्ला आणि सक्रिय मदत मिळेल. शुभ दि. २२, २५

वृषभ :- ज्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागले होते त्यातून बाहेर पडणे हेच तुमच्यापुढील सगळ्यात मोठे उद्दिष्ट असेल. धंद्यातील तणाव, वाद मिटवून नव्याने प्रगती करू शकाल. मोठे काम मिळेल. थकबाकी मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यातील गैरसमज दूर सारून तुम्हाला पुढे जाता येईल. अधिकारप्राप्ती होईल. संसारातील समस्या कमी होईल. प्रकृतीची काळजी घ्या. उदास वाटून घेऊ नका. चिंतन करा. कला-क्रीडा साहित्यात नवीन ओळखीमुळे प्रतिष्ठा वाढेल. नोकरीतील कामे पूर्ण कराल. संशोधनाच्या कामात प्रभाव दिसेल. विद्यार्थी वर्गाने मनमानी करू नये. वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा. मोहाने फसगत होईल. शुभ दि. २४, २६

- Advertisement -

मिथुन :- नोकरीमध्ये ज्या चांगल्या संधींनी तुम्हाला हुलकावणी दिली होती त्याचा तुम्ही पाठपुरावा कराल. तरुणांच्या जीवनात बहार येईल. खरेदीचे बेत पार पडतील. सप्ताहाच्या सुरुवातीला क्षुल्लक अडचणी वाढतील. संयमाने प्रश्न सोडवा. धंद्यात मोठेपणा करू नका. नम्रपणे आपले मत मांडा आणि दुसर्‍याचे मत ऐकून घ्या. आपल्या राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. कायदा पाळा. राग आवरा. प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्याचा विचार मनात डोकावेल. घरातील वृद्ध व्यक्तींची चिंता वाटेल. तुमचा हुरूप वाढेल. विद्यार्थी वर्गाने आजचा अभ्यास उद्यावर टाकू नये. शुभ दि. २०, २५

कर्क :- सप्ताहाच्या मध्यावर धंद्यात सावध राहा. वाद होण्याची शक्यता आहे. भागीदार दबाव आणेल. प्रवासाचा बेत आखाल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव राहील. व्यापार धंद्यामध्ये तुमचे बेत सफल करण्याकरिता पैशांची कुमक निर्माण करावी लागेल. बँक अथवा हितचिंतक तुम्हाला काही प्रमाणात मदत करतील. नोकरीमध्ये तुमच्या मागण्या वरिष्ठांचा मूड बघून त्यांच्यासमोर मांडा. कला-क्रीडा साहित्यात प्रगतीची झेप घेऊ शकाल. आवडत्या छंदामध्ये थोडा वेळ घालवाल. संशोधनात यश मिळेल. कोर्टकेस लवकर संपवा. घरातील व्यक्तीचे मत ऐका आणि नंतर निर्णय घ्या. विद्यार्थी वर्गाने वर्ष फुकट जाऊ देऊ नये. शुभ दि. २३, २४

- Advertisement -

सिंह :- आपण आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने वेळीच त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाजू ठीक असली तरी खर्च वाढणार आहे हे विसरू नका. जागेसंबंधीचे व्यवसाय करणार्‍यांना हा काळ उत्तम असून त्याचा लाभ घेता येईल. थकबाकी वसूल करा. घर, जमीन इत्यादी संबंधी रेंगाळलेले काम करण्याचा प्रभाव दिसेल. सप्ताहाच्या शेवटी वाटाघाटीत क्षुल्लक तणाव होऊ शकतो. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती होईल. घरातील तणाव, गैरसमज दूर कराल. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. कोर्टकेस व्यवस्थित होईल. विद्यार्थ्यांनी मागे राहू नये. शुभ दि. २१, २५,

कन्या :- आपल्या धंद्यात वाढ होईल. मैत्रीत व्यवहार करताना सावध राहा. मोठे कंत्राट मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जवळच्या लोकांना दुखवू नका. वैर वाढवू नका. नोकरीत वर्चस्व राहील. संसारात अडचणी येतील. कला-क्रीडा साहित्यात विचारांना प्रेरणा मिळेल. मोहात फसगत होईल. कोर्टकेस जिंकता येईल. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. बढतीची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाने खाण्याची काळजी घ्यावी. व्यसनाने, वाईट संगतीने नुकसान होईल. आईवडिलांना दुखवू नका. आपली आर्थिक बाजू ठीक राहील. शक्यतो प्रकृतीस्वास्थ्य जपा. आपल्या कर्तृत्वाला अपेक्षित संधी प्राप्त होईल. शुभ दि. २३, २६

