घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य रविवार २५ डिसेंबर ते शनिवार ३१ डिसेंबर २०२२

राशीभविष्य रविवार २५ डिसेंबर ते शनिवार ३१ डिसेंबर २०२२

Subscribe

मेष : या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र प्रवेश, सूर्य नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. नवे काम मिळवण्यात यश मिळेल. रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. नोकरीत चांगला बदल करण्याचा विचार करा. वरिष्ठांना खूश करता येईल. संसारातील तणाव कमी होईल. मनाप्रमाणे चांगल्या घटना घडतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. नव्या पद्धतीचे डाव टाकता येतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केस यशस्वी होईल. शोध मोहिमेत कौतुक होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. २५, २८

वृषभ ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात गोड बोलून कामे करा. मेहनत जास्त घ्यावी लागेल. नोकरांना दुखवू नका. नोकरीत कायद्याचे पालन करत निर्णय घ्या. वाद वाढवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. आरोप होईल. प्रवासात सावध रहा. घरातील जबाबदारी घ्यावी लागेल. अनुभवी, वृद्ध व्यक्तींचा सल्ला घ्या. कुणालाही कमी समजू नका. स्वतःचा मान जपण्यासाठी नम्रपणे बोला. शोध मोहीम कठीण असेल. स्पर्धेत कष्ट पडतील. शुभ दि. २६, २९

- Advertisement -

मिथुन ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. घरगुती कामात विरोधाला सामोरे जावे लागेल. तुम्ही घरातील व्यक्तींना दुखवू नका. सोमवारपासून तुमची कामे होतील. धंद्यात मोठे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना लवकर गतिमान करा. वेळेला महत्त्व द्या. कला-क्रीडा स्पर्धा जिंकाल. शोध मोहिमेत कौतुकास्पद काम होईल. कोर्ट केस लवकर संपवा. शिक्षणात पुढे जाल. शुभ दि. २७, ३०

कर्क ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात तडजोडीची भूमिका प्रसंगानुरूप ठेवावी लागेल. वाद वाढवल्यास नुकसान होऊ शकते. मेहनत घ्या. काम मिळवा. नोकरांची बाजू ऐकून घ्या. नोकरीमध्ये कामात चूक होईल. सावध रहा. डोके शांत ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात कामाचा व्याप वाढेल. तुमचा मुद्दा प्रभावी ठरणे कठीण आहे. कायदा पाळा, नाहीतर चौकशीच्या जाळ्यात अडकाल. तब्येतीकडे लक्ष द्या. कला-क्रीडा स्पर्धेत मेहनत घ्या. नम्र राहा. शोध मोहिमेत अरेरावी करू नका. शिक्षणात मेहनत घ्या. चांगली संगत ठेवा. शुभ दि. २८, ३१

- Advertisement -

सिंह ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर कामात अडचणी येतील. घरात संताप वाढवणारी घटना घडेल. धंद्यात काम मिळवता येईल. मोठ्या लोकांचे सहाय्य मिळू शकेल. नोकरीत कामात वाढ होईल. तुमची चमक मात्र दिसून येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. विरोधक तुमच्यावर शाब्दिक हल्ला करतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखी होतील. घरातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. शोध मोहिमेत यश खेचून आणता येईल. प्रवासाचा बेत आखाल. कोर्टाच्या कामात मुद्याचे बोला. शिक्षणात पुढे जाल. आळस नको. शुभ दि. २५, २७

कन्या ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र प्रवेश, मंगळ हर्षल षडाष्टक होत आहे. धंद्यात काम मिळवण्यासाठी जास्त खटपट करावी लागेल. मैत्रीत तणाव, गैरसमज होऊ शकतो. जवळच्या व्यक्तीची चिंता राहील. थकबाकी मिळवणे सोपे नाही. नोकरीत वरिष्ठांच्या मतानुसार कामे करा. राजकीय-सामाजिक कार्यात कायद्याचे पालन करा. शब्द जपून वापरा. कला-क्रीडा क्षेत्रात संधी थोडक्यात हुकण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या कामात बेसावध राहू नका. आर्थिक व्यवहारात फसगत होऊ शकते. शोध मोहिमेत गोड बोलून इतरांचे मन राखा. शिक्षणात आळस नको. पोटाची काळजी घ्या.
शुभ दि. २६,२८

