राशीभविष्य रविवार १९ फेब्रुवारी ते शनिवार २५ फेब्रुवारी २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, मंगळ हर्षल त्रिकोणयोग होत आहे. विरोधकांचा बिमोड योग्यप्रकारे राजकीय-सामाजिक कार्यात करता येईल. सामाजिक स्तरावर मोठे कार्य करता येईल. धंद्यात मोठे काम मिळेल. जवळच्या लोकांना दुखवू नका. व्यवहारामध्ये भावूक व्हाल. कठीण कामे करून घ्या. घर, वाहन घेण्याचे ठरवता येईल. नोकरी मिळेल. संसारात वाद वाढवू नका. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. पुरस्कार मिळवता येईल. अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार टाळा. कोर्टाच्या कामात यशस्वी व्हाल. शोध मोहीम यशस्वी कराल. वरिष्ठ कौतुक करतील. विद्यार्थी वर्गाला पुढे जाता येईल. शुभ दि. १९, २३

वृषभ : या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात काम मिळेल. ओळखी वाढतील. मागील येणे वसूल करा. नोकरीत प्रभाव पडेल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. कठोर बोलणे टाळा. आप्तेष्ठांच्या भेटी होतील. राजकीय-सामाजिक कार्यात लोकांचे सहकार्य मिळेल. मेहनतीने तुमच्या हाती घेतलेल्या योजना पूर्ण करा. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. पुढे जाल. शोध मोहीम यशस्वी करता येईल. कोर्टकेसमध्ये प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. खोटे बोलू नये. स्वतःचे नुकसान होईल. व्यसन करू नका. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. २०, २४

मिथुन ः या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, मंगळ हर्षल त्रिकोणयोग होत आहे. तणावाचा व वादाचा प्रसंग निर्माण होईल. संयम ठेवा. मैत्रीपूर्ण वातावरण ठेवण्यास प्रगती होईल. धंदा वाढवा. अरेरावी नको. मागील येणे वसूल करा. नोकरीत प्रभाव पडेल. घरात शुभ समाचार मिळेल. मुले, जीवनसाथी मदत करतील. राजकीय-सामाजिक कार्यात अधिकारात सहाय्य तुमच्या कार्यासाठी मिळवता येईल. पैशांची गुंतवणूक नीटपणे करून ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात नाव मिळेल. केस जिंकता येईल. विद्यार्थ्यांना नव्या क्षेत्रात प्रगती करता येईल. शिक्षण, नोकरीसाठी परदेशात जाण्याचा योग येईल.
शुभ दि. २१, २५

कर्क : या सप्ताहात चंद्र मंगळ युती, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात कष्ट घ्यावे लागतील. चर्चा वाद निर्माण करेल. मागील येणे वसूल करा. नवे काम मिळवणे सोपे नाही. दादागिरीने वागू नका. नवालौकिकाला काळिमा लागेल. नोकरीत काम वाढेल. मनाविरुद्ध काम करावे लागेल. मित्र मदत करू शकतात. राजकीय-सामाजिक कार्यात गुप्त हितशत्रू अडथळे आणतील. वाद तयार करतील. मारामारी करू नका. पोलिसांपर्यंत प्रकरण जाईल. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साह राहील. कोर्टकेस त्रासदायक वाटेल. शिक्षणात माघार न घेता भरपूर अभ्यास करा. यश येईल. शुभ दि. १९, २२

सिंह : या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, गुरू नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. अडचणी निर्माण होतील. तुम्ही बुद्धिचातुर्याने वागा. कमी बोला. संसारात तणाव होईल. खर्च वाढेल. जीवनसाथी, मुले यांच्याशी मतभेद होईल. नोकरीत प्रभाव पडेल पण दडपण येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागेल. जवळचे लोक दबावतंत्र वापरतील. प्रतिष्ठा राहील. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. स्पर्धेत चुरस, द्वेष अनुभवास येईल. मैत्रीत नाराजी होईल. शोध मोहिमेत सावध रहा. विद्यार्थी वर्गाने योग्य संगत ठेवावी. अभ्यास करावा. शुभ दि. २०, २३

कन्या ः या सप्ताहात मंगळ हर्षल त्रिकोण योग, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. मनोबल टिकवता येईल. धंद्यात वाद होईल. नोकर सोडून जाण्याची धमकी देतील. तुमचे बोलणे कठोर वाटेल. मागील यणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर टीका होईल. तुमचे बोलणे वादाला कारणीभूत होईल. प्रवासात सावध रहा. मारामारी नको. व्यसनाने प्रश्न वाढू शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कोर्टकेस सोपी नाही. विद्यार्थी वर्गाने भ्रमात न राहता अभ्यास करावा. वाकडी वाट घेऊ नका. शोध मोहिमेत यश खेचून आणता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नोकरीमध्ये कामात चूक होईल. शुभ दि. २१, २४

तूळ ः या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, चंद्र गुरू युती होत आहे. धंद्यात मेहनत घेतल्याचा फायदा तुम्हाला होईल. घरातील खर्च वाढेल. मौज-मजेत वेळ घालवाल. नोकरी मिळेल. संधी शोधा. नातलगांच्यासाठी खर्च करताना व्यावहारिक दृष्टीकोन ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल. स्पर्धा करणारे लोक सहवासात येतील. नवीन ओळख वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. प्रेरणा देणारी घटना घडेल. अविवाहितांना लग्नासाठी प्रयत्न करता येतील. शोध मोहीम फत्ते कराल. कोर्टकेस संपवा. कठीण समस्या सोडवा. विद्यार्थी वर्गाने योग्य दिशेने प्रयत्न केल्यास मोठे होता येईल. शुभ दि. २२, २५

वृश्चिक ः या सप्ताहात चंद्र मंगळ युती, गुरू नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. जुना व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतो. ओळखीतून काम मिळवा. नोकरीत किरकोळ मतभेद होईल. जास्त ताणू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला संघर्ष करावा लागेल. गुप्त कारवाया समजून येतील. घरातील कामे होतील. खर्च वाढेल. कला क्षेत्रात विशेष यश मिळवाल. कल्पनाशक्ती वाढेल. कोर्टाच्या कामात मुद्याचे बोला. मित्र मदत करतील. घर, वाहन, जमीन खरेदी-विक्री करता येईल. शोध मोहीम फत्ते कराल. विद्यार्थी वर्गाने मोठ्या यशासाठी झटून अभ्यास करावा. शुभ दि. १९, २१

धनु ः- या सप्ताहात चंद्र बूध लाभयोग, चंद्र गुरू युती होत आहे. क्षुल्लक घटना मन अस्वस्थ करेल. वाद वाढवू नका. नोकरीत प्रभाव पडेल. कठोर बोलू नका. धंद्यात वाढ करता येईल. मागील येणे वसूल करा. घरासाठी खरेदी कराल. आप्तेष्ठ भेटतील. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगती करण्याची तयारी जोरदार करा. योजना बनवा. लोकप्रियता मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक, पुरस्कार मिळेल. तुमच्या क्षेत्रातील लोकांच्या सहवासात रहा. कोर्टकेस जिंकाल. मुलाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करता येतील. शिक्षणात आळस नको. चांगली संगत ठेवा. पुढे जा.
शुभ दि. २०, २२

मकर ः- या सप्ताहात मंगळ हर्षल त्रिकोण योग, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. मागील येणे वसूल करा. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. नवीन ओळखी होतील. रागावर नियंत्रण ठेवा. अचानक राग वाढेल. मारामारीसारखा प्रसंग निर्माण होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढवणारी कामे करा. लोकसंग्रह वाढेल. इतरांच्या बोलण्यावर तुम्ही तुमचा विचार बदलू नका. कायदा पाळा. कला-क्रीडा स्पर्धेत पुढे जाल. मुले तुमच्या मदतीला येतील. कोर्टाच्या कामात यश खेचता येईल. शोध मोहिमेत अडचणीतून मार्ग शोधाल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाचा आळस करू नये. मोठ्यांचे ऐकावे. शुभ दि. २१, २३

कुंभ ः- या सप्ताहात चंद्र गुरू युती, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात काम मिळवता येईल. वाद कमी होईल. मागील येणे वसूल करा. भागीदाराच्या विचार ऐकून घेता येईल. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करून ठेवा. नोकरीत प्रभाव पडेल. वरिष्ठ कौतुक करतील. राजकीय-सामाजिक कार्यात प्रसिद्धी मिळेल. तुमचा मुद्दा कौतुकास्पद ठरेल. घरातील कामे होतील. वाटाघाटीचा प्रश्न सोडवता. येईल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल. कोर्टकेस संपवता येईल. शोध मोहिमेत सप्ताहाच्या शेवटी अडथळा येईल. शिक्षणात चुकीचा विचार नको. परीक्षा वेळेवर द्या.
शुभ दि. २२, २४

मीन ः- या सप्ताहात चंद्र गुरू युती, मंगळ हर्षल त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात येणारी समस्या वाढवू नका. नमते धोरण घेऊन काम मिळवा. मैत्रीतून काम मिळवता येईल. नोकरीत प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वरिष्ठांच्या विरोधात न जाता मत व्यक्त करा. राजकीय-सामाजिक कार्यात चुकीचा मुद्दा उचलून धरू नका. विरोधाला उत्तर द्यावे लागेल. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. कोर्टाच्या कामात अपयश टाळा. बोलताना अरेरावीची भाषा वाटेल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रयत्नाने पुढे जाल. शिक्षणात मिळालेले यश छोट्याशा कारणाने बिघडवू नका. प्रतिष्ठा संभाळा. शुभ दि. २३, २५