तूळ :- आपल्या आत्मविश्वासाने आणि मनोबलाने आपण हाती घेतलेले कार्य पार पाडू शकाल. जागेसंबंधीचे प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक व घरगुती वातावरण छान राहील. प्रवासाचे योग येतील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या कार्यात चमकण्याची संधी प्राप्त होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला काम वाढेल. तणाव होऊ शकतो. अपमानास्पद वागणूक मिळू शकते. संयम बाळगा. धंद्यात लक्ष द्या. प्रयत्नाने काम मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यात कष्ट करावे लागतील. वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. पदाधिकाराचे आश्वासन दिले जाईल. मनाविरुद्ध काम करावे लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्यामध्ये अडचणी येतील. शुभ दि. २१, २५

वृश्चिक :- नोकरी-व्यवसायातील वातावरण ठीक असले तरी आपण चांगल्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा. प्रवासाचे योग येतील व प्रवास सुखकारक होईल. आर्थिक बाजू सावरता येईल. वादाचे प्रसंग टाळा. संयमाने वागा. मित्रमंडळींवर अवलंबून न राहणेच ठीक राहील. धंद्यात मनाप्रमाणे घटना घडणे कठीण आहे. मोठे कंत्राट देण्याचे आश्वासन मिळेल. खर्च वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. तुमच्या अधिकाराचा वापर कराल. बोलणे संयमाचे ठेवा. मैत्री टिकवावी लागेल. संसारात कामे वाढतील. धावपळ होईल. क्षुल्लक वाद, मतभेद वाढवू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. शुभ दि. २४, २६

धनु :- आपले मनोबल आणि आत्मविश्वास वाढीस लागेल. अपेक्षितांकडून सहकार्य मिळू शकेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारणे हितकारक राहील. आर्थिक बाजू ठीक राहील. नको त्या प्रलोभनांना भुलू नका. अचानक प्रवासाचे योग येतील. अडचणीतून मार्ग शोधायचा आहे. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा आठवडा सर्व दृष्टीने चांगला जाईल. धंद्यात कामे मिळवण्याचा प्रयत्न करा. दगदग होईल. प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा संताप वाढेल. घरातील व्यक्ती तुमच्या निर्णयामुळे अस्वस्थ होऊ शकतात. विद्यार्थी वर्गाने स्वतःचे हित पाहावे. मन स्थिर ठेवावे. शुभ दि. २०, २५

मकर :- येणार्‍या अडचणींवर मात करू शकाल. शासकीय कामकाजात यश मिळेल. प्रवासाचे योग येतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तेव्हा वेळीच त्यावर नियंत्रण ठेवा. आपल्या जागेसंबंधीचे प्रश्न मार्गी लागतील. गुंतवणुकीबाबत दिवस चांगले आहेत. आर्थिक बाजू ठीक राहील. संशोधनाच्या कार्यात दिशाभूल होईल. कोर्टाच्या कामात अडथळे वाढतील. भरवशाची व्यक्ती ऐनवेळी टाळाटाळ करेल. अरेरावी करू नका. हातचे काम सोडू नका. प्रयत्नाने यश साध्य करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा, पद मिळेल. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. नोकरीत मनाप्रमाणे बदल करता येईल. संसारातील समस्या सुटेल. गैरसमज होऊ देऊ नका. शुभ दि. २२, २५

कुंभ :- व्यावसायिक उलाढाली वाढीला लागतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. काहींना बढतीचे योगही संभवतात. कला क्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे स्वप्न साकार करता येईल. उत्तम संततीसौख्य लाभेल. राजकीय-सामाजिक कार्यात क्षुल्लक अडचणी येतील. मनाविरुद्ध निर्णय ऐकावा लागण्याची शक्यता आहे. धंद्यात संधी शोधावी लागेल. किरकोळ कारणाने वाद निर्माण होईल. घरात कामाची जबाबदारी वाढेल. तुमचा राग वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीसाठी थांबावे लागेल. गैरसमज दूर होईल. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. विद्यार्थी वर्गाने मनाची एकाग्रता ठेवावी. शुभ दि. २०, २६

मीन :- धंद्यात प्रगती होईल. फायदा वाढेल. ओळखीतून काम मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात वर्चस्व राहील. पदाधिकार मिळेल. समाजकार्यासाठी आर्थिक सहाय्य गोळा करता येईल. कौटुंबिक वातावरण वादविवादाने बिघडणार नाही याची दक्षता घ्या आणि गैरसमज टाळा. प्रकृतीस्वास्थ्य जपा. नको त्या प्रलोभनांपासून दूर राहा. आप्तेष्टांसाठी अधिक खर्च करावा लागेल. घर, जमीन इत्यादीशी संबंधित कामे करून घ्या. कला-क्रीडा-साहित्यात प्रतिष्ठा, पैसा, पुरस्कार मिळेल. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. थकबाकी वसूल कराल. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. विद्यार्थी नव्या दिशेने भरारी घेऊ शकतील. शुभ दि. २३, २४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -