मेष – नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे. वादविवाद टाळावा. कला क्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. हुशारीने आपण सद्य परिस्थितीतून मार्ग काढू शकाल. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या. आर्थिक बाब ठीक राहील. धंद्यातील तणाव कमी होईल. घरातील व्यक्तींच्या मर्जीनुसार निर्णय घ्याल. तुमच्या कार्यातील अडचणींवर उपाय शोधता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात उत्साह व आत्मविश्वास वाढेल. लोकप्रियता मिळेल. ग्राहकांबरोबर वाद करू नका. संसारात शुभ समाचार मिळेल. संततीकडून एखादी अपेक्षा पूर्ण होईल. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. शुभ दि. 10, 13
वृषभ – पैशांचा योग्य कारणासाठी वापर करा. वरिष्ठांना शब्द देण्यापूर्वी त्यातील जबाबदारीचा अंदाज घ्या. प्रत्येक काम काळजीपूर्वक तपासून बघा. कला, साहित्य अशा क्षेत्रात प्रगती होईल. प्रवासाचे योग येतील. प्रयत्नशील राहिल्यास अडचणींवर मात करू शकाल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची संधी प्राप्त होईल. स्थावरसंबंधी काही चांगले संकेतही मिळू शकतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी सामंजस्याने वागणे योग्य ठरेल. कामावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास आपण कार्यक्षेत्रात पुढे जाऊ शकाल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. घरात एखादे कार्य ठरवले तर त्याची धुरा तुम्हाला स्वीकारावी लागेल. शुभ दि. 8, 11
मिथुन – प्रत्येक बाबतीत संयमाने वागूनच कृती करणे आपल्यासाठी हितकारक राहील. संसारात चांगली बातमी मिळेल. नातलगांचा सहवास लाभेल. आपल्या अधिकाराचा गैरवापर न करता बोलताना अतिशय जपून बोला. आप्तेष्ठांसाठी धावपळ करावी लागेल. स्वतःच्या खाण्या-पिण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. तुम्ही ठरवलेले काम करण्यात अडचणी येऊ शकतात. वाहन जपून चालवा. धंद्यात कोणताही वाद करू नका. तुमच्या ठरवलेल्या कार्यात वेग येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना गती मिळेल. धंद्यात काम मिळेल. गोड बोला. नवीन ओळख होईल. शुभ दि. 12, 14
कर्क – सकारात्मक दृष्टीने वागण्याचा प्रयत्न केल्यास आपण पुष्कळ गोष्टी साध्य करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. जोडीदाराचे आरोग्य जपा. तुमचा उत्साह वाढेल. नातलगांची भेट होईल. खरेदी करता येईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. पैसे वसूल करताना कोणाशीही हुज्जत घालू नका. नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. घरामध्ये मोठ्या व्यक्तीची मते तुम्हाला न पटल्यामुळे दुरावा निर्माण होईल, पण त्यांचे ऐकणे हितावह ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात चांगली योजना पूर्ण करू शकाल. धंद्यात काम मिळेल. प्रवासात घाई करू नका. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. शुभ दि. 10, 11
सिंह – व्यापार उद्योगात तुमचा धोका उगीचच वाढवून घेऊ नका. जिथे खूप अपेक्षा ठेवल्या होत्या तिथे विलंब होण्याची शक्यता आहे. धंद्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. घरात आनंदी वातावरण राहील. मौजमजा तसेच खरेदी करण्याचा विचार कराल. राजकीय-सामाजिक कार्यात एखाद्या व्यक्तीकडून क्षुल्लक तणाव निर्माण होऊ शकतो. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तींचे योग्य सहकार्य मिळेल. वाटाघाटीचा प्रश्न निकाली निघेल. कामगार वर्गाशी मिळते जुळते धोरण ठेवा. संशोधनात यश येईल. विद्यार्थी वर्गात उत्साह राहील. जिद्द ठेवा. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. 9, 13
कन्या – एकाच वेळी अनेक कामे करण्याचा तुम्हाला मोह होईल. व्यापार उद्योगातील पैशांच्या कामात गोंधळ करू नका. नोकरीत तुम्हाला मिळणारे फायदे पाहून सहकार्यांच्या मनात असूया निर्माण होईल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करता येईल. वरिष्ठांची भेट घेण्यात यश येईल. घरातील व्यक्तींना खूश करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. संयमाने पेच प्रसंग सोडवा. महिलांनी खाण्याचे पदार्थ करताना काळजी घ्यावी. धंद्यात वाढ होईल. मैत्री वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कोर्ट केसमध्ये प्रगती होईल. परीक्षेच्या कालावधीत मुलांनी अभ्यासाचा आळस करू नये. शुभ दि. 8, 9
