मेष :- ठरवल्याप्रमाणे कामे होतील. मनावरील ओझे उतरल्याने प्रसन्नता अनुभवाल. तब्येतही उत्तम असेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. महत्त्वाची भेट घेता येईल. धंद्यात आळस करू नका. नातलगांच्या वेळेनुसार तुम्हाला जावे लागेल. धंद्यात कोणताही व्यवहार करताना स्वतः लक्ष द्या. कायद्याचा विचार करा. संततीच्या प्रगतीमुळे तुम्ही आनंदी राहाल. राजकीय-सामाजिक कार्यात आळस, चालढकलपणा करून चालणार नाही. गुप्त शत्रू तुमचा नावलौकिक बिघडवण्याचा प्रयत्न करतील. नोकरीत कामाकडे लक्ष द्या. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासक्रम पूर्ण अभ्यासला पाहिजे. शुभ दि. 30,2
वृषभ :- कौटुंबिक वातावरण आनंदी, उत्साही असेल. त्यामुळे शरीर आणि मनाला वेगळाच तजेला मिळेल. प्रतिस्पर्धी किंवा हितशत्रूंना हुशारीने नामोहरम कराल. आर्थिक लाभाचे शुभसंकेत असून प्रलंबित कामेही पूर्ण होऊ शकतील. मनाविरुद्ध एखादे काम करावे लागेल. खर्च होईल. महत्त्वाची वस्तू सांभाळा. व्यवसायात सुधारणा होईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीची संधी येईल. जवळचे लोक कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट घ्यावे लागतील. संशोधनाच्या कामात दिशाभूल करणार्या लोकांना ओळखून ठेवा. नवीन व्यक्तीबरोबर व्यवहार करण्याची घाई करू नका. शुभ दि. 28,29
मिथुन :- तुमचे मनोधैर्य तुम्हाला उत्साह देणारे असेल. नातलगांची मदत मिळेल. धंद्यात फायदा होईल. आनंदी वातावरण राहील. धंद्यात कोणताही निर्णय घेताना विचार करावा. पैशांची गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्यावा. राजकीय-सामाजिक कार्यात क्षुल्लक अडचणी येतील. संसारात वाद झाला तरी संयमाने प्रकरण हाताळा. नकारात्मक विचारांचे मळभ मनातून दूर करा. रागावर आणि जिभेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. संशोधनाच्या कार्यात चौफेर लक्ष द्या. विद्यार्थी वर्गाने वरिष्ठांचा अवमान करू नये. जीवनसाथी, मुले यांच्या सुखासाठी नवीन योजना बनवाल. शुभ दि. 27,1
कर्क :- कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असल्याने मन प्रसन्न राहील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. आर्थिक फायदाही संभवतो. प्रवासात घाई करू नका. शेजारी त्रस्त करण्याची शक्यता आहे. जबाबदारी वाढेल. सरकारी कामात क्षुल्लक अडथळे येतील. राग वाढवू नका. धंद्यात कष्ट घ्यावे लागतील. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांचे मत ऐकावे लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. ध्यानधारणा केल्यास मन शांत राहील. संशोधन कार्यात यश येईल, पण वाद होतील. विद्यार्थी वर्गाला संयमाने व बुद्धीने वागावे लागेल. अभ्यासाकडे लक्ष द्यावे. कोर्ट केसमध्ये क्षुल्लक प्रक्रिया राहू शकते. शुभ दि. 29,1
सिंह :- कुटुंबीयांसोबत एखाद्या सामाजिक कार्यक्रमासाठी बाहेर जाणे होईल. व्यापारी वर्गासाठी उद्योग-व्यवसायाला चालना देणार्या घडामोडी घडतील. ठरवलेला कार्यक्रम पूर्ण करू शकाल. आप्तेष्टांची भेट होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. महत्त्वाचा राजकीय-सामाजिक क्षेत्रातील निर्णय सप्ताहाच्या सुरुवातीला घ्या. दौर्यात यश येईल. संसारात सप्ताहाच्या मध्यावर किरकोळ मतभेद होतील. धंद्यात मोठे काम मिळेल. नोकरवर्गाबरोबर जुळवून घ्या. थकबाकी मिळवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केसमध्ये सावधपणे मुद्दे मांडून यशासाठी झगडावे लागेल. मुलांनी परीक्षेसाठी चांगला अभ्यास करावा. शुभ दि. 27,1
कन्या :- तुमच्या कार्यात यश मिळेल. धंद्यात प्रगती होईल. फायदा वाढेल. नातलगांची भेट घेता येईल. खरेदी कराल. सप्ताहाच्या शेवटी तणावाची घटना घडेल. शेजारी त्रस्त करतील. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. लोकांसाठी योजना पूर्णत्वास नेता येईल. कुणाशीही वादविवाद, भांडणे टाळा. त्यातून तुम्हालाच मनःस्ताप होऊ शकतो. खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घ्या. तब्येत ठीकठाक असेल. आर्थिक सहाय्य मिळेल. धंद्यात मोठे काम मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार, पैसा मिळेल. कोर्ट केस जिंकता येईल. संशोधनाच्या कामात कौतुक होईल. शुभ दि. 28,31
