राशीभविष्य रविवार ५ मार्च ते शनिवार ११ मार्च २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : या सप्ताहात मकर राशीत प्लुटो प्रवेश चंद्र, गुरू प्रतियुती होत आहे. धंद्यात मोठे काम मिळवा. इतर अडचणींचे निवारण करता येईल. नोकरीमध्ये चांगला बदल होऊ शकेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. अविवाहितांना लग्नासाठी प्रयत्न करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात कठीण प्रश्न सोडवता येईल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. कला-क्रीडा-साहित्यात नावलौकिक मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. शोध मोहीम फत्ते कराल. शिक्षणात प्रगतीकारक घटना घडेल. शुभ दि. ५, ९

वृषभ : या सप्ताहात मकर राशीत प्लुटो ग्रहाचे राश्यांतर, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात लक्ष घाला. व्यवहारात फसगत होऊ शकते. गोड बोलणार्‍या व्यक्तीपासून सावध रहा. संसारात घरातील माणसांचा विचार ऐकून घ्या. व्यसनाने वेळ व पैसा फुकट जाईल. मोहात अडकू नका. राजकीय-सामाजिक कार्यात योजना मार्गी लावता येतील. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होई शकतो. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. कोर्ट केस यशस्वी करू शकाल. बोलताना कठोर शब्द वापरू नका. शिक्षणात आळस नको. लपवाछपवी करू नका. शुभ दि. ६, १०

मिथुन : या सप्ताहात मकरेत प्लुटो प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सुधारणा करा. सुरुवातीला निर्णय घेताना अंदाज चुकेल. काळजीपूर्वक वागा. वसुली करता येईल. नोकरीत मनाप्रमाणे बदल करू शकाल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांच्या मागे लागून काम पूर्ण करा. लोकप्रियता मिळेल. घरातील कामे होतील. मुले आनंद देतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळखी होतील. कोर्ट केसमध्ये प्रगती होईल. शोध मोहीम यशस्वी कराल. शिक्षणात मोठे यश मिळवा. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. ७, ११

कर्क : या सप्ताहात मकर राशीत प्लुटो प्रवेश, सूर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात घाई करून चालणार नाही. तुम्ही घेतलेला अंदाज चुकेल. मोठे काम मिळाले तरी त्यातील खाचखळगे नीट समजून घ्या. नोकरीच्या ठिकाणी काम करण्यात चूक होईल. त्यामुळे सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांबरोबर चर्चा होण्याचा दाट संभव आहे. तुमचे बोलणे समस्येला धरून नाही असे वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा कठीण वाटेल. कोर्टाच्या कामात दादागिरी करू नका. वाद वाढेल. तुमच्यावर भलताच आरोप टाकला जाईल. शिक्षणात मेहनत घ्या, तरच यश येईल. शुभ दि. ५, ८

सिंह : या सप्ताहात प्लुटो ग्रहाचा मकर राशीत प्रवेश, सूर्य चंद्र, त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यात जास्त मेहनत घ्या. नवे काम मिळेल. मागील येणे वसूल करा. कठीण प्रश्न सोडवा. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. नवीन परिचय होईल. राजकीय-सामाजिक कार्यात नावलौकिक वाटेल. किचकट प्रश्न लवकर मार्गी लावा. घरातील कामे होतील. वाटाघाटीत फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवे काम मिळेल. कोर्ट केस लवकर संपवा. पर्यटनाचा विचार करता येईल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळेल. शोध मोहीम गाजेल. घर घेण्यात यश येईल.
शुभ दि. ६, ९

कन्या : या सप्ताहात मकर राशीत प्लुटो ग्रह प्रवेश, सूर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात भांडण टाळावे लागेल. भागीदाराबरोबर जमवून घ्यावे लागेल. वसुली करणे कठीण आहे. दादागिरीची भाषा कुठेही करू नका. पोलीस केस होऊ शकते. विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होईल. नोकरीत कायद्याचे पालन करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. तुमचा राग वाढवला जाईल असे कृत्य विरोधक करतील. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. नाराज होऊ नका. मैत्रीत तणाव होईल. घरात समस्या येईल. मानसिक तणावाने तुम्ही थोडे हतबल व्हाल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. शुभ दि. ७,१०