तूळ – घरामध्ये तुमचा सल्ला योग्य असूनही इतरांना तो लगेच पटणार नाही. त्याचा राग मानू नका. सप्ताहाच्या मध्यानंतर पैशांची कामे होतील. नोकरीच्या ठिकाणी सहकारी आश्वासन पाळू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला बेत बदलावे लागतील. वाहन जपून चालवा. तुमच्या प्रत्येक कामात यश येईल. राजकीय-सामाजिक कार्याला दिशा मिळेल. उत्साह आणि धंदा वाढेल. थकबाकी मिळवाल. दूरच्या प्रवासाची संधी मिळू शकेल. खर्च वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखी होतील. मैत्री वाढेल. आवडत्या क्षेत्रात चमकाल. कोर्टकेस यशस्वी होईल. कामात चूक सुधारून पुढे जाता येईल. शुभ दि. 10, 11
वृश्चिक – अचानक ठरवलेला कार्यक्रम बदलावा लागण्याची शक्यता आहे. आपल्या मनाची द्विधा अवस्था होईल. नियोजित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी दमछाक होईल. आपल्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. घरातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करता येईल. खरेदी करताना हिशोब नीट करा. कामगारांना समजून घ्यावे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा आत्मविश्वास खचवण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकांची नाराजी होईल. कला, साहित्य आदी क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवी संधी प्राप्त होईल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. महिलांनी घरातील कामे करताना काळजी घ्यावी. शुभ दि. 8, 13
धनु – भरपूर काम करण्याची तुमची तयारी असेल, परंतु तुमच्या मदतीला कोणीच नसल्यामुळे तुमचे कष्ट प्रमाणाबाहेर वाढतील. तुमचे स्पष्ट बोलणे सत्य असते तरी इतरांना पटणे कठीण होईल. निराश होऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात संयमाने बोला. प्रसंग, वेळ पाहून तुम्ही वागा. धंद्यात गोड बोलून कामगारांकडून काम करून घ्या. खर्च वाढेल. मोठे कंत्राट मिळवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. जोडीदाराशी सामंजस्याने वागा. पैसा मिळेल. कोर्ट केसमध्ये अडचणींवर मात करावी लागेल. विद्यार्थी वर्गाने नियमितपणाने अभ्यास करावा. संशोधनाच्या कामात यश येईल. किरकोळ वाद उद्भवू शकतात. शुभ दि. 9, 10
मकर – व्यापार-उद्योगात बदलत्या वातावरणात काम करावे लागेल. घरामध्ये मोठ्या व्यक्तींशी बोलताना त्यांचा अपमान होणार नाही हे लक्षात ठेवा. प्रवासाचा आनंद घेता येईल. धंद्यात फायदा होईल. थकबाकी मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. वादाचे प्रसंग येतील. घरात वाटाघाटीचा प्रश्न निघेल. राग वाढेल, परंतु संयमाने मार्ग काढा. नाते जपण्याचा प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखी होतील. जुने स्नेही मदत करतील. कोर्टाच्या कामात सावध राहा. संशोधनात प्रगती होईल पण कष्ट पडतील. विद्यार्थी वर्गाने नेहमी नम्र राहावे. आपल्या मनातील शंकांचे निरसन होऊ शकेल. शुभ दि. 12, 14
कुंभ – भावना आणि कर्तव्य यांचा मेळ नीट घाला. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला पुढाकार घेऊन समस्या सोडवावी लागेल. कार्यक्षेत्रात तुमचे कौतुक होईल. जनहिताची योजना मार्गी लावता येईल. धंद्यात मोठे काम मिळवाल. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार होईल. घरगुती समस्या सोडवताना किरकोळ मतभेद होतील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. अहंकार दाखवू नका. धावपळ होईल. गैरसमज निर्माण होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नाव मिळेल. काही नव्या कल्पना सुचतील. कोर्ट केसमध्ये किरकोळ अडचणी येतील. संशोधनाच्या कामात यश येईल. विद्यार्थी वर्गाला पुढे जाण्याचा आश्वासक मार्ग मिळेल. शुभ दि. 9, 13
मीन – आठवड्याची सुरुवात चांगली झाल्याने तुम्हाला हुरूप येईल. व्यापार उद्योगातील महत्त्वाच्या कामासंबंधी बोलणी सप्ताहाच्या सुरुवातीलाच करा. सप्ताहाचा मध्य लाभदायक ठरेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. प्रवासाचे योग येतील. वाद कमी होईल. खाण्याची काळजी घ्या. धंद्यात फायदा होईल. मैत्रीत मात्र पैसा टाकू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. घरातील तणाव प्रेमाने संपवा. मनावर एखादे दडपण येईल. प्रकृतीची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात आपसात मतभेद होतील. कोर्ट केसमध्ये सावध राहा. संशोधनात जास्त मेहनत घ्यावी लागेल. शुभ दि. 11, 13