राशीभविष्य रविवार ६ मार्च ते १२ मार्च २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- चंद्र नेपच्यून युती, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. या सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय-सामाजिक कार्याला वेग प्राप्त होईल. महत्त्वाची चर्चा करता येईल. भेट घेता येईल. इतरांच्या फायद्याचा विचार त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे पटवून देऊ शकाल. धंद्यात वाढ होईल. कामगार वर्गाशी वाद करू नका. संसारातील तणाव कमी होईल. सुखद समाचार मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मोठे आश्वासन मिळेल. नोकरीत, कोर्टाच्या कामात सप्ताहाच्या शेवटी वादावादी होऊ शकते. प्रवासात सावध रहा. संशोधनाच्या कामात प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थी वर्गाने एकाग्रतेने अभ्यास करावा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. मौज कराल. शुभ दि. 6,8

वृषभ ः- चंद्र बुध युती, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. भागीदाराबरोबरचा वाद मिटेल. फायदा वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात जनतेकडून सहकार्य मिळेल. कार्य वेगाने पूर्ण करू शकाल. घरात आनंदी वातावरण राहील. प्रवासाचा बेत ठरवाल. नोकरीत वर्चस्व वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात पूर्वी झालेला गैरसमज दूर करता येईल. प्रगती होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. कोर्ट केस संपवता येऊ शकते. संशोधनात कौतुक होईल. मनावरील दडपण कमी होईल. संततीसंबंधी शुभवार्ता कळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात आळस करू नये. मोठे यश मिळू शकेल. शुभ दि. 10,12

मिथुन ः- सूर्य नेपच्यून युती, चंद्र मंगळ लाभयोग होत आहे. कोणतेही कठीण काम करून घ्या. घरगुती लोकांना नाराज करू नका. प्रेमाने प्रश्न सोडवता येईल. धंद्यात फायदा मिळवू शकाल. प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांना मदत करावी लागेल. प्रतिष्ठा मिळेल. सरकारी वर्गाला समजून घ्या. सप्ताहाच्या सुरुवातीला कला-क्रीडा क्षेत्रात किरकोळ मतभेद होईल. कोर्ट केसमध्ये प्रगती होईल. संशोधनाच्या कामात अडचणीतून मार्ग शोधता येईल. बुद्धिमत्ता असली तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासात नियमितपणा ठेवावा तरच चांगले यश मिळेल. खाण्याची काळजी घ्या.
शुभ दि. 6,७

कर्क ः- चंद्र बुध युती, चंद्र शुक्र, लाभयोग होत आहे. घरातील वाद कमी होतील. वाटाघाटीसंबंधी प्रश्न असल्यास चर्चा करू शकाल. धंद्यात काम मिळवता येईल. थकबाकी वसूल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या मध्यावर मोठा तणाव होऊ शकतो. तुमच्यावर आरोप येईल. सहनशीलता ठेवल्यास प्रसंग सावरून घेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात संधीची वाट पहावी लागेल. नोकरीत कायद्याचे पालन करून निर्णय घ्या. संशोधनाच्या कामात वरिष्ठांची मर्जी पाहून तुमच्या अडचणी व्यक्त करा. विद्यार्थी वर्गाने नम्रता ठेवावी. वाकड्या वाटेने जाऊन यशाच्या मागे लागू नये. परदेशात जाण्यासाठी विलंब होऊ शकतो. शुभ दि. 7,९

सिंह ः- सूर्य नेपच्यून युती, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. मनावर घरातील दडपण राहील. जवळच्या व्यक्तींना दुखवून चालणार नाही. स्वतःचा प्रश्न वाढू शकतो. धंद्यात व्यवहार नीट समजून घ्या. नुकसान होऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. निश्चित राजकीय धोरण ठरवणे कठीण वाटेल. सहकारी व नेत्यांचा सल्ला घ्यावा लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. तणाव वाढेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कोर्ट केसमध्ये योग्य शब्द वापरा. संशोधनाच्या कामात अधिकारी वर्गाची मदत घेता येईल. धावपळ, दगदग करावी लागेल. विद्यार्थी वर्गाने परीक्षेसाठी नियमितपणे अभ्यास करावा. सकस आहार घ्यावा. वस्तू सांभाळा. शुभ दि. 8,10

कन्या ः- चंद्र शुक्र लाभयोग, चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. कोणताही निर्णय राजकीय-सामाजिक कार्यात घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. सप्ताहाच्या मध्यावर अडचण येऊ शकते. धंद्यात लक्ष द्या. काम मिळवता येईल. कोणत्याही ठिकाणी बळाचा वापर करू नका. सहनशीलता ठेवा. नोकरीत न पटणारे काम कायद्याच्या विरोधात जाऊन करू नका. घरातील लोकांचा आधार मिळेल. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात नम्रता ठेवा. उतावळेपणाने प्रसिद्धी मिळत नाही. संशोधनाच्या कामात कष्ट पडतील. अधिकारी वर्गाशी मिळते-जुळते धोरण ठेवा. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवावी. परीक्षेत मोठे यश मिळवण्याचा प्रयत्न करता येईल. शुभ दि. 11,12

