Homeभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यHoroscope : राशीभविष्य रविवार २२ डिसेंबर ते शनिवार २८ डिसेंबर २०२४

Horoscope : राशीभविष्य रविवार २२ डिसेंबर ते शनिवार २८ डिसेंबर २०२४

Subscribe

मेष :- व्यवसायात अधिक जम बसवता येईल. आळस करू नका. नोकरीतील समस्या कमी होईल. प्रभाव वाढेल. आर्थिक व्यवहारात फाजील विश्वास न ठेवता सत्य स्वरूपाचा मागोवा घ्या. नको त्या प्रलोभनांपासून दूर राहा. राजकीय-सामाजिक कार्यात सर्वांना एकत्र करून नवा विचार त्यांच्यासमोर मांडता येईल. आत्मविश्वासाने डावपेच टाकता येतील. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक मतभेद होतील. संसारातील कामे होतील. घरातील व्यक्तींना खूश ठेवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. संशोधनाच्या कामात प्रगती कराल. कोर्ट केसमध्ये प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने योग्य दिशेनेच जावे. शुभ दि. २३, २६

वृषभ :- आपल्या श्रमाचे योग्य मूल्यमापन झाल्याचे समाधान मिळेल. नोकरीत सुलभता जाणवेल. इच्छापूर्तीचा आनंद घेता येईल. व्यवसायात वाढ करण्यात यश मिळेल. मोठे कंत्राट मिळेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. राजकीय-सामाजिक कार्यात वाटाघाटीत तडजोड करण्याची वेळ येऊ शकते, पण प्रतिष्ठा जाणार नाही. वरिष्ठ आपणास मदत करतील. घरात क्षुल्लक ताणतणाव राहील. स्वतःच्या खाण्याची योग्य ती काळजी घ्या. आपल्याला दिलेली जबाबदारी आपण पूर्ण करू शकाल. आपल्या कामाचा व्याप वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. कोर्ट केसमध्ये सप्ताहाच्या शेवटी अडचण येईल. शुभ दि. २५, २८

मिथुन :- भागीदारीत काळजी घेणे गरजेचे राहील. कोर्टकचेरीच्या कामांना काही दिवस लांबणीवर टाकल्यास योग्य तो लाभ उठवता येईल. धंद्यात सावध राहा. हिशोब नीट करा. फसगत होऊ शकते. नोकरीत वरिष्ठांना नाखूश करू नका. कायदा पाळा. काही कामात अडथळे येऊ शकतात. राजकीय-सामाजिक कार्यात तटस्थ भूमिका घ्यावी तरच निभाव लागेल. कोणतेही प्रखर मत व्यक्त केल्यास नुकसान होईल. आपल्या नावलौकिकात भर पडेल. आर्थिक आवक वाढल्याने आर्थिक बाजू सुधारेल. घरातील व्यक्तीची मदत होईल. वृद्ध माणसांची चिंता वाटेल. संशोधनाच्या कामात किरकोळ समस्या येतील. शुभ दि. २७, २८

कर्क :- कोणास जामीन राहणे तसेच उधार-उसनवारी यापासून दूर राहा. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या मध्यावर वाद होईल. वाटाघाटीत यश मिळेल. आपल्या रागावर मात्र नियंत्रण ठेवा. प्रवासात घाई करू नका. गुप्त कारवायांवर मात करता येईल. आपल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळून आपण आपले ध्येय गाठू शकाल. सामाजिक क्षेत्रात आपली पत वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील. घर, वाहन खरेदीचा विचार करता येईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. मित्रपरिवाराकडून मदतीचा हात मिळेल. प्रकृती जपा. प्रलोभनात अडकू नका. शुभ दि. २२, २५

सिंह :- सप्ताहाच्या मध्यावर महत्त्वाची कामे होतील. नोकरीत वरिष्ठांची मदत घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. वाटाघाटीत मतभेद झाले तरी यश खेचता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. हितशत्रूंच्या कारवायांवर कडक नजर ठेवा. त्यांना संधी देऊ नका. सरकारी नियमांचे मात्र कटाक्षाने पालन करा. नवीन ओळखीचा फायदा होईल. कार्यक्षेत्रातील उलाढाली वृद्धिंगत होतील. घरातील समस्या कमी होईल. कोर्टाच्या कामात सप्ताहाच्या शेवटी तणाव होईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. चांगली संगत ठेवल्यास नुकसान टाळता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. २६, २८

कन्या :- व्यवसायात मोठे कंत्राट मिळवता येईल. नोकरीतील तणाव कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची गरज भासेल. प्रतिष्ठा मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. आर्थिक बाजू सावरता येईल. वादविवादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्या. घरातील लोकांसाठी धावपळ करावी लागेल. किरकोळ गैरसमज होऊ शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मैत्रीत क्षुल्लक वाद संभवतो. संशोधनाच्या कामात यश मिळेल. वरिष्ठ खूश होतील. तुमचा आत्मविश्वास कायम राहील. विद्यार्थी वर्गाने चांगले मित्र निवडावेत. आपण केलेल्या श्रमाचा योग्य मोबदला यशाद्वारे मिळू शकेल. शुभ दि. २४, २८