तूळ ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र प्रवेश, सूर्य नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यातील कामे वेळच्या वेळी पूर्ण करा. नवे काम मिळवा. क्षुल्लक अडचणींचा बाऊ करत राहू नका. नोकरीत कामाचा ताण वाढला तरी वर्चस्व राहील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्याशी विनाकारण स्पर्धा करण्याचा प्रयत्न होईल. प्रतिष्ठा व लोकप्रियता तुम्हाला मिळेल. घरातील कामे होतील. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. केस कठीण वाटली तरी यश मिळेल. शोध मोहीम फत्ते होईल. गोड बोला. शिक्षणात ध्येय समोर ठेवा. आळस नको.
शुभ दि. २७, २९

वृश्चिक ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. धंद्यात जम बसवता येईल. नवीन ओळखीतून काम मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. चांगला बदल करण्याचा योग शोधा. घरातील कामे वेळीच पूर्ण करा. प्रेमाला चालना मिळेल. इच्छुकांना लग्नासाठी प्रयत्न करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व राहील. विरोधकांच्या विचारांना धुडकावता येणार नाही. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शोध मोहीम यशस्वी कराल. केस जिंकता येईल. शिक्षणात विद्यार्थ्यांचे मनोरथ पूर्ण होईल. शुभ दि. २८, ३०

धनु ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र प्रवेश, सूर्य नेपच्यून लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला आहे. रागावर ताबा ठेवा. मत प्रदर्शित करताना सावध राहा. धंद्यात वाढ करता येईल. जुना धंदा सुधारता येईल. नोकरीतील समस्या कमी होईल. प्रवासाचा बेत आखाल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात परिचय होतील. तुम्हाला मदत मिळेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. स्पर्धा जिंकाल. शोध मोहीम फत्ते होईल. कोर्टातील केसला दिशा मिळेल. शिक्षणात यश मिळवाल. शुभ दि. २९, ३१

मकर ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र प्रवेश, चंद्र शुक्र केंद्रयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात काम मिळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. प्रसंगी एखादी तडजोड स्वीकारावी लागेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. इतरांच्या चुका सुधाराव्या लागतील. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. खर्च वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात मत व्यक्त करताना फार विचार करा. तटस्थ धोरण योग्य राहील. कोर्ट केसमध्ये किचकट वाद होतील. कला-क्रीडा स्पर्धेत टिकणे महत्त्वाचे आहे. शोध मोहिमेत धावपळ होईल. परीक्षेसाठी उत्तम तयारी करा. शुभ दि. २५, २६

कुंभ ः- या सप्ताहात तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. धंद्यात मोठा लाभ होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक आत्ताच करा. नोकरीत चांगला प्रभाव पडेल. बदल करता येईल. घरातील तणाव कमी होईल. वाहन, घर खरेदी करता येईल. अविवाहितांना लग्नाचा विचार करणे योग्य ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा मुद्दा गाजेल. प्रतिष्ठा मिळेल. कला-क्रीडा स्पर्धेत पुरस्कार मिळेल. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात मोठे यश मिळवता येईल. प्रेमाला चालना मिळेल. शुभ दि. २६, २७

मीन ः- या सप्ताहात कुंभ राशीत शुक्र प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. तुमची सर्व महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात फायदा होईल. काम पूर्ण करून घ्या. प्रवासाचा बेत आखाल. मैत्रीत वाद वाढवू नका. घरातील कामे वाढतील. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. सहकारी, नेते यांना समजून घ्या. कला-क्रीडा-स्पर्धेत प्रसिद्धी मिळेल. मोठ्या ओळखीतून काम मिळेल. केस जिंकाल. शोध मोहीम गाजेल. घर, जमीन खरेदी-विक्री करता येईल. शिक्षणात प्रगतीचा नवा मार्ग शोधता येईल. परदेशात जाता येईल. शुभ दि. २७, २८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -