Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य : रविवार २५ ऑगस्ट ते शनिवार ३१ ऑगस्ट २०२४

राशीभविष्य : रविवार २५ ऑगस्ट ते शनिवार ३१ ऑगस्ट २०२४

Subscribe

मेष ः- अनेक अडचणींवर मात करता येईल. सहकार्‍यांची मदत मिळू लागेल व बर्‍याच प्रमाणात अपेक्षित यश मिळवता येईल, मात्र अनोळखी व्यक्तींवर विश्वास न टाकणेच हितकारक राहील. तुमची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. प्रगतीचा नवा टप्पा तुमच्या कार्यात तुम्हाला गाठता येईल. प्रयत्न करा. आपल्या जोडीदाराच्या मताचा सदैव आदर करा. धंद्यात जम बसवण्याचा नवा प्रयत्न करा. मागील शिल्लक वसूल होईल. नोकरीतील समस्या कमी होईल. संसारात शुभ समाचार मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला-क्रीडा स्पर्धेत नावलौकिक मिळेल. शोधकार्यात वरिष्ठ खूश होतील. शिक्षणात उत्तम प्रगती कराल. शुभ दि. २७, ३०

वृषभ ः- प्रश्नांची भेंडोळी सुटू लागतील. घरगुती वातावरण चांगले राखता येईल. जबाबदारी वाढेल. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. जवळच्या व्यक्तीचा विरह होण्याचा संभव आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने वेळीच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. कोणताही वाद जास्त वाढवू नका. कोणीही संकटात केलेली मदत विसरू नका. मन खंबीर असले म्हणजे कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करता येतो. धंद्यात समस्या होईल. मोठे काम मिळाले तरी सावधपणे निर्णय घ्या. नोकरीत कायद्याचे पालन करा. शोधमोहीम कठीण वाटेल. संसारात सर्वांकडून मदत मिळेल. शिक्षणात आळस करू नका. शुभ दि. २६, २८

- Advertisement -

मिथुन ः- प्रगतीचा नवा मार्ग खुला होईल. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनाला कलाटणी मिळेल. मागील अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न कराल. धंद्यात वाढ करता येईल. नवीन ओळखी होतील. त्याचा उपयोग होईल. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रसिद्धी मिळेल. विरोधकांच्या कारवायांवर नजर ठेवा. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हितकारक राहील. प्रकृतीची काळजी घ्या. शोधमोहीम फत्ते कराल. शिक्षणात चांगली प्रगती कराल. संसारातील कामे कराल. सर्वांना खूश कराल. शुभ दि. २९, ३१

कर्क ः- आपणास संमिश्र स्वरूपाचे अनुभव येतील. सुख-दुःख जीवनाला जोडलेले असतात. तुमच्या क्षेत्रात टिकून राहण्याचा प्रयत्न करा. नातेसंबंध जपा. कोणताही अतिरेक नको. कलाक्षेत्राला चांगला वाव मिळेल. कौटुंबिक जीवनातील प्रश्नांना सामोपचाराने सामोरे जावे लागेल. कायदा पाळा. कोणालाही कधीही कमी लेखू नका. धंद्यात तडजोड करण्याची वेळ आपल्यावर येईल. अरेरावीमुळे आपलेच नुकसान होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी नेहमी सावधपणे काम करा. कला-क्रीडा स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न करा. घरात तणाव व चिंता राहील. खर्च वाढेल. शोधमोहीम सोपी नाही. पोटाची काळजी घ्या. शुभ दि. २५, २९

- Advertisement -

सिंह ः- तुमच्या कार्याचा ठसा उमटवता येईल. आर्थिक स्थिरता येईल. कठीण कामे करून घ्या. नवीन ओळखीतून तुमच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे काम मिळेल. हाती घेतलेल्या कामाला गती मिळू शकेल. नावलौकिक वाढेल. कोर्ट केस संपवा. एकदा हाती घेतलेले काम कधीही अर्धवट सोडू नका. धंद्यातील तणाव कमी करता येईल. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. आपल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल. मोठे काम मिळवा. नोकरीत बदल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्याची सुरुवात दमदार होईल. रागावर ताबा ठेवा. दगदग होईल. शोधमोहिमेत चमकाल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. घरातील समस्या सोडवाल. शुभ दि. २८, ३०

कन्या ः- जीवन जगताना चतुराई उपयोगात आणा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. आपण काही धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कायद्याचे पालन करूनच व्यवहार करा. आपली प्रतिष्ठा जपा. आपल्या प्रकृतीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. आपल्या धंद्यात संमिश्र स्वरूपाचे वातावरण राहील. वसुली होणे थोडे कठीण वाटेल. गोड बोलून कामे करा. संसारात क्षुल्लक तणाव होऊ शकतो. अचानक खर्च वाढू शकेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आपले दुरावलेले नातलग जवळ येतील. राजकीय-सामाजिक कार्यात विलंबाने का होईना पण अधिकारप्राप्ती होऊ शकते. शोधमोहिमेत कष्ट जास्त होतील. चिकाटी सोडू नका. शुभ दि. २५, ३०

