मेष :- व्यापार, राजकारण, कृषी, विज्ञान, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत आपली यशाची घोडदौड सुरू राहील. आपल्या अपेक्षा पूर्ण होण्याचा हा काळ राहील. धंद्यात वाढ होईल. भागीदाराशी जुळवून घ्याल. नोकरीत चांगला बदल शक्य होईल. कंपनीद्वारा परदेशात जाण्याची संधी मिळेल. घरगुती कारणाने किरकोळ नाराजी होईल. खर्च वाढेल. घर, वाहन, खरेदीचा विचार करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे नेतृत्व प्रभावी ठरेल. जवळचे लोक आपसात तणाव निर्माण करतील. त्यावर वचक ठेवावा लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. कोर्ट केस जिंकाल. शिक्षणात योग्य निर्णय घेऊन प्रगती कराल. शुभ दि. ९, १२
वृषभ :- कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मुलांकडून शैक्षणिक क्षेत्रातील सुवार्ता समजतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आपल्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पाडाल. कला क्षेत्रात विशेष यश मिळवाल. नवीन ओळखी होतील. धंद्यात वाढ करता येईल. नोकरीत टिकाव लागेल. रागावर ताबा ठेवा. प्रवासाचा बेत आखाल. वाहन जपून चालवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांचे मत ऐकून निर्णय घ्या. प्रतिष्ठा वाढेल. घरातील समस्या सोडवाल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केस जिंकाल. शिक्षणात आळस करू नका. नव्या परिचयाचा लाभ घेता येईल. शुभ दि. ६, ७
मिथुन ः- आपल्या कार्याच्या कक्षा रुंदावतील. धंद्यात संधी मिळेल. वसुली कराल. वादविवादात पडू नका. मोहाच्या जाळ्यात अडकू नका. सामंजस्य आणि समजूतदारपणाचा योग्य समन्वय साधावा. राजकीय-सामाजिक कार्यात गुप्त कारवायांनी त्रस्त व्हाल. नवे परिचय आपणास लाभदायक ठरतील. एकाच वेळी अनेक प्रश्न सोडवणे कठीण वाटेल. आपला घरगुती खर्च वाढेल. आप्तेष्ट, जवळची माणसे मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन संधी मिळेल. ओळखीमुळे तुम्ही उत्साहित व्हाल. प्रवासाचा बेत आखाल. वाहन जपून चालवा. कोर्टाच्या कामात सतर्क राहा. शिक्षणात चंचलपणा करू नये. शुभ दि. ८, १०
कर्क :- कला क्षेत्रात उत्तम यश संपादन करता येईल. प्रवासाचे योग येतील. आपल्या शांत व स्थितप्रज्ञतेने आपली बाजू सावरता येईल. शब्द अतिशय जपून वापरावेत. स्पष्टपणा काही काळ बाजूला ठेवा. वेळेत काम पूर्ण करा. नोकर माणसे अडचणी निर्माण करतील. नोकरीत वर्चस्व राखाल. घरातील खर्च वाढेल. वाटाघाटीत तणाव होईल. संयम ठेवा. पुढे संधी मिळेल. आपली वैचारिक मानसिकता बिघडू देऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात तडफदारपणा दिसेल. आक्रमकता नियंत्रणात ठेवा. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. शिक्षणात धरसोड वृत्ती ठेवू नका. शुभ दि. ६, ८
सिंह :- व्यापार-उद्योगाला चालना मिळेल. आपल्या जबाबदार्या पार पाडू शकाल. चांगल्या घटनांनी काही प्रमाणात समाधान मिळू शकेल. नोकरी सांभाळताना आपणास तारेवरची कसरत करावी लागेल. मनावर दडपण येईल. धंद्यात जम बसेल. वसुली कराल. वर्चस्वासाठी परिश्रम वाढवावे लागतील. गुप्त कारवाया वाढतील. आपली मनशक्ती टिकवा. गोड बोलण्याने आपल्या कार्यात सहजता मिळेल. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. अध्ययनात प्रगती व यश मिळवता येईल. कला-क्रीडा स्पर्धेत अटीतटीचा सामना होईल. कोर्टाच्या कामात मदत घेता येईल. आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवता येईल. गैरसमजापासून दूर राहा. शुभ दि. ८, ११
कन्या ः- आपल्या प्रयत्नांनी, चिकाटीने आणि सत्प्रवृत्तीने आपण आपले कार्य साध्य करू शकाल. आर्थिक बाजू सावरता येईल. आपल्या विरोधकांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्या. तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. घरात वाद होईल. संयम ठेवा. वस्तू नीट सांभाळा. नोकरीत तुमचा रूबाब राहील, परंतु लोकांना दुखवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवता येईल. कोणताही निर्णय रागाच्या भरात घेऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात संधी मिळेल. कोर्टाच्या कामात यश खेचावे लागेल. विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे विषय नीट अभ्यासावेत. व्यसन करू नये. कठीण परिस्थिती सामंजस्याने हाताळावी. शुभ दि. ६, ७