तूळ :- आपण ठरवलेली कामे वेगाने होतील. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल. नवीन लोकांचा परिचय होईल. धंद्यात जम बसेल. आनंदी राहाल. नोकरीत चांगला बदल करण्याची संधी शोधा. संसारात शुभ समाचार मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात सप्ताहाच्या शेवटी एखादी उत्साहवर्धक घटना घडेल. काही माणसांच्या वागण्यामुळे विनाकारण डोकेदुखी वाढेल. बोलताना शब्द जपूनच वापरा. खर्च वाढण्याची शक्यता आहे. योजनांना गती प्राप्त होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. मोठे काम मिळेल. धंद्यात कलाटणी मिळेल. कोर्ट केस जिंकाल. जुने-येणे मिळवण्याचा प्रयत्न करा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 28,1
वृश्चिक :- आपल्या विचारांना चालना देणारी घटना घडेल. उत्साहवर्धक वातावरण राहील. व्यवसायात झालेले नुकसान हळूहळू भरून काढता येईल. धंद्यात फायदा होईल. जुने येणे मिळेल. मौल्यवान वस्तू सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात जास्त सहभाग घ्यावा लागेल. नातलगांसाठी धावपळ करावी लागेल. मैत्रीत दुरावा संभवतो. कोर्ट केसमध्ये विचारपूर्वक बोला. आपणास पुढे संधी मिळेल. संशोधन कार्यात दिशाभूल होऊ शकते. भावा-बहिणींसोबतच्या नात्यात गोडवा येईल. एखादा छोटा प्रवासही संभवतो. साहित्य किंवा अन्य कलेत मन रमवा. परीक्षेसाठी मुलांनी अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. 29,31
धनु :- आपल्या इच्छेनुसार कामे करता येतील. रेंगाळत राहिलेली कामे लवकरच संपवा. धंद्यात वाढ होईल. तुमचा उत्साह व आत्मविश्वास टिकून राहिल्यामुळेच तुमची कामे होतील. राजकीय-सामाजिक कार्यात चालढकलपणा केल्यास तुम्हाला धोका होईल. खाण्यापिण्याच्या सवयी थोड्या त्रासदायक ठरू शकतात. रागाचे प्रमाणही अधिक असेल. लोकांच्या उपयोगी पडल्यास तेच कार्य तुम्हाला पुढे घेऊन जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन काम मिळेल. कोर्ट केसमध्ये अडचणीतून मार्ग काढता येईल. संशोधन कार्य या सप्ताहात संपवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी चांगली तयारी करावी. शुभ दि. 27,2
मकर :- घरात तुमच्यावर मोठे काम टाकले जाईल. आपल्या लोकांच्या प्रेमाखातर चांगले कार्य करा. धंद्यात सुधारणा होईल. पूर्वी झालेल्या चुका सुधारता येतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. एखाद्या कामात यशस्वी होण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागेल. त्यामुळे थोडा थकवा आणि कंटाळा आल्यासारखे वाटेल. नवीन लोकांचा परिचय होईल. नोकरीत अपेक्षित बदल करता येईल. वाहन जपून चालवा. राग वाढवणारी घटना घडेल. धंद्यात फसगत होऊ शकते. तुमच्या राजकीय-सामाजिक कार्याला गती मिळेल. लोकोपयोगी कार्य कराल. कोर्ट केस लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. संशोधन कार्यात यश येईल. शुभ दि. 31,2
कुंभ :- आर्थिक बाजू सावरता येईल. कोर्टकचेरीच्या कामात सफलता जाणवेल. अध्ययनात प्रगती व यश मिळवता येईल. नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. गोड बोलण्याने आपल्या कार्यात सहजता मिळेल. मानसिकता बिघडणार नाही याची दक्षता घ्या. प्रगतीत क्षुल्लक अडथळे येतील. नको त्या प्रलोभनात अडकू नये. आर्थिक लाभ संभवतो. कार्यक्रम ठरवल्यानुसार पूर्ण होईल. सप्ताहाच्या मध्यावर राग वाढवणारी घटना घडण्याची शक्यता आहे. धंद्यात मोठे काम मिळवण्याची जिद्द ठेवा. थकबाकी वसूल करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिकात भर पडेल. शुभ दि. 27,1
मीन :- आपल्या अंगी असलेल्या कर्तृत्वाला वाव मिळेल. जागेचे प्रश्न, कौटुंबिक समस्यांतून मार्ग काढता येईल. भावनाप्रधान न राहता वस्तुस्थितीचा विचार करून वागण्याचा प्रयत्न करावा. नोकरी, व्यवसाय, राजकारण, कला क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. तुमच्या धंद्यात वाढ होईल. वाहन जपून चालवा. अनोळखी व्यक्तीवर एकदम विश्वास टाकू नका. आर्थिक व्यवहारात सतर्क राहा. आपलेच घोडे पुढे दामटू नका. संयम, सामंजस्य, समजूतदारपणा यांचा योग्य समन्वय साधा. श्रद्धा आणि सबुरीवर विश्वास ठेवून काम करीत राहा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. 30,2