तूळ : या सप्ताहात मकर राशीत प्लुटो प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धावपळ होईल. प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात वाढ होईल. थकबाकी वसूल करता येईल. नोकरी लागेल. चांगला बदल करता येईल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. उत्साह वाढेल. आर्थिक सहाय्य मिळेल. जनहित साधा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्ट केस संपवता येईल. घरातील कामे होतील. प्रवासाचा आनंद घ्याल. विद्यार्थी वर्गाला मेहनत घेतल्याचा चांगला फायदा होईल. शोध मोहीम फत्ते कराल. शुभ दि. ८, ११

वृश्चिक : या सप्ताहात मकर राशीत प्लुटो प्रवेश करीत आहे. चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. धंद्यात किरकोळ अडथळे येतील. समोरची व्यक्ती दिलेला शब्द पाळणे कठीण आहे. घरात गैरसमज होईल. पोटाची काळजी घ्या. खाण्याचे तंत्र सांभाळा. मैत्रीत तणाव होऊ शकतो. नोकरीत इतरांच्या चुका सुधारण्यात वेळ जाईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला विरोध करणारे लोक वाढतील. तुमची अरेरावी जाचक वाटेल. कला-क्रीडा स्पर्धेत पुढे जाता येईल. अनाठाई खर्च होऊ शकतो. कोर्टाच्या कामात सावध रहा. शोध मोहीम कठीण वाटेल. शिक्षणात आळस करू नका. बुद्धिचातुर्य वापरा. यश मिळेल. शुभ दि. ५, ७

धनु : या सप्ताहात मकर राशीत प्लुटो प्रवेश सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काम करण्यामध्ये अडचण येऊ शकते. रागावर ताबा ठेवा. धंद्यात वाढ करता येईल. जुनी वसुली करून घ्या. घर, वाहन घेण्याचा विचार करता येईल. संसारात सुखद समाचार मिळेल. अविवाहितांना लग्नासाठी चांगली स्थळे शोधता येतील. नोकरी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घ्या. तुमचा प्रभाव वाढेल. लोकसंग्रह तयार करता येईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. शोध मोहिमेत यश मिळेल. शिक्षणात उत्तम यश संपादन करता येईल.
शुभ दि. ६, ८

मकर : या सप्ताहात तुमच्याच राशीत प्लुटो प्रवेश, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात दुर्लक्ष करू नका. नवे काम मिळेल. थकबाकी वसूल करता येईल. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात जम बसवा. तळागाळापासून कामे करा. तुमची स्थाने तयार करा. मेहनत घ्या म्हणजे संधी मिळेल तेव्हा पुढे जाता येते. घरातील कामे होतील. समस्या सोडवता येतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. लोकप्रियता मिळेल. कोर्टाच्या कामात बेसावध राहू नका. यश मिळेल. शिक्षणात चांगली संगत ठेवा. अभ्यास करा. जिद्द ठेवा. शुभ दि. ७, ९

कुंभ : या सप्ताहात मकर राशीत प्लुटो प्रवेश, बुध शुक्र लाभयोग होत आहे. शेअर्समध्ये मोठा लाभ मिळेल. धंद्यात मोठे काम मिळेल. तुमचा अंदाज बरोबर येईल. मागील येणे वसूल करा. घर, जमीन खरेदी विक्री करता येईल. राजकीय क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. विरोध प्रखरपणे दाखवाल. लोकांची तुम्हाला साथ मिळेल. नवे कार्य आरंभ करता येईल. कायद्याचे योग्य ते पालन करा. घरातील कामे होतील. नवीन ओळखी होतील. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकीक मिळेल. कोर्टाच्या कामात यश येईल. विद्यार्थी वर्गाने आळस न करता अभ्यास करून पुढे जावे. शुभ दि. ८, १०

मीन : या सप्ताहात मकर राशीत प्लुटो प्रवेश, चंद्र गुरू प्रतियुती होत आहे. प्रत्येक दिवसाला तुम्ही युक्तीने वागून स्वतःचे काम करून घ्या. अरेरावी नको. नम्रता ठेवा. धंद्यात वाद करू नका. मिळेल ते काम करा. मैत्रीत थोडा गैरसमज होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या विचारानेच काम करावे लागेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा कमीपणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. चूक दाखवली जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात कष्ट पडतील. नवीन ओळखीच्या व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करू नका. संसारात समस्या येईल. वाहन हळू चालवा. विद्यार्थी वर्गाने ध्येय सोडू नये. शुभ दि. ९, ११