तूळ ः- आर्थिक बाजू सुधारण्याची संधी मिळू शकेल. वेळेला महत्त्व द्या. आळस सोडून तुमचे ध्येय गाठा. कठीण प्रश्न रेंगाळत ठेवू नका. तुमचा विकास होईल. गुप्त कारवाया ओळखून ठेवा. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना सावध राहा. धंद्यात जम बसेल. वसुली लवकर करा. कोर्ट केस संपवा. संसारात शुभ समाचार मिळेल. नोकरीत जम बसेल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती मिळेल. अधिकार मिळेल. आपल्या निर्णय प्रक्रियेला गती मिळेल. काही जुनी येणेही वसूल होण्याची शक्यता राहील. शोधमोहीम फत्ते कराल. कला-क्रीडा-शिक्षणात प्रगती कराल. कामाची उलाढाल नेहमीप्रमाणे चालूच ठेवा. शुभ दि. २६, २७

वृश्चिक ः- वैवाहिक जोडीदाराच्या एखाद्या निर्णयाने येणार्‍या प्रसंगांना आनंदाने सामोरे जाल. नवे आव्हान स्वीकारावे लागेल. तुमच्या क्षेत्रात तुम्ही मोठे यश मिळवाल. आर्थिक बाजू सावरता येईल. तुमचे सोनेरी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर करा. कठीण कामे करून घेता येतील. ओळखी वाढतील. या सप्ताहात जमाखर्चाचे गणित नीट बसवावे लागेल. प्रत्येक दिवस यशाकडे नेणारा आहे. धंद्यात वाढ होईल. मोठे काम मिळवाल. नोकरीत अपेक्षेनुसार प्रगती कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जवळच्या लोकांची नाराजी होऊ शकते. कला-क्रीडा-शिक्षणात पुढे जाल. प्रयत्न करा. कोर्ट केस जिंकाल. शुभ दि. २५, २८

धनु ः- वैवाहिक व कौटुंबिक जीवनात होणारे मतभेद सुधारण्याचा प्रयत्न करा. जुन्या चुकांची दुरुस्ती करण्याची हीच वेळ आहे. तुमच्या कार्याला नवी दिशा मिळेल. प्रगतीचे नवे दालन खुले होईल. मागील अपयश पुसून टाका. नवे कार्य आरंभ करा. तुमचे क्षेत्र तुम्हाला गाजवता येईल. गुरुबल तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. नेहमी आपल्या रागावर ताबा ठेवा. जुनी येणी वसूल कराल. घरातील समस्या कमी होतील. नोकरीतील ताण कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीचा नवा टप्पा काबीज करता येईल. स्पर्धेत चमकाल. प्रवासाचा बेत आखाल. वाहन जपून चालवा. कामाचा उत्साह वाढीला लागेल. मुलांचे विशेष प्रेम लाभेल. शुभ दि. ३०, ३१

मकर ः- घेतलेले निर्णय प्रत्यक्षात आणताना मिळणारा मदतीचा हात मोलाचा ठरेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित अशा गोष्टी साध्य करणे शक्य होईल. आपल्या बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नवे शिकावयास मिळेल. उतावळेपणाने कोणताही निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीचा विरह संभवतो. संयम व खंबीरपणा यामुळेच सप्ताहात पुढे जाता येईल. शेतीविषयक कामाला चालना मिळेल. मित्र मदत करतील. नोकरीत कामात चूक करू नका. कायदा पाळा. राजकीय-सामाजिक कार्यात अतिरेक नको. मोठ्या अपेक्षा न ठेवता दैनंदिन व्यवहार सुरू ठेवा. प्रतिष्ठा सांभाळा. स्पर्धा करताना मेहनत घ्या. प्रकृतीची पथ्ये पाळा. शुभ दि. २६, २९

कुंभ ः- आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगल्यास यशाची वाटचाल करणे शक्य होईल. नोकरी-व्यवसायात आपली छाप पाडू शकाल. नोकरी-धंद्यात तुम्हाला स्थिर होता येईल. प्रतिष्ठा वाढेल. जीवनाला योग्य वळण देता येईल. वैवाहिक जीवनात काही मतभेद असण्याची शक्यता राहील, पण ते सामोपचाराने सोडवावेत. पैशांची गुंतवणूक विचारपूर्वक करा. धंद्यात सुधारणा होईल. जम बसेल. मागील येणे वसूल कराल. नोकरीत बढती होईल. संसारात शुभ समाचार मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. कठीण काम करून घ्या. केस जिंकाल. शोधमोहीम यशस्वी होईल. विद्यार्थी वर्गाने चिकाटी सोडू नये. शुभ दि. २५, २७

मीन ः- बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सफलता मिळू शकते. प्रवासाचे योग येतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. वैवाहिक, कौटुंबिक जीवनात चांगले निर्णय घेता येतील. ओळखी होतील. मान-सन्मान मिळेल. जीवन मार्गी लावता येईल. घर, वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. घरातील सदस्यांचे मतही तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकेल. धंद्यात फायदा होईल. मोठे काम मिळेल. घरातील लोकांना दुखवू नका. मैत्रीत गैरसमज होईल. नोकरीत प्रगतिकारक बदल होऊ शकेल. दानधर्म व पुण्यकर्माचा आनंद घेता येईल. नको त्या प्रलोभनात मात्र अडकू नका. स्पर्धेत यश येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. शुभ दि. २७, ३०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -