मेष ः- आर्थिक बाजूचा विचार करता आठवडा समाधानकारक असेल. आपल्या कामाचा व अन्य गोष्टींचा गाजावाजा न करता काम करावे. दुसर्यांची नाराजी ओढवून घेऊ नका, म्हणजे आपले कार्य सफल होण्याची शक्यता राहील. नोकरीत अधिक कामाचा मोबदला आपणास मिळू शकेल. प्रकृतीस्वास्थ्य मात्र जपा. विद्यार्थीवर्गाचे प्रश्न, स्वतःचे आरोग्य, महत्त्वाची कागदपत्रे याबाबत अधिक लक्ष देणे आवश्यक असणार आहे. राजकीय क्षेत्रात आपला जम बसवू शकाल. अचानक प्रवासाचे योग संभवतात. नोकरी-धंद्यात अचानक चांगल्या बदलाची शक्यता राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. ३०, ३
वृषभ ः- आपल्या महत्त्वाच्या कामी ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे म्हणजे कामात सफलता मिळू शकेल. समारंभातील आपली उपस्थिती इतरांचे लक्ष वेधून घेईल. रागावर, अहंकारावर जेवढे योग्य नियंत्रण ठेवता येईल तेवढे ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे यशाचा मार्ग अधिक सुकर होईल. कौटुंबिक वातावरण छान राहील. आर्थिक व्यवहारात सतर्कता ठेवावी लागेल. आपल्याला नोकरी-व्यवसायात मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. मुलांवर लक्ष ठेवा, जेणेकरून ती चांगल्या संगतीत वावरतील. वैवाहिक जीवनात तडजोडीचे धोरण स्वीकारावे. नोकरीत बढतीचे योग संभवतात. प्रकृतीस्वास्थ्य जपा. शुभ दि. २,४
मिथुन ः- आपल्या अपेक्षा उंचावणारा हा आठवडा राहील. नोकरी-धंद्याच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. आपले नियोजित उपक्रम आणि कामे आपल्या मनाप्रमाणे होतील, पण वरिष्ठांची नाराजी पत्करू नका. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा व जिभेवर साखरप्रेरणी करून मार्गक्रम आखणे योग्य ठरेल. प्रयत्नांची जोड देऊन आपण आपल्या कार्यात सफलता मिळवू शकाल. थोरामोठ्यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरेल. काही उत्कृष्ट गोष्टी घडून येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आपण प्रकाशात याल. आलेल्या संधीचा लाभ घेता येईल. कौटुंबिक जीवनात शांतता राहील. आपल्या कामात अधिक लक्ष द्या. शुभ दि. ३१, १
कर्क ः- स्वतःचे आत्मपरीक्षण केल्यास आपल्याकडून चुका होणार नाहीत. येणार्या प्रश्नांना आत्मविश्वासाने सामोरे जा. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. व्यवहारात पारदर्शीपणा ठेवा. नवीन कामे मिळवण्यापेक्षा जुन्या व्यवहारातील वसुली करणे आपल्यासाठी मोलाचे ठरणार आहे. आर्थिक बाजू सुधारण्यास मदत होईल. नोकरदारांना आपले ध्येय साध्य करता येईल. नवी नोकरी शोधणार्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आर्थिक व्यवहार करताना अधिक दक्ष राहा. विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्य मिळू शकेल. आपल्या प्रकृतीबाबत चालढकलपणा करू नका. शुभ दि. ३०, २
सिंह ः- व्यापारात प्रगती साधता येईल. नोकरीत वरिष्ठांशी मिळते-जुळते धोरण स्वीकारा. संयम व सत्याची कास धरणे आपल्यासाठी मोलाचे ठरेल. प्रकृतीच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता राहील. वेळीच उपाययोजना करा. अतिसाहस करण्याचे टाळा. सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा. प्रलोभनांपासून दूर राहणे हितकारक राहील. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक क्षेत्रात तडजोडीचे धोरण ठेवणे हितकारक राहील. विद्यार्थ्यांची रचनात्मक कार्यातील रुची वृद्धिंगत होईल. नातेवाईक व मित्र यांच्या भेटी होतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल. शुभ दि. ३१, ४
कन्या ः- आपणास अपेक्षित असलेल्या बहुतांश गोष्टी साध्य होण्याचा मार्ग सुकर होईल, मात्र कौटुंबिक वातावरण वादासारख्या प्रसंगांनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या. सर्वांशी सामंजस्याने वागा म्हणजे आपणास मानसिक समाधानाचा लाभ घेता येईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. व्यापार-उद्योगाला चालना मिळेल. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रलोभनांपासून दूर राहा. प्रकृतीच्या कुरबुरी राहणार असल्याने काळजी घ्या. प्रवासाचे योग येतील. व्यापाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कोणालाही आश्वासने देऊ नका. आपल्या विजयाची वाट सुलभ होईल. शुभ दि. २९, ३०
तूळ ः- काही नव्या जबाबदार्या अंगावर येण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यात अनेक अडथळे येण्याची शक्यता असल्याने ते दूर करून आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. बौद्धिक गोष्टींना प्राधान्य द्या. भावनेच्या आहारी न जाता योग्य निर्णय घ्या. विरोधकांपासून सावध राहा. त्यांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्या. मुलांकडे अधिक लक्ष द्या. विद्यार्थ्यांना उत्तम यशाची अपेक्षा ठेवता येईल, मात्र कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग संभवतात. घरातील वयस्कर मंडळींच्या प्रकृतीची काळजी घ्या. सामाजिक कार्यात अग्रेसर राहाल. शुभ दि. ३१, १
वृश्चिक ः- व्यापार व्यवसायात आपले कौशल्य दाखवता येईल. हाती घेतलेल्या कामात सफलता प्राप्त कराल. कामाचे योग्य नियोजन करा. त्यातून लाभ होण्याची शक्यता राहील. लहानसहान संधींचा योग्य उपयोग करता येईल. यशाची कमान चढती राहील. आपल्या प्रयत्नांनी रखडत असलेली कामे वेग घेतील. सध्या कोणतेही नवे प्रयोग करू नयेत. शक्यतो कोणालाही नाराज करू नका. वैवाहिक जीवनात समाधान लाभेल. कोर्टकचेर्या, भागीदारीसारख्या गोष्टी अथवा प्रकरणांपासून दूर राहणे हितकारक ठरेल. आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जा. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. आप्तेष्ठांशी सामंजस्याने वागा. शुभ दि. ३०, ४
धनु ः- नोकरी, धंद्यातील अडथळे पार होतील. स्वतःच्या मनाला सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करा. मानसिक शक्तीच्या जोरावर एखादे महत्त्वाचे वा कठीण काम सुलभतेने पार पाडाल. विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. बौद्धिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. नको त्या प्रलोभनांना भुलू नका. प्रकृतीस्वास्थ्य जपा. संयम व शांततेने येणार्या प्रसंगांना सामोरे जा. व्यापार व नोकरीसाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा, जेणेकरून येणार्या अडचणींतून मार्ग काढणे सोपे जाईल. धार्मिक कार्यासाठी प्रवासाचे योग संभवतात. सामाजिक कार्यातील आपला वावर वाढेल. तरुण-तरुणींना प्रगतीची नवी दालने उघडतील. शुभ दि. २९, २
मकर ः- कार्यक्षेत्रात नवीन अधिकार प्राप्त होण्याचे योग आहेत. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागामुळे आपले कौतुक केले जाईल. आपल्या उत्तम वक्तृत्वामुळे लोक आकर्षित होतील. उद्योग, व्यापार, व्यवसाय वा नोकरीत एकत्रित येऊन काम केल्यास कठीण काम सुलभ होईल. टीमवर्कचे महत्त्व समजेल. भावंडांमधील नातेसंबंध दृढ होतील. प्रकृतीस्वास्थ्य आणि आर्थिक चुका या दोन गोष्टींवर योग्य नियंत्रण ठेवल्यास आपणास खूप काही साध्य करता येईल. गुप्त शत्रू कारस्थाने करतील, पण तुम्ही खंबीर राहा. सामाजिक क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळेल. शुभ दि. ३१, ३
कुंभ ः- दुर्बल परिस्थितीवर मात करून पुढे जाल. समाजामध्ये वजन राहील. प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात अचानक झालेले परिवर्तन थक्क करणारे ठरू शकेल. महिला सहकर्मचारी उत्तम सहकार्य करतील, मात्र बोलताना संयम बाळगावा. निर्णय घेण्यास उशीर करू नका. सचोटीचे प्रयत्न यशकारक ठरतील. अडथळ्यांतून मार्ग काढून ध्येयपूर्ती कराल. स्वतःचा अहंकार सध्या बाजूला ठेवा. नोकरी-व्यवसायातील होणारे वादविवाद ताबडतोब थांबवणे योग्य ठरेल. नव्या नोकरीच्या शोधात असणार्यांना अपेक्षित संधी मिळेल. कला क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. मुलांकडून सुवार्ता समजतील. शुभ दि. ३०, ३१
मीन ः- गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी, व्यवसायात आपण निश्चितपणे हळूहळू प्रगती करू शकाल. घरगुती खर्चाचे आकडे वाढणार आहेत, तेव्हा वेळीच त्याचे नियंत्रण करा. आपण भावूक होऊ नका. कामानिमित्त प्रवासाचे योग संभवतात. शक्यतो खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. प्रलोभनांपासून दूर राहा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या कामाचे नियोजन करा. आपले ध्येय निश्चित करा. कोणालाही कर्जाऊ रक्कम देऊ नका, अन्यथा भविष्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीत बरीच सुलभता जाणवेल. आपला आर्थिक स्तर उंचावता येईल. श्रमाचा योग्य मोबदला मिळेल. शुभ दि. २, ३