तुळ :- आपल्या पारिवारिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास आठवडा मनाप्रमाणे जाऊ शकेल. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. थोरामोठ्यांच्या संपर्कात राहाल. लहानसहान गोष्टींना महत्त्व देऊ नका. प्रकृतीस्वास्थ्य जपा. तुमच्याबद्दल गैरसमज पसरवला जाईल. नोकरीत सावध राहा. सामाजिक दर्जा उंचावेल. धंद्यात काम मिळाले तरी अडचणी येतील. हिशोब नीट करा. तुमचे बोलणे कठोर झाल्यास योग्य परिणाम होणार नाही. सर्वत्र प्रतिष्ठा सांभाळा. घरात प्रेमाची माणसे मदत करतील. दूरच्या प्रवासाचा बेत आखाल. संशोधनाच्या कामात तुमचा गोंधळ होईल, पण प्रयत्न सोडू नका. जिद्द ठेवा. यश मिळेल. शुभ दि. २६, २७

वृश्चिक :- कामकाजात आपल्या चातुर्याचा उपयोग करून यशस्वी व्हाल. आपण घेत असलेल्या परिश्रमांना योग्य न्याय मिळाल्याचे समाधान मिळेल. जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवताना सावध राहा. वाटाघाटीत क्षुल्लक अडचणी वाढतील. वरिष्ठांच्या शब्दाचा मान राखा. विरोधकांपासून सावध राहा. आपल्याबद्दल इतरांचा गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या. अतिसाहस टाळा. कार्यक्षेत्रात स्पर्धा वाढेल. नोकरीतील समस्या कमी होईल. एखादा चांगला बदल करताना सर्वांना विश्वासात घेणे क्रमप्राप्त आहे. संशोधनात प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी ध्येय सोडू नये. चांगली संगत ठेवावी. अध्यात्मात मन रमेल. शुभ दि. २२, २७

धनु :- आपल्या परिश्रमांना योग्य न्याय मिळेल. सामाजिक क्षेत्रात आपली वाहवा होईल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्याल. जोडीदाराची साथ मिळेल. यशासाठी आपणास संघर्ष करावा लागेल. भागीदारासोबत किरकोळ मतभेद होऊ शकतात. प्रेमाने प्रश्न सोडवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर संशय घेतला जाईल. प्रतिष्ठेवर टीका होईल. गुप्त शत्रू हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करतील. कुठेही कायदा मोडू नका. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे कौतुक होईल. नोकरीत काम वाढेल. निर्णय घेताना चूक होईल. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. घरगुती प्रश्न सोडवता येईल. विद्यार्थी वर्गाने मोठ्यांचा अपमान करू नये. शुभ दि. २५, २८

मकर :- कार्यक्षेत्रात विविध प्रकारची आव्हाने येण्याची शक्यता असून त्यांना हुशारीने सामोरे जाऊन आपले उद्दिष्ट साध्य करू शकाल. नोकरदारांना दिलासा मिळेल. हितशत्रूंचा ससेमिरा जाणवणार नाही, त्यांच्यावर मात्र अंकुश ठेवावा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढेल. जवळच्या लोकांना दुखवू नका. घरात खर्च वाढेल. धंद्यात सुधारणा करता येईल. त्याचा निर्णय लवकरच घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. पुरस्कार मिळेल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. जीवनसाथी, मुले यांच्यासाठी चांगला निर्णय घेता येईल. प्रकृतीची पथ्ये पाळा. शुभ दि. २२, २६

कुंभ :- हाती घेतलेल्या कामांना सफलता मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. शेतीविषयक कामांना प्रतिसाद मिळेल. धंद्यात किरकोळ अडचणी येतील. कोर्ट केस संपवा. कामगारवर्गाकडून कटकटी होऊ शकतात. जागेसंबंधी समस्या येऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला महत्त्व मिळेल. तुमचा विचार पटवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. सप्ताहाच्या शेवटी कोणताही निर्णय सावधपणे घ्या. जवळचे लोक सहाय्य करतील. कला-क्रीडा क्षेत्रात कांटे की टक्कर द्यावी लागेल. संशोधनाच्या कामात गोंधळ होऊ शकतो. नोकरीत वरिष्ठांची मर्जी पाहूनच मत व्यक्त करा. विद्यार्थी वर्गाने चांगले धोरण सोडू नये. शुभ दि. २४, २८

मीन :- आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. कोणत्याही साहसापासून दूर राहणे योग्य ठरेल. संयम, सत्याची कास, कायदा-नियमांचे पालन करा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. अडचणींवर मात करू शकाल. बिघडलेले संबंध सुधारतील. नवी कल्पना सुचल्याने धंद्यात वाढ करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. लोकप्रियता मिळेल. थकबाकी वसूल होईल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. घर, जमीन, वाहन इत्यादी खरेदी-विक्रीत फायदा होईल. कामाचा पसारा वाढेल, पण त्याचा प्रकृतीवर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्या. प्रवासाचा बेत आखाल. शुभ दि. २२, २६