तूळ ः- चंद्र, गुरु लाभयोग, सूर्य नेपच्यून युती होत आहे. घरातील कामे वाढतील. किरकोळ घटना मनाविरुद्ध घडू शकतात. तुमच्या महत्त्वाच्या कामात मात्र यश मिळवता येईल. धंद्यात हिशोब नीट तपासा. कामगारांची कमतरता होऊ शकते. भागीदार कुरबूर करण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाची भेट घेता येईल. निर्णय घेता येईल. वरिष्ठांच्या तुमच्या कामाचे कौतुक करतील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. प्रगतीची संधी मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा. संशोधनाच्या कामास गती मिळेल. लवकर संपवा. विद्यार्थी वर्गाने मोठ्या यशासाठी प्रयत्न करावेत. अपेक्षित यश मिळवता येईल. चांगली संगत ठेवावी. वाहनाचा वेग कमी ठेवावा. शुभ दि. ६,9

वृश्चिक ः- चंद्र बुध, युती, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. तुमचे मन खंबीर राहील त्यामुळे राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. वरिष्ठांना तुमचे कार्य दाखवा. लोकप्रियता मिळवता येईल. धंद्यासाठी जोरात प्रयत्न करा. इतरांच्या मदतीची जास्त अपेक्षा ठेऊ नका. संसारात आनंदी रहाल. शुभ समाचार कळेल. नोकरीचा प्रयत्न करा. सप्ताहाच्या शेवटी काम होऊ शकेल. कला-क्रीडा क्षेत्रात महत्त्व वाढेल. आश्वासन मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामात प्रगती होईल. संशोधनाच्या कामात सहकारी मदत करतील ती घ्या. विद्यार्थी वर्गाने पुढील शिक्षणासाठी येणार्‍या परीक्षेत जास्त मेहनत घ्यावी. थट्टा-मस्करी करताना शब्द जपून वापरावे. शुभ दि. 9, 12

धनु ः- सूर्य नेपच्यून युती, चंद्र, शुक्र लाभयोग या सप्ताहात होत आहे. स्वतःचे वैयक्तिक महत्त्वाचे काम याच सप्ताहात करून घेता येईल. तुमचा उत्साह राहील. नातलगांची मदत मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. धंद्यात वाढ होईल. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिमा उजळेल. लोकांचे प्रेम मिळेल. सहकार्य मिळेल. त्यांच्यासाठी ठरविलेल्या योजना लवकर पूर्ण करा, तरच तुमचे महत्त्व टिकून राहील. भिडस्तपणा न ठेवता स्वतःचे हित साधा, काम मिळवा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. प्रकृतीत सुधारणा होईल. संशोधनात यश येईल. विद्यार्थी वर्गाने ध्येय सोडू नये. प्रयत्नांचा वेग वाढवा. शुभ दि. 8,12

मकर ः- सूर्य नेपच्यून युती, चंद्र गुरु त्रिकोण योग होत आहे. तुमच्या कार्यात यशस्वी व्हाल. मेहनत घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात वेळेला महत्त्व द्या. जास्तीत जास्त कामे पूर्ण करा. प्रसिद्धीत लोकप्रियता मिळवा. बोलताना ताळमेळ ठेवा. धंद्यात मोठी संधी मिळेल. मागिल नुकसान भरून काढता येईल. नोकरीत चांगला बदल होऊ शकेल. परदेशात जाण्याचा योग येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. नवीन ओळख वाढेल. प्रेमाला चालना मिळेल. संसारात सुखद घटना घडेल. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार होईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांनी जिद्द सोडू नये. चमकदार यश मिळवता येईल. ग्रहांची साथ आहे. शुभ दि. ६, ७

कुंभ ः- सूर्य नेपच्यून युती, चंद्र गुरु त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला घरात मतभेद होईल. अचानक खर्च वाढेल. मुलांच्या समस्या वाढतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जबाबदारीने वागावे, बोलावे लागेल. लोकांच्या मनाचा विचार करा. धंद्यात मोठे काम मिळेल. भागीदार निष्कारण कुरबुर करेल. मैत्रीत तणाव संभवतो. नोकरीत वर्चस्व राहील. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिकात भर पडेल. कोर्ट केसमध्ये यश मिळवावे लागेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. अधिकार वाढेल. विद्यार्थी वर्गाने खाण्याची काळजी घ्यावी. मित्र-मैत्रिणीत वेळ फुकट घालवू नये. मोठे यश सोडू नये. शुभ दि. 10,11

मीन ः- चंद्र शुक्र लाभयोग, चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर राजकीय-सामाजिक कार्यात अडथळे येतील. तुमचा राग अनावर होऊ शकतो. धंद्यात बोलताना सावध रहा. काम मिळेल. मागिल येणे वसूल करा. लोकांशी संपर्क वाढवता येईल. घरातील लोकांना खूश ठेवता येईल. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. पुरस्कारासाठी वेळ लागेल. नोकरीत वरिष्ठांना दुखवू नका. कोर्ट केसमध्ये उर्मटपणे वागू नका. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. डोळ्यांची काळजी घ्या. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात लक्ष द्यावे. अरेरावी करू नये. वडील माणसांना दुखवू नये. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 7,9