Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार २२ नोव्हेंबर ते शनिवार २८ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य रविवार २२ नोव्हेंबर ते शनिवार २८ नोव्हेंबर २०२०

Related Story

- Advertisement -

मेष :-रविवार तुम्ही ठरविल्याप्रमाणे कामे होतील. महत्त्वाची भेट घेता येईल. धंद्यात आळस करू नका. नातलगांच्या वेळेनुसार तुम्हाला जावे लागेल. वृश्चिक राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात कोणताही व्यवहार करताना स्वतः लक्ष द्या. कायद्याचा विचार करा. संततीच्या प्रगतीमुळे तुम्ही आनंदी रहाल. राजकीय-सामाजिक कार्यात आळस, चालढकलपणा करून चालणार नाही. गुप्त शत्रू तुमचे नावलौकिक बिघडण्याचा प्रयत्न करत राहतील. नोकरीत कामाकडे लक्ष द्या. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.विद्यार्थी वर्गाने अभ्यासक्रम पूर्ण अभ्यासला पाहिजे. शुभ दि. २२, २3

वृषभ :– रविवार मनाविरुद्ध एखादे काम करावे लागेल. खर्च होईल. महत्त्वाची वस्तू सांभाळा. थकवा वाटेल. उदास व्हाल. वृश्चिक राशीत प्रवेश करणारा सूर्य तुमचे सहाय्य करेल. चंद्र गुरु लाभयोग होत आहे. व्यवसायात सुधारणा होईल. संसारात वाद झाला तरी संयमाने प्रकरण हाताळा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीची संधी येईल. थोडी वाट पहा. जवळचे लोक काड्या घालण्याचा प्रयत्न करतील. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट घ्यावे लागतील. संशोधनाच्या कामात दिशाभूल करणार्या लोकांना ओळखून ठेवा. नवीन व्यक्तीबरोबर व्यवहार करण्याची घाई करू नका. विद्यार्थी वर्गाने खाण्याची काळजी घ्यावी. शुभ दि. २6,२7

- Advertisement -

मिथुन :- रविवार तुमचे मनोधर्म तुम्हाला उत्साह देणारे असेल. नातलगांची मदत मिळेल. धंद्यात फायदा होईल. आनंदी वातावरण राहील. वृश्चिक राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात कोणताही निर्णय घेताना विचार करावा. पैशाची गुंतवणूक शेअर्समध्ये करताना योग्य सल्ला घ्यावा. राजकीय-सामाजिक कार्यात मंगळवार, बुधवार अडचणी येतील. कोर्ट केससंबंधी कामात स्वतः लक्ष द्या. बोलताना सावधगिरी बाळगा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. संशोधन कार्यात चौफेर लक्ष द्या. विद्यार्थी वर्गाने वरिष्ठांचा अवमान करू नये. जीवनसाथी, मुले यांच्या सुखासाठी नवीन योजना बनवाल. शुभ दि. २२, २५

कर्क :- रविवार किरकोळ वाद व तणाव होईल. प्रवासात घाई करू नका. शेजारी त्रस्त करण्याची शक्यता आहे. जबाबदारी वाढेल. वृश्चिक राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरु, लाभयोग होत आहे. या सप्ताहात कुठेही काम करताना अडथळे येतील. राग वाढेल. धंद्यात कष्ट घ्यावे लागतील. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांचे मत ऐकावे लागेल. दौर्यात चिंताजनक घटना घडू शकते. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. संशोधन कार्यात यश येईल. पण वाद होतील. विद्यार्थी वर्गाला संयमाने व बुद्धीने वागावे लागेल. कोर्ट केसमध्ये क्षुल्लक प्रक्रिया राहू शकते. शुभ दि. २3,२4

- Advertisement -

सिंह :- रविवार आनंदात, उत्साहात राहील. ठरविलेला कार्यक्रम पूर्ण करू शकाल. आप्तेष्ठांची भेट होईल. आवडते पदार्थ मिळतील. वृश्चिक राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. महत्त्वाचा राजकीय-सामाजिक क्षेत्रातील निर्णय सप्ताहाच्या सुरुवातीला घ्या. दौर्यात यश येईल. संसारात सप्ताहाच्या मध्यावर किरकोळ मतभेद होतील. धंद्यात मोठे काम मिळेल. नोकर वर्गाबरोबर जुळवून घ्या. थकबाकी मिळवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केसमध्ये सावधपणे मुद्दे मांडून यशासाठी झगडावे लागेल. संशोधन कार्यात दिशाभूल होऊ शकते. मुलांनी परीक्षेसाठी चांगला अभ्यास करावा. शुभ दि. २५, २६

कन्या :– रविवार तुमच्या कार्यात यश मिळेल. धंद्यात प्रगती होईल. फायदा वाढेल. नातलगांची भेट घेता येईल. खरेदी कराल. वृश्चिक राशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी तणावाची घटना घडेल. शेजारी त्रस्त करतील. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. लोकांच्यासाठी योजना पूर्वात्वास नेता येईल. आर्थिक सहाय्य मिळेल. धंद्यात मोठे काम मिळेल. प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार, पैसा मिळेल. कोर्ट केस जिंकता येईल. संशोधनात तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत चांगला बदल करता येईल. शुभ दि. २३, २४

