घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार २८ मे ते शनिवार ३ जून २०२३

राशीभविष्य रविवार २८ मे ते शनिवार ३ जून २०२३

Subscribe

मेष : या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, बुध युती होत आहे. धंद्यात चांगला निर्णय घेता येईल. फायदा वाढेल. जम बसवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला नव्याने डावपेच तयार करता येईल. मान मिळेल. यशस्वी आठवडा राहील. प्रवासाचा बेत आखाल. प्रवासात घाई करू नका. वाहन हळू चालवा. आर्थिक सहाय्य मिळवता येईल. संसारातील समस्या कमी होईल. घरात चांगली बातमी मिळेल. कला-क्रीडा स्पर्धेत जिंकाल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. विद्यार्थ्यांनी आळस सोडून स्वतःची प्रगती करून घ्यावी. परदेशात जाण्याची संधी मिळेल.
शुभ दि. २८, १

वृषभ : या सप्ताहात चंद्र, बुध युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. धंद्यातील तणाव, वाद मिटवून नव्याने प्रगती करू शकाल. मोठे काम मिळेल. थकबाकी मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यातील गैरसमज दूर सारून तुम्हाला पुढे जाता येईल. अधिकार प्राप्ती होईल. संसारातील समस्या कमी होईल. प्रकृतीची काळजी घ्या. उदास वाटून घेऊ नका. चिंतन करा. कला-क्रीडा साहित्यात नवीन ओळखीमुळे प्रतिष्ठा वाढेल. काम मिळेल. नोकरीतील कामे पूर्ण कराल. संशोधनाच्या कामात प्रभाव दिसेल. मनाप्रमाणे बदली करून घेता येईल. विद्यार्थी वर्गाने मनमानी करू नये. वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा. मोहाने फसगत होईल. शुभ दि. २९, २

- Advertisement -

मिथुन : या सप्ताहात चंद्र, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी वाढतील. संयमाने प्रश्न सोडवा. धंद्यात मोठेपणा करू नका. नम्रपणे मत सांगा व दुसर्‍याचे मत ऐकून घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या कार्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. कायदा पाळा. राग आवरा. घरातील वृद्ध व्यक्तींची चिंता वाटेल. नोकरीत वरिष्ठांना दुखवू नका. संशोधनाच्या कामात जास्त मेहनत घ्यावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात अतिरेकी वागणे टाळा. नम्र रहा. कोर्टकेस सोपी नाही. योग्य असेल तेच बोला. विद्यार्थी वर्गाने आजचा अभ्यास उद्यावर टाकू नये. शुभ दि. ३०, ३

कर्क : या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर धंद्यात सावध रहा. वाद होईल. भागीदार दबाव आणेल. प्रवासाचा बेत आखाल. प्रवासात घाई करू नका. वाहन हळू चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव राहील. कोणतेही वक्तव्य वादग्रस्त होईल त्यामुळे सावध बोला. म्हणजे महत्त्व टिकेल. पद मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. कला-क्रीडा साहित्यात प्रगती घेऊ शकाल. संशोधनात यश मिळेल. कोर्टकेस लवकर संपवा. घरातील व्यक्तीचे मत ऐका आणि नंतर निर्णय घ्या. विद्यार्थी वर्गाने वर्ष फुकट जाऊ देऊ नये.
शुभ दि. २८, ३१

- Advertisement -

सिंह : या सप्ताहात चंद्र, बुध युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात मोठे काम मिळवा. समस्या सोडवा. थकबाकी वसूल करा. घर, जमीन इत्यादी संबंधी रेंगाळलेले काम करण्याचा प्रभाव दिसेल. वाटाघाटीत क्षुल्लक तणाव सप्ताहाच्या शेवटी होऊ शकतो. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती होईल. घरातील तणाव, गैरसमज दूर करा. पुढे कठीण होईल. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. कोर्टकेस व्यवस्थित होईल. विद्यार्थ्यांनी मागे राहू नये. चांगली संगत ठेवावी. नोकरीत प्रगती होईल. शुभ दि. २९, १

कन्या : या सप्ताहात चंद्र, बुध युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताह यशाचा ठरेल. धंद्यात वाढ होईल. मैत्रीत व्यवहार करताना सावध रहा. मोठे कंत्राट मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जवळच्या लोकांना दुखवू नका. वैर वाढवू नका. नोकरीत वर्चस्व राहील. संसारात अडचणी येतील. कला-क्रीडा साहित्यात विचारांना प्रेरणा मिळेल. मोहात फसगत होईल. कोर्टकेस जिंकता येईल. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. बढतीची शक्यता. विद्यार्थी वर्गाने खाण्याची काळजी घ्यावी. व्यसनाने, वाईट संगतीने नुकसान होईल. आई-वडिलांना दुखवू नका.
शुभ दि. ३०, २

