Homeभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यHoroscope : रविवार 26 जानेवारी ते शनिवार 1 फेब्रुवारी 2025

Horoscope : रविवार 26 जानेवारी ते शनिवार 1 फेब्रुवारी 2025

Subscribe

मेष ः- ज्येष्ठांच्या सहकार्याने पुढे जाऊ शकाल. प्रवासाचे बेत साध्य होतील, परंतु प्रवासात सावधानता बाळगा. घरगुती वादाचे प्रसंग कटाक्षाने पाळा. नवी आव्हाने स्वीकारू नका. प्रकृतीमान ठीक असले तरी खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. वैवाहिक जोडीदाराची मदत बहुमोल राहील. सध्याची परिस्थिती आहे ती कायम ठेवण्याच्या प्रयत्नांना प्राधान्य देणे योग्य ठरेल. आपली आर्थिक बाजू ठीक राहील. काही जुने येणे येण्याची शक्यता आहे. तुमचे गुंतवणूक निर्णय विचारपूर्वक करा. आर्थिक बाबतीत चांगला काळ आहे. काही नवीन व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. प्रेम जीवनात सामंजस्य राखणे हितावह ठरेल. शुभ दि. २८, ३१

वृषभ ः- आर्थिक बाबतीत नवे निर्णय घेणे आवश्यक ठरेल. प्रेम आणि नातेसंबंधांसाठी हा महिना चांगला ठरू शकतो, मात्र कामाच्या बाबतीत चुकता चुकता शिकायला मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात काही आव्हानांचा सामना करावा लागेल. तुम्ही चांगल्या शारीरिक व मानसिक स्थितीत असाल. तुमच्या जोडीदारासोबत गोड संवाद साधा. मानसिक ताण टाळण्यासाठी अधिक विश्रांती घ्या. नव्या खरेदीचे बेत साध्य होतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. सरकारी नियम पाळा. प्रकृतीबाबत जागरूक राहा. जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. प्रलोभनांपासून दूर राहा. शुभ दि. २६, ३०

मिथुन ः- तुमचं व्यावसायिक जीवन सुसंगत व यशस्वी होईल. घराच्या बाबतीत थोडा संघर्ष होऊ शकतो, पण त्यातून काही शिका आणि परिस्थितीला अनुकूल करा. कुटुंबातील लोकांसोबत संवाद आणि विचारांची देवाण-घेवाण महत्त्वाची असेल. काही गुंतवणूक निर्णय चांगले सिद्ध होऊ शकतात. तुमच्या प्रेम जीवनात प्रगल्भता येईल, पण सामंजस्य साधणे आवश्यक आहे. आपल्या बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या. नोकरदारांना बराचसा दिलासा मिळेल. अचानक प्रवासाचे योग संभवतात. अनावश्यक खर्च टाळा. सध्या नव्या गोष्टी न करणेच आपल्यासाठी इष्ट राहील. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. शुभ दि. २९, १

कर्क – तुमच्या करियरमध्ये यश मिळवण्यासाठी अधिक समर्पणाची आवश्यकता आहे. आत्मविश्वासात वृद्धी होऊन इतरांशी उत्तम संवाद साधता येईल. नवीन अनुभव मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावध राहा. कामकाजात प्रगती होईल. प्रेम व नातेसंबंधांमध्ये सामंजस्य ठेवा. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे व वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. व्यापाराला चालना मिळेल. शिक्षण क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नव्या नात्यांशी संबंध चांगले राहतील. जोडीदाराच्या प्रश्नांकडे लक्ष पुरवावे लागेल. शुभ दि. ३०, १

सिंह ः- आपल्या मनातील इच्छा पूर्णत्वास येऊ शकेल, मात्र त्यासाठी मेहनत आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सावध राहा. प्रवासाचे योग येतील. कोर्टाच्या कामात तडजोडीचे धोरण स्वीकारावे. घरगुती वातावरण चांगले राहील. आपले प्रकृतीमान ठीक राहील. वैवाहिक जोडीदाराचे व ज्येष्ठांचे सहकार्य उपयोगी ठरेल. कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्यांचे समाधान करण्यासाठी योग्य उपाय शोधा. मानसिक शांततेची आवश्यकता आहे. आर्थिक बाबतीत स्थिरता असेल. नवीन उत्पन्न स्रोत शोधण्यासाठी आता योग्य वेळ आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आपणास व्यावसायिक फायदा संभवतो. शुभ दि. २७, ३०

कन्या ः- योग्य व्यक्तीच्या सहवासाने केलेली वाटचाल आपल्याला प्रगतीकडे निश्चितपणे घेऊन जाऊ शकेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात जैसे थे परिस्थिती ठेवणेच योग्य ठरेल. घरगुती वादविवादात अडकून न पडता येणार्‍या प्रश्नांना तयारीने सामोरे जाण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत बढतीचे वारे वाहू लागतील. आपल्या आवडीचे काम मिळण्याची संधी प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रातील आपले अंदाज अचूक निघतील. आप्तेष्ठांच्या गाठीभेटीचे योग येतील. नात्यात अधिक प्रगल्भता येईल. तुमचं प्रेम आणि समर्पण अधिक दृढ होईल. तुमच्या दृष्टिकोनात स्पष्टता येईल. आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करा. शुभ दि. २९, ३०