तूळ :– रविवार वेगाने कामे होतील. प्रतिष्ठा वाढेल. नवीन लोकांचा परिचय होईल. धंद्यात जम बसेल. आनंदी रहाल. वृश्चिकेत सूर्य प्रवेश चंद्र, बुध, लाभयोग होत आहे. नोकरीत चांगला बदल करण्याची संधी शोधा. संसारात शुभ समाचार मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात सप्ताहाच्या शेवटी उत्साहवर्धक घटना घडेल. योजनांना गती प्राप्त होईल. कला-क्रीडामध्ये चमकाल. मोठे काम मिळेल. धंद्यात कलाटणी मिळेल. कोर्ट केस जिंकाल. जुने-येणे मिळवण्याचा प्रयत्न करा. संशोधनाच्या कार्यात तुमचे वर्चस्व वाटेल. विद्यार्थी वर्गाला प्रगतीची मोठी संधी मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. २२, २३

वृश्चिक :-धंद्यात फायदा होईल. जुने येणे मिळेल. विचारांना चालना देणारी घटना घडेल. उत्साहवर्धक वातावरण राहील. तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश होत आहे. चंद्र, मंगळ युती होत आहे. शेअर्समध्ये झालेले नुकसान हळूहळू भरून काढता येईल. मौल्यवान वस्तू सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात जास्त सहभाग घ्यावा लागेल. नातलगांसाठी धावपळ करावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात, मैत्रीत दुरावा संभवतो. कोर्ट केसमध्ये विचारपूर्वक बोला. पुढे संधी मिळेल. तेव्हा यश मिळेल. परीक्षेसाठी मुलांनी अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. २2,२3

धनु :– रविवार तुमच्या इच्छेनुसार कामे करता येतील. रेंगाळत राहिलेली कामे लवकरच संपवा. धंद्यात वाढ होईल. वृश्चिकेत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. तुमचा उत्साह व आत्मविश्वास टिकून राहिल्यामुळेच तुमची कामे होतील. राजकीय-सामाजिक कार्यात चालढकलपणा केल्यास तुम्हाला धोका होईल. लोकांच्या उपयोगी पडल्यास तेच कार्य तुम्हाला पुढे घेऊन जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन काम मिळेल. कोर्ट केसमध्ये अडचणीतून मार्ग काढता येईल. संशोधन कार्य या सप्ताहात संपवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी चांगली तयारी करावी. घरात तुमच्यावर मोठे काम टाकले जाईल. शुभ दि. २3, २४

मकर :-रविवार कामात अडचणी येतील. वाहन जपून चालवा. राग वाढवणारी घटना घडेल. धंद्यात फसगत होऊ शकते. वृश्चिकेत सूर्याचे राश्यांतर, चंद्र गुरू लाभयोग होत आहे. मंगळवारपासून तुमच्या राजकीय-सामाजिक कार्याला गती जास्त मिळेल. लोकांच्या उपयोगी येतील असे कार्य करा. आपल्या लोकांचा, मुंबईच्या प्रेमाच्या खातर चांगले कार्य करा. धंद्यात सुधारणा होईल. पूर्वी झालेल्या चुका सुधारता येतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन लोकांचा परिचय होईल. नोकरीत बदल करता येईल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. संशोधन कार्यात यश येईल. परीक्षेसाठी नियमित अभ्यास करा. शुभ दि. २६, २७

कुंभ :- रविवार तुमच्या कामात यश येईल. कार्यक्रम ठरविल्यानुसार पूर्ण होईल. जीवनसाथीमुळे यांना खूश करता येईल. धंदा वाढेल. वृश्चिक राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, मंगळ युती होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर राग वाढवणारी घटना घडण्याची शक्यता आहे. वाहनाच्या वेग कमी ठेवा. धंद्यात मोठे काम मिळवण्याची जिद्द ठेवा. थकबाकी वसूल करता येईल. कला-क्रिडा क्षेत्रात नावलौकीकात भर पडेल. कोर्टमध्ये सफल व्हाल. घर घेण्याची संधी मिळेल. विचारांना चालना मिळेल. धंद्यात मोठे काम मिळेल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. संशोधनाच्या कामात वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. शुभ दि. २६, २७

मीन :- रविवार तुमच्या धंद्यात वाढ होईल. धावपळ होईल. पैसा मिळेल. खर्च करताना विचार करा. वाहन जपून चालवा. वृश्चिकेत सूर्य प्रवेश, चंद्र गुरू लाभयोग होत आहे. धंद्यात लक्ष द्या. अनोळखी व्यक्तीवर एकदम विश्वास टाकू नका. घरात वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. वाद तणाव होईल. उदास वाटेल. कोणताही वाद वाढवू नका. या सप्ताहात राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुम्हाला विरोध होईल. तुम्ही श्रद्धा व सबुरी यावर विश्वास ठेवा. काम करत रहा. कला-क्रीडा क्षेत्रात तडजोड स्विकारावी लागेल. अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. २३, २४

- Advertisement -