तूळ : या सप्ताहात चंद्र, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काम वाढेल. तणाव होऊ शकतो. अपमानास्पद वागणूक मिळू शकते. संयम बाळगा. धंद्यात लक्ष द्या. प्रयत्नाने काम मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यात कष्ट करावे लागतील. वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. पदाधिकाराचे आश्वासन दिले जाईल. नोकरीत कामाचा ताण राहील. मनाविरूद्ध काम करावे लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्यामध्ये अडचणी येतील. तुमच्याशी स्पर्धा होईल. संशोधनाच्या कामात अरेरावी करू नका. प्रेमाने वागा. मार्ग मिळेल. विद्यार्थी वर्गाने वडील माणसांच्या, गुरूजनांच्या बरोबर नम्रपणे वागावे. शुभ दि. ३१, ३

वृश्चिक : साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात मनाप्रमाणे घटना घडणे कठीण आहे. मोठे कंत्राट देण्याचे आश्वासन मिळेल. खर्च वाढेल. वाद वाढवू नका. शांत डोके ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. तुमच्या अधिकाराचा वापर कराल. बोलणे संयमाचे ठेवा. मैत्री टिकवावी लागेल. संसारात कामे वाढतील. धावपळ होईल. क्षुल्लक वाद, मतभेद वाढवू नका. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नोकरीत सहकारी सहकार्य दर्शवतील. संशोधनाच्या कामात स्वतःच जास्त लक्ष द्या. विद्यार्थी वर्गाने नाराज होऊ नये. जिद्द ठेवा. राग नको. शुभ दि. २८, ३०

धनु : या सप्ताहात चंद्र, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. साडेसातीचा मधला टप्पा सुरू आहे. या सप्ताहात अडचणीतून मार्ग शोधावयाचा आहे. धंद्यात कामे मिळवण्याचा प्रयत्न करा. दगदग होईल. प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. दुखापतीची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा संताप वाढेल. घरातील व्यक्ती तुमच्या निर्णयामुळे अस्वस्थ होऊ शकतात. नोकरीत सामान्य स्थिती राहील. संशोधनाच्या कार्यात दिशाभूल होईल. कोर्टाच्या कामात अडथळे वाढतील. भरवशाची व्यक्ती ऐनवेळी टाळाटाळ करेल. विद्यार्थी वर्गाने स्वतःचे हित पहावे. मन स्थिर ठेवावे. शुभ दि. २९, ३१

मकर : या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर धंद्यात अडचण येईल. वाद होईल. हातचे काम सोडू नका. प्रयत्नाने साध्य करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा, पद मिळेल. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. नोकरीत मनाप्रमाणे बदल करता येईल. संसारातील समस्या सुटेल. जमीन, घर यासंबंधी कामे करून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मोठे काम मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. प्रश्न वाढवू नका. संशोधनाच्या कामात यश मिळेल. गैरसमज होऊ देऊ नका. विद्यार्थी वर्गाने परीक्षेचा आळस करू नये. पुढे परीक्षा देऊ असा विचार नको. वेळेला महत्त्व द्या. शुभ दि. ३०, १

कुंभ : या सप्ताहात चंद्र, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. मनाविरुद्ध निर्णय ऐकावा लागण्याची शक्यता आहे. धंद्यात संधी शोधावी लागेल. किरकोळ कारणाने वाद निर्माण होईल. थोडा पोटाचा त्रास संभवतो. घरात कामाची जबाबदारी वाढेल. नोकरीत वरिष्ठ तुमची बाजू घेण्याचे टाळतील. तुमचा राग वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीसाठी थांबावे लागेल. गैरसमज होईल. संशोधनाच्या कामात धावपळ जास्त होईल. योग्य मार्गदर्शन मिळणे कठीण राहील. विद्यार्थी वर्गाने मनाची एकाग्रता ठेवावी. यश मिळेल याचा विचार करावा. मेहनत घ्यावी. शुभ दि. ३१, २

मीन : या सप्ताहात चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात प्रगती होईल. फायदा वाढेल. ओळखीतून काम मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात वर्चस्व राहील. पदाधिकार मिळेल. समाजकार्यासाठी आर्थिक सहाय्य गोळा करता येईल. संसारात सुखद घटना घडेल. जीवनसाथीची निवड करता येईल. घर, जमीन इत्यादी कामे करून घ्या. शेअर्समध्ये फायदा होईल. कला-क्रीडा साहित्यात प्रतिष्ठा, पैसा, पुरस्कार मिळेल. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. थकबाकी वसूल करा. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. नोकरी मिळेल. विद्यार्थी नव्या दिशेने भरारी घेऊ शकतील. शुभ दि. १, ३

- Advertisment -