तूळ ः- कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. मौल्यवान खरेदी कराल. बौद्धिक गोष्टींना उत्तम चालना मिळेल. कोर्ट केसमध्ये जिंकाल. शिक्षणात एकाग्र राहा. धंद्यात वाढ होईल. काम वाढेल. प्रवासात घाई करू नका. नोकरीत वरिष्ठांचा दबाव नकोसा वाटेल. खंबीरपणाने कामे करावी लागतील. राजकीय-सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. नमते धोरण ठेवा. भावना व व्यवहार नीट समजून घ्यावा. आपल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल. कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका. प्रकृती जपा. धीराने परिस्थिती हाताळा. आपल्या कार्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करा. समाजात आपली प्रतिमा चांगली ठेवता येईल. शुभ दि. ७, ९
वृश्चिक ः- राजकीय-सामाजिक कार्यात आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. गुप्त कारवायांना तोंड द्यावे लागेल. कला क्षेत्रात चमकाल. क्रीडा क्षेत्रात पराक्रमी घोडदौड कराल. कोर्ट केसमध्ये यश मिळेल. रागावर ताबा ठेवावा. संयमाने प्रश्न सोडवा. चर्चा करा. वाहन जपून चालवा. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. मनाप्रमाणे कामे करता येतील. नको त्या प्रलोभनांना मात्र भुलू नका. शिक्षणात आळस करू नका. चंचलपणा दूर ठेवा. चांगली संगत ठेवा. काही चांगल्या घटनांचा तसेच सुखद गोष्टी घडण्याचा आनंद मिळेल. घरातील समस्या सोडवता येतील. आपली आर्थिक बाजू सावरता येईल. व्यवहारात सतर्क राहा. शुभ दि. ८, १२
धनु ः- धंद्यात मोठे काम मिळवता येईल, पण वादाचा प्रसंग कुठेही निर्माण होऊ शकतो. रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. दुखापत टाळा. नोकरीत आपला प्रभाव पडेल. नवीन बदल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात चमकाल. प्रतिष्ठा आणि लोकप्रियता टिकवता येईल. आर्थिक बाजू सावरता येईल. कोर्टकचेरीच्या कामात सफलता जाणवेल. आर्थिक लाभ संभवतो. कला-क्रीडा विभागात आपणास प्रसिद्धी मिळेल. कोर्टकेस किचकट वाटेल. शिक्षणात चंचलपणा करू नका. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. स्पर्धा आणि साहसी कृत्ये यापासून दूर राहा. प्रवासात सावध राहा. शुभ दि. ६, ११
मकर ः- धंद्यात वाढ करता येईल. काम करताना काळजी घ्यावी. नोकरीत काम वाढले तरी वरिष्ठांना खूश करता येईल. संसारात चांगली बातमी कळेल. मुले प्रगती करतील. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. इतरांच्या सांगण्यावरून तुम्ही निर्णय बदलू नका. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. आपलेच घोडे पुढे दामटू नका. कोर्टाच्या कामात आपणास यश खेचता येईल. सामंजस्याने एकूण परिस्थिती हाताळा. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. मानसिकता बिघडणार नाही याची दक्षता घ्या. रागावर ताबा ठेवा. शिक्षणात आळस नको, तरच यश मिळेल. आपली शोधमोहीम प्रगतिकारक ठरेल. शुभ दि. ९,१२
कुंभ ः- व्यापार व्यवसायात उत्पन्नाचे नवे संकेत प्राप्त होतील. अपेक्षित मदतीचा ओघ सुरू होईल. महिलावर्गाची चांगली प्रगती होईल. नवे कपडे, दागिने यांच्या खरेदीचे बेत आखाल. मुलांकडून शुभवार्ता ऐकण्यास मिळतील. कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. नोकरीत अडचणी येतील. वरिष्ठांच्या विरोधात जाऊ नका. घरातील माणसे तुम्हाला मदत करतील. नवीन ओळखी होतील. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिक्रिया व्यक्त करताना उतावळेपणा करून चालणार नाही. गुप्त कारवाया अधिक होतील. शोधमोहिमेत चूक संभवते. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. कोर्ट केस कठीण वाटेल. विद्यार्थी वर्गाने जिद्द ठेवावी. यश मिळेल. शुभ दि. ६, १०
मीन ः- बरीचशी अडकलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. प्रवासाचे योग येतील. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. कौटुंबिक वातावरण छान राहील. प्रकृतीची पथ्ये मात्र पाळा. धंद्यातील अडचणी सोडवता येतील. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या. भाऊबंदकीच्या वादात भर पडणार नाही याची काळजी घ्या. वसुली करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत कामाची चतुराई दिसेल. घर, वाहन, जमीन खरेदी करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात योजना मार्गी लावता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नवीन ओळखी होतील. प्रेमाला चालना मिळेल. कोर्ट केस यशस्वी होईल. शिक्षणात प्रगती होईल. शोधमोहीम फत्ते कराल. शुभ दि. ७, १२