राशीभविष्य रविवार ३ एप्रिल ते ९ एप्रिल २०२२

Weekly Horoscope Future Sunday 12th June to Saturday 18th June 2022
राशीभविष्य

मेष ः- या सप्ताहात मोठा ग्रह गुरू धनुराशीत प्रवेश करीत आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल. चंद्र बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील अडचणी कमी करता येतील. मागील येणे वसूल करा. घरातील व्यक्तींची मदत तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल. नोकरीत वरिष्ठांना नाराज करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात समजूतदारपणे वागा. अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नका. यश मिळवता येईल. कला-क्रीडा साहित्यात प्रगतीची संधी मिळेल. संशोधनाच्या कामात सरकारी मदत करतील. प्रकृतीकडे दुलर्क्ष करू नका. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने गुंतवणूक करता येईल. विद्यार्थ्यांनी नम्रपणे वागावे. शुभ दि. 3, 5

वृषभ ः- या सप्ताहात गुरू महाराज धनुराशीत प्रवेश करीत आहे. सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात अडचणींवर मात करावी लागेल. नवीन काम मिळवता येईल. स्वतः मेहनत घ्या. घरातील समस्या वाढू देऊ नका. नोकरीत जम बसवा. राग वाढू शकतो. प्रवासात दुखापत संभवते. काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सहकारी, नेते यांना प्रेमाने सांभाळून ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. साहित्याला नवा विषय मिळेल. कोर्टकेसमध्ये मोठ्या लोकांची मदत घेता येईल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये.
शुभ दि. 4, 7

मिथुन ः-या सप्ताहात गुरू महाराज धनुराशीत प्रवेश करीत आहे. बुध नेपच्यून युती होत आहे. तुमच्या समस्या सोडवण्यात गुरू महाराज मदत करतील. धंद्यात जम बसेल. ताणतणाव सप्ताहाच्या मध्यावर होईल. घरातील व्यक्तीसाठी, मुलांच्यासाठी चांगला निर्णय घेता येईल. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. तुम्ही केलेली योजना वरिष्ठांना आवडेल. नोकरीत बढती, बदली मनाप्रमाणे होण्याचे शक्यता आहे. संशोधनाच्या कामात धावपळ झाली तरी यश मिळेल. वाहन जपून चालवा. विद्यार्थी वर्गाने परीक्षेसाठी सर्व नीट तयारी करावी. यश मिळेल. परदेशात जाण्याची संधी कला-क्रीडा क्षेत्रात मिळेल. शुभ दि. 5, 6

कर्क ः-धनु राशीत मोठा ग्रह गुरू याचे राश्यांतर या सप्ताहात होत आहे. सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. सरळ होणारे काम अडचणीत येऊ शकेल. धंद्यात वाढ होईल. फसवणूक होणार नाही याकडे लक्ष द्या. नोकरवर्गाकडून मनस्ताप होऊ शकतो. प्रेमाने कोणतीही समस्या हाताळावी लागेल. घरातील वाद चव्हाट्यावर येऊ शकतो. वाटाघाटीत नाराजी-तणाव होईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व टिकवून ठेवा. बोलताना नीट विचार करा. भलता मोह तुम्हाला अडचणीत टाकू शकतो. संशोधनाचे काम नीट होईल. विरोधक गोड बोलून तुमचे गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांनी ध्येयावर लक्ष द्यावे. शुभ दि. 4, 5

सिंह ः- या सप्ताहात गुरू महाराज धनु राशीत प्रवेश करीत आहे. तुम्हाला त्याचे सहाय्य मिळेल. बुध नेपच्यून युती होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. ओळखीतून काम मिळेल. विरुद्धलिंगी व्यक्तीची मदत येईल. मोठेपणाचा दावा कुठेही करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांचा दबाव राहील. गोड बोलून तुम्हाला तुमचे हित साधावे लागेल. अनुभवी माणसांचा सल्ला उपयुक्त ठरेल. सर्वांना मानाने वागवा व त्याचा मोबदला द्या. संशोधनात त्रास वाटेल. कला-क्रीडा-साहित्यात ओळखी होतील. प्रसिद्धीसाठी हटून बसू नका. ती पुढे मिळेल. विद्यार्थ्यांनी प्रगतीचा विचार करून मोठ्या माणसांचे विचार ऐकावेत. शुभ दि. 3, 7

कन्या ः- या सप्ताहात गुरू महाराज धनु राशीत प्रवेश करीत आहे. सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात तुमच्या बाजूने असलेल्या लोकांना सांभाळून ठेवा. या सप्ताहात महत्त्वाची कामे करून घेता येतील. थकबाकी वसूल करा. घरातील तणाव कमी होईल. घर घेण्याचा शोध पूर्ण होऊ शकेल. व्यवहार सावधपणे करा. राजकीय-सामाजिक प्रसंगानुरूप निर्णय घ्या. तुमचे महत्त्व टिकवता येईल. सहकारी, नेते यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यांना कमी समजू नका. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. कला-क्रीडा क्षेत्रात मतभेद होईल. प्रगती होऊ शकेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. विरुद्धलिंगी व्यक्तीपासून कटकटी होतील. व्यसन नको. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा. यश येईल. शुभ दि. 8, 9