तुळ ः- आपल्या आत्मविश्वासात भर पडेल. सहकार्‍यांकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. नको त्या प्रलोभनात अडकू नका. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. व्यवसायवाढीसाठी नवे करार करता येतील. यशाचा मार्ग अवघड आहे हे विसरून चालणार नाही आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. एखादी चिंता सतावण्याची शक्यता राहील. नेहमी संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीमान ठीक राहील. जोडीदाराचे म्हणणे योग्य ठरेल. ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता कामकाजात स्वयंसिद्ध होणे हितकारक राहणार आहे. आर्थिक व्यवस्थापनावर अधिक लक्ष द्या. नात्यात अनावश्यक वाद टाळा. शुभ दि. २६, २७

वृश्चिक ः- कौटुंबिक जीवनात सामंजस्य राखणे महत्त्वाचे आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल आणि तुमच्यावर अधिक जबाबदारी येऊ शकते. काही मोठ्या निर्णयांची आवश्यकता असेल. सामाजिक आणि व्यावसायिक बाबतीत प्रगती होईल. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही अधिक संवेदनशील राहू शकता. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि तुमच्या कार्यात यश मिळू शकेल. कामाच्या बाबतीत काही नवीन उद्दिष्टे सेट करा. तुमचं करियर प्रगतीच्या दिशेने जाईल. विचारांची स्पष्टता आणि मानसिक संतुलन महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये जास्त मेहनत आणि प्रयत्नांची आवश्यकता असेल. शुभ दि. २८,१

धनु ः- नोकरी-व्यवसायातील स्थैर्यासाठी आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेणेच उचित ठरेल. आपल्या अंगी असलेल्या सहनशीलतेचा योग्य उपयोग करून घेता येईल. आर्थिक व्यवहारात अधिक लक्ष घालून फायदा कसा जास्त होईल याकडे लक्ष पुरवावे. घरगुती वादाच्या प्रसंगाचे बाहेर पडसाद पडणार नाहीत याची दक्षता घ्या. काही अडथळे येणार हे गृहित धरूनच कामाची आखणी करावी लागेल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. धार्मिक कार्यात अधिक रस घ्याल. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात राहणे आवडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. शुभ दि. २६, ३०

मकर ः- खर्चावर योग्य नियंत्रण ठेवणे हितकारक ठरू शकेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. नोकरदारांना बराचसा दिलासा मिळेल. कला क्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे बेत साध्य होतील. कौटुंबिक वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. विरोधकांवर नजर ठेवून त्यांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्या. वैवाहिक जोडीदाराची मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा. नको त्या प्रलोभनात अडकू नका. प्रकृतीची पथ्ये पाळा. कामात एकाग्रपणा ठेवा. मुलांकडून शैक्षणिक क्षेत्रातील सुवार्ता समजतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. मोठ्या अपेक्षा न ठेवता आहे ते कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करा. शुभ दि. २९, ३०

कुंभ ः- प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच होईल अशी धारणा बाळगणे योग्य होणार नाही. परिस्थितीनुसार आवश्यक तेथे तडजोडीचे धोरणच उपयोगी पडू शकते. हितशत्रूंबाबत सध्या चिंता करण्याचे कारण नाही. घरगुती वातावरण चांगले राहील. आपले टीमवर्क चांगले राहील. प्रवासाचे योग येतील. आरोग्याबाबत जागरूक राहावे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. आपल्या कलागुणांना, कौशल्याला चांगली संधी प्राप्त होऊ शकेल. आर्थिक बाजू सावरता येईल. कोर्टाची कामे सध्या लांबणीवर टाका. नोकरीत काही नव्या जबाबदार्‍या येण्याची शक्यता राहील. विचारांत सुसंगती राखणे आवश्यक ठरेल. शुभ दि. २६, २७

मीन ः- धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. यशासाठी गोड बोलून कार्यभाग साधणे हितकारक ठरणार आहे. नोकरी व्यवसायात प्रगती संभवते. आवक वाढण्याची शक्यता असली तरी अनावश्यक खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनातील प्रश्नांवर मार्ग काढता येईल. प्रकृतीची पथ्ये पाळा. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. कोर्टकचेरीच्या कामात विलंब संभवतो. आप्तेष्ठांच्या गाठीभेटीचे योग येतील. मानसिक स्थिती बिघडणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींशी वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. प्रवास कराल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. मोठ्या निर्णयांची आवश्यकता भासू शकते. शुभ दि. २८, ३०