घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार ६ ऑगस्ट ते शनिवार १२ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य रविवार ६ ऑगस्ट ते शनिवार १२ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष ः- या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, बुध केंद्रयोग होत आहे. धंद्यात चर्चा करताना बोलण्यातून गैरसमज होऊ शकतो. काम मिळवणे महत्त्वाचे ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढविण्यासाठी नेटाने प्रयत्न करा. संघर्ष संपलेला नाही. तरी तुम्हाला प्रयत्नाने यश खेचता येईल. घरातील वाद मिटेल. वाटाघाटीतील नाराजी कमी होईल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रसिद्धी मिळेल. ओळखी होतील. कोर्ट केस मिटवण्याचा प्रयत्न करू शकाल. शोध कार्यात यशस्वी व्हाल. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. शिक्षणात प्रगती होईल. शुभ दि. ०६, १०

- Advertisement -

वृषभ ः या सप्ताहात बुध, गुरू त्रिकोणयोग, शुक्र, मंगळ युती होत आहे. धंद्यात तुमचा जम बसेल. नवी सुधारणा करता येईल. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात पद्धतशीर कार्य करा. मांडणी करा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. घरातील समस्या कमी होईल. घर, जमीन घेण्याचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. नोकरीत चांगला फायदेशीर बदल करता येईल. कोर्ट केसमध्ये सप्ताहाच्या मध्यावर अडथळा येऊ शकतो. शोध कार्यात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला मोठे यश मिळेल. चालढकलपणा करू नका. चांगली संगत ठेवा. शुभ दि. ०७, ११

मिथुन ः या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, शुक्र, मंगळ युती होत आहे. धंद्यात फायदेशीर काम मिळेल. प्रयत्नांचा जोर वाढवा. कायद्याचे पालन करा. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रामाणिकपणे कामे करा. लोकांच्या खर्‍या समस्या ओळखून कार्य करा. दौर्‍यात यश मिळेल. संसारात जीवनसाथी, मुले यांच्या प्रगतीची बातमी मिळेल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकदार यश मिळवाल. नवीन आश्वासन तुम्हाला मिळेल. कोर्ट केस जिंकता येऊ शकते. शोध कार्यात सहकारी, वरिष्ठ यांची मदत मिळेल. शिक्षणात पुढे जाल. परदेशात नोकरी निमित्ताने जाल. शुभ दि. ०८, १२

- Advertisement -

कर्क ः- या सप्ताहात बुध, गुरू त्रिकोणयोग, शुक्र, मंगळ युती होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळेल. व्यवसायात तुमच्या प्रॉडक्टचे नाव प्रसिद्ध होईल. गुंतवणूकदारसुद्धा मिळतील. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. लोकप्रियता मिळेल. दौर्‍यात सहकारी मदत करतील. योजनांना गती देऊन कामे करा. हीच वेळ आहे. संसारात आनंदाची बातमी कळेल. घर, वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कोर्ट केस लवकर संपवणे भविष्यासाठी ठीक राहील. शोध कार्यात यश येईल. नोकरीत अधिकाराचे पद प्राप्त होईल. शिक्षणात ध्येय गाठता येईल. शुभ दि. ०६, ०९

सिंह ः- या सप्ताहात बुध, नेपच्यून षडाष्टक योग, शुक्र, मंगळ युती होत आहे. धंद्यात कराराची बोलणी करताना वाद होईल. गैरसमज होईल. तुमचे टोमणे मारणारे बोलणे समोरच्या व्यक्तीला आवडणार नाही. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या विचारांना सर्वांच्या सहमतीने पुढे नेता येईल. प्रतिष्ठा वाढेल. लोकांच्या उपयोगी येतील अशी कामे करता येतील. संसारातील वाद मिटवण्याची संधी मिळेल. घर घेण्याचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. प्रसिद्धी मिळेल. कोर्ट केसमध्ये प्रयत्नाने यश मिळवता येईल. शिक्षणात प्रगती होईल. शोधकार्य पूर्ण कराल. शुभ दि. ०७, १०

कन्या ः- या सप्ताहात चंद्र, बुध त्रिकोणयोग, चंद्र, गुरू प्रतियुती होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर धंद्यात, नोकरीत तणाव होईल. रागावर ताबा ठेवा. कायद्याचे उल्लंघन होईल असे कृत्य करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात नम्रतेने वागा. लोकांना कमी लेखू नका. तुमच्या प्रसिद्धीचा फायदा तिसरीच व्यक्ती घेईल. संसारात जबाबदारी वाढेल. घरातील वृद्धांसाठी धावपळ कराल. कलह निर्माण होईल. कला-क्रीडा स्पर्धेत टिकून राहणे महत्त्वाचे ठरेल. खोट्या प्रेमाच्या मागे धावू नका. शोध कार्यात दिशा चुकेल. शिक्षणात आळस करू नका. शुभ दि. ०८, ११

तूळ ः- या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, शुक्र, मंगळ युती होत आहे. या सप्ताहात काम मिळवणे कठीण पडेल. तुम्हाला नम्रपणे तुमचे विचार समोरच्या व्यक्तीला समजून घ्यावे लागतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांची कामे करावी लागतील. राजकीय-सामाजिक कार्यात तत्परता ठेवावी लागेल. काही लोक काड्या घालण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही सहनशीलता ठेवा, तरच प्रतिष्ठा वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. कोर्ट केसमध्ये बेसावध राहू नका. शोध कार्य जिद्दीने पूर्ण करा. शिक्षणात पुढे जाल. शुभ दि. ०९, १२

वृश्चिक ः- या सप्ताहात बुध, गुरू त्रिकोणयोग, शुक्र, मंगळ युती होत आहे. धंद्यात पुढे जाण्याची संधी शोधता येईल. ओळखीचा उपयोग होईल. मोठ्या व्यक्ती मदत करतील. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती मिळेल. लोकप्रियता मिळेल. सप्ताहाच्या मध्यावर किरकोळ मतभेद होतील. नोकरीत तुमचा प्रभाव दिसून येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. परिचयात वाढ होईल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. कोर्ट केस जिंकाल. शोध कार्यात यश मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. विवाहासाठी स्थळे येतील. संतती प्राप्तीत यश मिळेल. शुभ दि. ०६, ०८

धनु ः- या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, शुक्र, मंगळ युती होत आहे. शनिची साडेसाती सुरू आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. पैसा मिळेल. नवे काम लवकर शोधा. नोकरीतील वातावरण सुधारेल. वरिष्ठ कौतुक करतील असे काम कराल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांच्या मागे लागून काम पूर्ण करा. बोलताना कठोर बोलू नका. कायद्याचे भान ठेवा. संसारातील अडचणी कमी होतील. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे स्थान पुन्हा मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. कोर्ट केस यशाकडे जात आहे असे दिसेल. शोध कार्यातील तणाव कमी होईल. शिक्षणात प्रगती होईल. शुभ दि. ०७, ०९

मकर ः या सप्ताहात सूर्य, चंद्र षडाष्टक योग, बुध, गुरू त्रिकोणयोग होत आहे. याच सप्ताहात धंद्यातील समस्या कमी करण्याचा प्रयत्न करा. कुठेही दादागिरीची भाषा वापरू नका. मैत्रीच्या भावनेतून वागा, बोलल्याने कामे होतील. राजकीय-सामाजिक कार्यात गुप्त शत्रू कट करून त्रस्त करण्याचा प्रयत्न करतील. रागावर ताबा ठेवा. प्रतिष्ठा सांभाळा. कला-क्रीडा स्पर्धेत जिद्द ठेवा. कौतुकाचे बोल ऐकावयास मिळणेच मोठे ठरेल. कोर्ट केसमध्ये बेसावध राहू नका. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता राहील. शोध कार्यात तत्परता ठेवा. विद्यार्थी वर्गाने व्यसन करू नये. कायदा पाळा. शुभ दि. ०८, १०

कुंभ ः- या सप्ताहात सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, शुक्र, मंगळ युती होत आहे. तुमचा उत्साह वाढेल अशी घटना धंद्यात घडेल. नवे काम मिळेल. बोलताना सावध रहा. कठोर बोलणे टाळा. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात नवे डावपेच टाकता येतील. योजनांसाठी पद्धतशीर वेळ काढता येईल. कार्याला वेग द्या. संसारातील नाराजी, गैरसमज दूर करू शकाल. घर, वाहन इत्यादी खरेदीचा विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मोठ्या कामाचे आश्वासन मिळेल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. शोध कार्यात पूर्णपणे यश मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. शिक्षणात चांगली प्रगती होईल. शुभ दि. ०९, ११

मीन ः या सप्ताहात सूर्य, चंद्र षडाष्टक योग, बुध, गुरू त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात जम बसवा. मोठे काम मिळेल. वादविवादाला जास्त महत्त्व देऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात मान-अपमान सहन करावा लागेल. टीका होईल. तुम्ही खंबीर रहा. अहंकारीपणा करू नका. नोकरीत वरिष्ठांच्या दबावाखाली रहावे लागेल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या मोहाला बळी पडू नका. कला-क्रीडा क्षेत्रात मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. कोर्ट केस जिंकणे सोपे नाही. जिद्द ठेवा. संसारात कुणाला उद्धटपणे बोलू नका. वाटाघाटीवरून समस्या निर्माण होईल. शोध कार्यात बुद्धी वापरा. रागाचा वापर करू नका. शिक्षणात स्थिर मन ठेवा. यशस्वी व्हाल. शुभ दि. १०, १२

- Advertisment -