तुला ः-या सप्ताहात धनु राशीत गुरू महाराज प्रवेश करीत आहे. बुध नेपच्यून युती होत आहे. तुमच्या धंद्यात चांगली वाढ होईल. योग्य सल्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. जुने येणे वसूल करा. नवीन ओळखीचा उपयोग तुमच्या कामात करून घ्या. घरातील वातावरण आनंदी ठेवता येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात मान मिळेल. तुमचे चाहते लोक तुमच्या पाठीशी असतील. रागावर नियंत्रण ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. प्रसिद्धी मिळणे कठीण वाटेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल. विद्यार्थी वर्गाने वडीलधार्‍यांना कमी लेखू नये. वाहनापासून सावध रहावे. शुभ दि. 4, 8

वृश्चिक ः- या सप्ताहात धनु राशीत गुरू महाराज प्रवेश करीत आहे. सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात वाढ करू शकाल. तुमचे जुने येणे वसूल करता येईल. योग्य ठिकाणी पैसा गुंतवा. मौज-मजेत उडवू नका. कामगारांची समस्या सप्ताहाच्या शेवटी सुटण्याची शक्यता आहे. घरातील तणाव संपवता येईल. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. राजकीय-सामाजिक कार्याला आर्थिक मदत मिळवता येईल. तुमचा प्रभाव वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात नवा पराक्रम गमवता येईल. मैत्रीत थोडा वाद संभवतो. नोकरीत बदल करण्याचा विचार करता येईल. वास्तू, खरेदीसाठी प्रयत्न करता येईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. प्रकृतीत सुधारणा करता येईल. परीक्षेत प्रगती होईल. शुभ दि. 5, 7

धनु ः- या सप्ताहात तुमच्याच राशीत गुरू महाराज प्रवेश करीत आहे. बुध नेपच्यून युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मोठी समस्या राजकीय-सामाजिक कार्यात येऊ शकते. नीट प्रकरण हाताळा. नम्र रहा. राग वाढेल. प्रवासात सावध रहा. धंद्यात वाढ करता येईल. अडचणी सोडवण्याचा मार्ग मिळेल. भागीदार मदत करेल. थकबाकी सप्ताहाच्या शेवटी मिळवण्याचा प्रयत्न करा. घरातील ताण-तणाव कमी होईल. वाटाघाटीचा प्रश्न सोडवा. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने पैसा गुंतवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरी लागेल. कोर्टकेर्समध्ये यश मिळवण्याचा मार्ग शोधता येईल. संशोधनाच्या कामात पुढे जाल. विद्यार्थ्यांना प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 7, 9

मकर ः- मकर राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. धनु राशीत गुरू महाराज प्रवेश करीत आहे. बुध नेपच्यून युती होत आहे. सप्ताहाच्या शेवटी एखादी घटना तुम्हाला अडचणीत आणू शकते. धंद्यात वाढ करता येईल. कोणताही करार बुद्धिचातुर्याने करा. घरातील प्रश्न सोडवावे लागतील. धावपळ वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात एकाकीपण जाणवेल. कोणालाही मदत करताना प्रश्न नीट समजून घ्या. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुणालाही कमी समजू नका. तुमचा वापर करून घेतला जात आहे का? याचा विचार करा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेसमध्ये फसगत होऊ शकते. नोकरीत कायदा पाळा. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अभ्यास करावा. यश खेचता येईल. शुभ दि. 6, 9

कुंभ ः- या सप्ताहात धनु राशीत गुरू महाराज करीत आहे. बुध नेपच्यून युती होत आहे. धंद्यात मोठा लाभ होईल. मोठे कंत्राट मिळवता येईल. कोणतीही समस्या लवकर सोडवता येईल. घरगुती वातावरण सुखद राहील. मुलांची प्रगती होईल. थकबाकी मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यात स्वतःचे स्थान अधिक मजबूत करू शकाल. लोकांचे प्रेम मिळेल. लोकसंग्रह मोठा तयार करता येईल. वाहन, घर, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल. कोर्टकेस संपवता येईल. कला-क्रीडा-साहित्यात चमकाल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. नोकरीत चांगला बदल करता येईल. विद्यार्थ्यांनी मागे राहू नये. आळस करू नये. वेळेला महत्व द्या. मोठे यश मिळवा. शुभ दि. 3, 7

मीन ः- या सप्ताहात गुरू महाराज धनु राशीत प्रवेश करीत आहे. तुमच्या सर्व कार्यात त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. चंद्र शनी लाभयोग होत आहे. उद्योग-धंद्यात अडचणी येतील. संयमाने प्रश्न सोडवा. भावनेच्या भरात कोणताही व्यवहार करू नका. घरात नाराजी, तणाव होऊ शकतो. वाद वाढवू नका. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल प्रतिष्ठा मिळेल. सहकार्य, जवळचे लोक तुमच्यावर नाराजीची तोफ डागण्याची शक्यता आहे. मैत्री सोडण्याची वेळ येऊ शकते. सर्व तात्पुरते असेल. कला-क्रीडा क्षेत्रात अडचणी येतील. प्रसिद्धी मिळेल. व्यसनाने त्रास होईल. भलता मोह धरू नका. परीक्षेसाठी चांगला अभ्यास करा. यश मिळेल. सप्ताह महत्वाचाा ठरेल. शुभ दि. 6, 9