Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यHoroscope : रविवार 29 सप्टेंबर ते शनिवार 5 ऑक्टोबर 2024

Horoscope : रविवार 29 सप्टेंबर ते शनिवार 5 ऑक्टोबर 2024

Subscribe

मेष – शिक्षण, राजकारण या क्षेत्रात प्रगती साधता येईल. धंद्यात चांगला फायदा होईल. मोठे काम मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यातील तणाव कमी होईल. वरिष्ठांबरोबर चर्चा करू शकाल. सप्ताहाच्या शेवटी घरगुती समस्या येईल. क्षुल्लक वाद वाढवू नका. कला-क्रीडा क्षेत्रात तडजोड करण्याची वेळ येईल. प्रसिद्धी मिळेल. नोकरीत प्रगती होईल. संशोधनाच्या कामात दिशा मिळेल. डोळ्यांची काळजी घ्या. अचानक खर्च निर्माण होईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यास करावा. मौजमजा कमी करावी. वरिष्ठांची नाराजी पत्करू नका. कामकाजात अधिक लक्ष द्या. आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. शुभ दि. ३, ५

वृषभ – कार्यक्षेत्रातील उलाढाली वाढवू शकाल. आपली शान जपता येईल. वैचारिक बाबतीत आत्मविश्वास वाढीस लागेल. पैसे सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांबरोबर राहून काम करावे लागेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी. संसारात मिळतेजुळते धोरण ठेवा. वाद वाढवू नका. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मैत्रीत मतभेद होईल. नोकरीत बदल करता येईल. संशोधनाच्या कामातील अडचणी दूर होतील. कोर्टकेस संपवता येईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये. सत्य गोष्टी लपवू नयेत. नियम व कायदा यांचे पालन करावे. शुभ दि. ३०, ३

- Advertisement -

मिथुन – संयम, प्रयत्न, गुप्तता यांची सांगड घालणे आवश्यक राहणार आहे. धंद्यात सावधपणे बोलणी करा. व्यवहार करताना फसगत संभवते. रागावर ताबा ठेवा. चांगला मित्र मदत करेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला बोलताना मोजून-मापून बोलावे लागेल. अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याने वाटाघाटीत तडजोड करावी लागेल. अरेरावी चालणार नाही. आपले प्रलंबित व्यवहार मार्गी लावता येतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढणार आहे. प्रश्नांची सोडवणूक करता येईल. प्रगतीची वाटचाल करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. नवीन ओळखीतून काम मिळू शकेल. शुभ दि. १, २

कर्क – व्यापार, कला, साहित्य, नोकरी, विज्ञान अशा क्षेत्रांत प्रगती करता येईल. प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. धंद्यात जम बसेल. आपणास मोठे काम मिळेल. मागील येणे वसूल करा. नोकरीत बदल होऊ शकेल. नोकरीत वाकड्या वाटेने जाऊन निर्णय घेणे घातक ठरेल. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळेल. वाटाघाटीत फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. उत्साह वाढेल. घरातील कामे होतील. गैरसमज दूर करता येईल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. संशोधनाच्या कामात यश येईल. विद्यार्थी वर्गाला आपल्या प्रगतीचा मार्ग मिळेल. शुभ दि. १, ५

- Advertisement -

सिंह – राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा उत्साह, खंबीरपणा लोकांना दिसेल. यश मिळेल. थोड्या कमी प्रमाणात असला तरी महत्त्वाचा निर्णय साध्य करता येईल. धंद्यात मागे राहू नका. मोठे कंत्राट मिळेल. आपल्या अधिकाराचा गैरवापर टाळावा. थकबाकी वसूल करा. घरात शुभ समाचार मिळेल. जमिनी, घर, यासंबंधी कामे करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवा परिचय चांगला वाटेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. आपल्या कार्याला नवी दिशा मिळेल. कोर्ट केस जिंकाल. दूरच्या प्रवासाचे बेत ठरवाल. शुभ दि. ३०, ४

कन्या – कामाचा उत्साह द्विगुणित होईल. आपल्या कार्याची आखणी करून कामाचे वेळापत्रक ठरवता येईल. आपले व्यावहारिक आणि वैचारिक क्षेत्र विकसित होईल. खरेदीचे बेत साध्य करता येतील. क्षुल्लक गोष्टीवरून घरात कलह निर्माण होऊ शकतो. मनावर दडपण येईल. अस्थिर व्हाल. धंद्यात प्रगती करता येईल. मागील येणे सावधपणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला वेगळेच महत्त्व दिले जाईल. ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा होती तेच लोक मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात नाव होईल. जुनी मैत्री तुटण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल करता येईल. संशोधन कार्यात यश मिळेल. कौतुक होईल. शुभ दि. २, ५

