Eco friendly bappa Competition
घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्यः रविवार ५ डिसेंबर ते शनिवार ११ डिसेंबर २०२१

राशीभविष्यः रविवार ५ डिसेंबर ते शनिवार ११ डिसेंबर २०२१

Subscribe

मेष ः- तुमच्या कामात किरकोळ अडचणी येतील. वाहनापासून धोका होऊ शकतो. रागावर ताबा ठेवा. कुंभ राशीत सूर्य प्रवेश, मंगळ, हर्षल युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील तडफदार निर्णय तुम्ही घ्याल. कायदा पाळा. सप्ताह तुमचाच आहे. धंद्यात वाढ होईल. शेअर्समध्ये फायदा होईल. पैसे नीट सांभाळा. संसारात शुभ घटना घडेल. दगाबाज लोक पाहून ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्ट केस चांगली होईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. मनासारखे काम करून घ्या. संशोधनात यश मिळेल. अभ्यासात एकाग्र व्हाल. मोठ्या लोकांचा परिचय होईल. शुभ दि. 5, 6

वृषभ ः- आजचे काम उद्यावर टाकून घरातील समस्या सोडवता येईल. धंद्यात फायदा होईल. कुंभ राशीत सूर्य प्रवेश, मंगळ हर्षल युती होत आहे. राजकीय-सामाजिक दौर्‍यात सावध रहा. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. खाण्या-पिण्यात काळजी घ्या. भलता मोह महागात पडेल. जनतेची कामे करा. प्रतिष्ठा सांभाळा. धंद्यात वाद होऊ शकते. मिळते-जुळते धोरण सर्वत्र ठिकाणी ठेवावे लागेल. घरातील तणावात वाढ होऊ शकतो. नवीन ओळखीवर मोठा विश्वास ठेऊ नका. फसगत होईल. पैशाची हानी टाळा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती करता येईल. मैत्रीत दुरावा होईल. कोर्ट केसमध्ये आक्रमक व्हाल. संशोधनाच्या बाबतीत सहाय्य घ्यावे लागेल. अभ्यासात मागे राहू नका. शुभ दि. 7, 11

- Advertisement -

मिथुन ः- अडचणीतून उपाय शोधू शकाल. मात करता येईल. अरेरावी करू नका. घरातील वातावरण आनंदी ठेवता येईल. कुंभेत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील झालेली चूक सुधारून पुढे जाता येईल. योजनांच्या मागे लागता येईल. लोकांचे प्रेम मिळेल. धंद्यात मोठे काम मिळेल. गैरसमज दूर करा. नोकरीत वरिष्ठांना तुमची बाजू सांगा; पण संधी पहा, घाई करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात हिंमत ठेवा. फुशारकी मारू नका. कोर्ट केस सोपी नाही. संशोधनात मेहनत घ्यावी लागेल. मैत्रीचा फायदा होईल. शेअर्समध्ये अभ्यास करा. उतावळेपणा नको. अभ्यासात हलगर्जीपणा नको. यशासाठी झगडावे लागेल. वडिलांचा मान ठेवा. शुभ दि. 8, 10

कर्क ः- मनाप्रमाणे काम होईल. भेट घेता येईल. कोणतीही समस्या लवकर सोडवा. भिजत घोंगडं ठेऊ नका. धंदा वाढेल. कुंभेत सूर्य प्रवेश, मंगळ हर्षल युती होत आहे. तुमची आक्रमकता वाढेल. आतताईपणे कुठेही वागू नका. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. गुप्त शत्रू वाढतील. पोलिसी त्रास होऊ शकतो. तुम्ही प्रतिष्ठा सांभाळा. गोड बोलून तुमची फसगत होऊ शकते. घरात तणाव राहील. वाटाघाटीत समस्या येईल. प्रकृती सांभाळा. नोकरीत वाकड्या वाटेने जाऊन काम करू नका. मोह त्रासदायक ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केस कठीण आहे. संशोधनात सप्ताहाच्या सुरुवातीला यश येईल. शुभ दि.5, 9

- Advertisement -

सिंह ः- निर्णय घेताना मनाचा गोंधळ होईल. अचानक एखादी समस्या येऊ शकते. घरातील व्यक्ती तुमच्या पाठीशी राहतील. कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात कोणताच निर्णय निश्चित करता येणार नाही. मन अस्थिर राहील. वरिष्ठ दबाव टाकतील. मैत्रीच्या भावनेतून वागता येईल. धंद्यात सुधारणा करू शकाल. थकबाकी वसूल करा. नोकरीत सावध रहा. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत होईल. नवीन ओळख होईल. कोर्ट केस सोपी नाही. सप्ताहाच्या शेवटी चांगली घटना घडेल. संशोधनात काम वाढू शकते. जमिनीचे काम रेंगाळेल. विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवायचा प्रयत्न करावा. शुभ दि. 6, 10

कन्या ः- आज घरातील वातावरण आनंदी राहील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. महत्त्वाचे काम आजच करून घ्या. कुंभेत सूर्य प्रवेश, मंगळ हर्षल युती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची धावपळ होईल. मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागेल. घरात वाटाघाटीत तणाव होऊ शकतो. विवाहासाठी स्थळे येतील. धंद्यात नमते धोरण ठेवावे लागेल. करार करण्यात घाई करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. कोर्ट केस कटकट वाटेल. संशोधनात कष्ट घ्यावे लागतील. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. 7, १1

तुला ः- अचानक कामात बदल करण्याची वेळ येईल. रागावर ताबा ठेवा. वाद वाढवू नका. आरोप होऊ शकतो. कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात नेटाने काम करावे लागेल. वरिष्ठांना कल पाहूनच तुमचे मत मांडा. धंद्यात सुधारणा होऊ शकेल. जीवनसाथी व मुले यांची मर्जी राखावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. स्पर्धेत टिकून रहा. मेहनत घ्या. कोर्ट केस थोडी अडचणीची वाटेल. संशोधनात महत्त्वाचा धागा मिळेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळवता येईल. एकाग्र व्हा. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. शुभ दि. 5, 9

वृश्चिक ः- सप्ताहाची सुरुवात दगदगीने होईल. कामात तुमचा उत्साह राहील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. तुमचा प्रभाव पडेल. धंद्यात फायदा होईल. प्रेमाला चालना मिळेल. कुंभेत सूर्य प्रवेश चंद्र, बुध लाभयोग होत आहे. कामे वाढतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न होईल. धंदा वाढवा. आळस करू नका. ओळखीचा उपयोग धंद्यात करून घेता येईल. थकबाकी वसूल करा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. तुमची कल्पनाशक्ती कौतुकास्पद ठरेल. कोर्ट केसमध्ये संयमाने बोला. संशोधनात, नोकरीत कामाचा व्याप वाढेल. मैत्रीपूर्ण भाष्य उपयुक्त ठरेल. अभ्यासात आळस नको. शुभ दि. 6, 11

धनु ः- काम जास्त करावे लागण्याची शक्यता आहे. तुमचे सामाजिक कौतुक झाल्याने उत्साहात भर पडेल. कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात लक्ष द्या. वेळेला महत्त्व द्यावे. दुसर्‍यावर जास्त अवलंबून न राहता स्वतःचे प्रयत्न करावेत. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना वेगाने पुढे नेता येईल. लोकांसाठी काम करू शकाल. संसारातील तणाव कमी होईल. वाटाघाटीत यश येईल. कला-क्रीडा क्षेत्रात मनाप्रमाणे प्रगती होईल. गोड बोलणार्‍या व्यक्तीला नीट ओळखा. कोर्ट केस चांगली पार पडेल. गुप्त कारवायांचा विचार करा. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. यशासाठी या वर्षात विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत घ्यावी. शुभ दि. 7, 8

मकर ः- तुमचा आत्मविश्वास वाढेल. जवळच्या व्यक्तीविषयी काळजी वाटेल. धंद्यात वाढ होईल. गोड बोलणार्‍या व्यक्तीपासून सावध रहा. कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र गुरु प्रतियुती होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. लोकांच्या दुटप्पी वागण्याचा तुम्हाला मनस्ताप होऊ शकतो. व्यवहारात भावना आणू नका. मोठे कंत्राट मिळू शकेल. मैत्रीत सप्ताहाच्या शेवटी वाद होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्ट केस संपवण्याची तयारी ठेवा. नोकरीत प्रगती होईल. संशोधनात तुमचे कौतुक होईल. परीक्षेसाठी चांगली मेहनत घ्या. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. 9, १1

कुंभ ः- तुमचे ध्येय गाठता येईल. घरातील लोकांच्या मतांना नीट समजून घ्या. कोणाला नाराज करू नका. धंद्यात वाढ होईल. कुंभ राशीत सूर्य प्रवेश, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी चांगली घटना घडेल. धंद्यात जोमाने कार्य करता येईल. नवे कंत्राट मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात विचारपूर्वक निर्णय घेता येईल. कला क्रीडा क्षेत्रात संधी मिळेल. घरातील तणाव कमी होईल. संततीकडून शुभ समाचार मिळेल. संशोधनात मार्ग मिळेल. तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. विद्यार्थ्यांनी नम्रपणे बोलावे. यश मोठे करण्याची जिद्द ठेवा. शुभ दि. 5, 6

मीन ः- सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचे काम करा. योग्य निर्णय घेता येईल. मनाची द्विधा अवस्था होईल. धंद्यात लक्ष द्या. भेट घ्या. कुंभ राशीत सुर्य प्रवेश, चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. तुम्ही ठरविलेल्या योजनांना पूर्ण करा. धंद्याला दुर्लक्षित करू नका. दगा होऊ शकतो. संसारात शांतता राहील. सर्वांचे पाठबळ मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. कोर्ट केसमध्ये सावध रहा. संशोधनात कायम तत्परता ठेवा. परीक्षेसाठी अभ्यासात आळस करू नका. नम्रपणे बोला वा वागा. थकबाकी वसूल करा. नोकरीत सावध रहा. शुभ दि. 8, 9

- Advertisment -