तुला – आर्थिक बाजू सावरता येईल. घरासंबंधीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. काही वेळा संशयाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता राहील. सरळ मार्गच स्वीकारा. सप्ताहाच्या मध्यावर प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात हिशोब नीट करा. धावपळ होईल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. घर, वाहन खरेदी-विक्री करताना भावनेच्या आहारी जाऊ नका. कौटुंबिक प्रश्नांना प्राधान्य द्याल. राजकीय-सामाजिक कार्यात अधिकारासाठी विलंब होऊ शकतो. प्रतिष्ठा टिकवण्यासाठी सहनशीलता ठेवा. घरात पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. एखादा निर्णय घेताना मनाचा गोंधळ होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. मैत्री वाढेल. शुभ दि. ३, ४

वृश्चिक – महत्त्वाची चर्चा, देवघेव करता येईल. आपला धंदा वाढेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. राजकीय-सामाजिक कार्यात पदाधिकार मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. जवळचे लोक नाराज होण्याची शक्यता आहे. संसारात तुमच्यावर नाराज झालेले लोक आरोप करू शकतात, मात्र हे सर्व तात्पुरते असेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. आश्वासन मिळेल. वाहन जपून चालवा. संशोधन कार्यात यश मिळेल. प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. कोर्ट केसमध्ये प्रतिष्ठा पणाला लागेल. विद्यार्थी वर्गाने मैत्रीपेक्षा ध्येयावर लक्ष द्यावे. परदेशात जाण्याची संधी मिळेल. घर, जमीन, वाहन खरेदी कराल. शुभ दि. २९, ३

धनु – आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवून आपल्या योजनांना पुढे सरकवता येईल. साहसी कृत्ये मात्र टाळा. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रकृतीकडे अधिक लक्ष द्या. तुमचे मन खंबीर राहील. मित्र, नातलग कठीण काळात मदत करतील. तरीही दुसर्‍यावर जास्त विसंबून राहू नका. नोकरीत तणाव होईल. कायद्याचे योग्य ते पालन करावे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. संशोधनाच्या कामात दिशाभूल होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील व त्यांच्यातर्फे सहकार्यही मिळेल. व्यवहारात मात्र नेहमी सावध राहा. आपल्या कार्यशक्तीला चालना मिळेल. आपल्या कार्याचा प्रभाव दिसून येईल. गाठीभेटीचे योग येतील. शुभ दि. १, ५

मकर – राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. तुम्हाला आश्वासन मिळेल. संसारात किरकोळ मतभेद होतील. गुप्त कारवायांना रोखता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. मागील येणे वसूल होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला मनस्ताप होईल. त्यानंतर योग्य दिशा तुम्हाला मिळेल. आपणास अनेक चांगले-वाईट अनुभव येतील. बोलताना, चर्चा करताना काळजी घ्या. कामात चौफेर लक्ष द्या. धंद्यात प्रश्न सोडवाल. मोठे काम मिळेल. नोकरीत चांगला बदल करता येईल. संशोधनाच्या कामात सहाय्य मिळेल. कौतुक होईल. कठीण कामे लवकर करून घ्या. विद्यार्थी वर्गाने आपल्या अंगी नम्रता बाळगावी. शुभ दि. २९, ३०

कुंभ – अनुकूल परिस्थिती लाभल्याने आपला उत्साह द्विगुणित होईल. आवडत्या क्षेत्रात चमकण्याची संधी मिळेल. मनाप्रमाणे खरेदी करता येईल. क्रीडा क्षेत्रात सफलता मिळेल. गाठीभेटीचे योग येतील. चर्चा करताना तणाव होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे इतरांना फारसे प्रभावी वाटणार नाहीत. प्रसंगी वाटाघाटीत तडजोड करावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात आपण कौतुकास पात्र ठराल. कामात दिरंगाई होईल. संशोधनाच्या कामात विचारांचा गोंधळ होऊ शकतो. नोकरीत कामाचा व्याप वाढू शकतो. घरगुती कामे होतील. विद्यार्थी वर्गाला कसून मेहनत घेतल्यास यश मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. २, ५

मीन – सरकारी नियम, अधिकाराचा दुरुपयोग, उधार-उसनवारी, करार यांसारख्या गोष्टींबाबत अधिक दक्ष राहा. तुमच्यावर विश्वास दाखवला जाईल. आपल्या कार्यक्षेत्रात गोड बोलून आपले हित साधावे. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवा परिचय होईल. संशोधनात जिद्दीने यश मिळेल. धंद्यात कामासाठी धावपळ होईल. क्षुल्लक कारणाने संताप वाढेल. जवळचे लोक मदत करतील. आत्मविश्वास अधिक बळकट होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व असले तरी सावधगिरी बाळगा. नोकरीत आपल्यावर कामाचा ताण राहील. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवावा. कोर्ट केस जिंकाल. घरातील जबाबदारी वाढेल. शुभ दि. १, ४

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -