Homeभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यHoroscope : रविवार 2 फेब्रुवारी ते शनिवार 8 फेब्रुवारी 2025

Horoscope : रविवार 2 फेब्रुवारी ते शनिवार 8 फेब्रुवारी 2025

Subscribe

मेष :- सर्व कामात यश मिळाल्याने मन आनंदी आणि प्रसन्न राहील. नोकरदार वर्गावर वरिष्ठांची कृपादृष्टी असल्याने पदोन्नती होण्याचा योग आहे. महत्त्वपूर्ण प्रकरणात वरिष्ठांशी मोकळेपणाने चर्चा कराल. आरोग्य चांगले राहील. आर्थिक लाभ, मान-सन्मान मिळेल. घर सजावटीची आवड निर्माण होईल. मनात अनेक विचारांचे काहूर माजेल. आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. मित्र-नातोवाईकांसोबत वाद झाल्याने मन दु:खी होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. अविचाराने वागू नका. गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. आहार-विहारावर नियंत्रण ठेवा. शुभ दि. ५, ८

वृषभ :- आपल्या कामकाजाला जास्त महत्त्व देऊन त्याला योग्य न्याय दिल्यास आपण पुढची वाटचाल करू शकाल. इतरांना बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणेच हितकारक राहील. आपण नको त्या अपेक्षा न बाळगणेच चांगले राहील. आप्तेष्ठांच्या गाठीभेटीचे योग येतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. आपल्या कामाची दाद दिली जाईल. आपल्या सृजनशक्तीला नवे रूप देण्याचा प्रयत्न करणे हितकारक ठरणार आहे. कामाचा योग्य निपटारा करता येईल. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. प्रवासाचे योग संभवतात. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. व्यापार-उद्योगात प्रगती करण्याची संधी मिळू शकेल. शुभ दि. ३, ४

मिथुन :- आपल्या मनातील चिंता दूर झाल्याने उत्साह वाढेल. भावा-बहिणींसोबत मिळून नवे कार्य हाती घ्याल. त्यांच्यासोबत वेळ आनंदात घालवाल. छोटे प्रवास होतील. मित्र-नातेवाईकांच्या भेटीने आनंद होईल. कामात योग्य तंत्राचा अवलंब केल्याने प्रभावी परिणाम दिसून येतील. जिभेवर नियंत्रण ठेवा. रागामुळे तक्रार किंवा वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट घ्यावे लागतील. चुकांमुळे खर्च वाढेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवा. विद्यार्थ्यांना अध्ययनात प्रगती करता येईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. मुलांकडून काही शुभवार्ता ऐकण्यास मिळतील. शुभ दि. २, ६

कर्क :- धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. व्यवहाराला योग्य न्याय द्याल. वरिष्ठांशी वागताना सावधानता बाळगा.
नोकरीधंद्यात थोडासा त्रास सहन करावा लागेल. हितशत्रूंपासून सावध राहा. बौद्धिक क्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. व्यापार-उद्योगात अपेक्षित प्रगती करता येईल. कलाक्षेत्रात उत्तम काम करण्याची संधी प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रात आपला जम बसवता येईल. क्रीडा क्षेत्रात यशाची अपेक्षा ठेवू शकता. कौटुंबिक जीवनात वादासारख्या प्रसंगांना आमंत्रण मिळणार नाही याची दक्षता घ्या. प्रवासाचे योग येतील. नोकरदारांना सहकार्‍यांची मदत होईल. मौजमजेसाठी पैसे खर्च होतील. शुभ दि. ४, ६

सिंह :- कौटुंबिक जीवनातील सुखामुळे आपले मन प्रसन्न राहील. सार्वजनिक जीवनात यश आणि प्रसिद्धी मिळेल. नवीन कपडे तसेच अलंकारांची खरेदी कराल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. व्यापार-व्यवसायात काही काळ महत्त्वाचे निर्णय घेण्याचे कटाक्षाने टाळणे सर्व दृष्टीने योग्य राहील. अचानक प्रवासाचे योग संभवतात. सध्या नवीन कार्याचा शुभारंभ करू नका. बौद्धिक चर्चांपासून दूर राहा. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करणेच आपल्यासाठी इष्ट राहील. वेळप्रसंगी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. प्रकृतीची पथ्ये पाळा. मित्रांच्या गाठीभेटी झाल्याने आनंद होईल. बोलण्यावर ताबा ठेवा. शुभ दि. २, ३

कन्या :- व्यापार-व्यवसायात काहीशी संथपणे पण निश्चित प्रगती साधता येईल. नोकरदारवर्गाने आपल्या हितशत्रूंच्या कारवायांवर कडक नजर ठेवावी व त्यांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. कलागुणांना वाव मिळेल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. कायदा व नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. मित्रमंडळींशी सामंजस्याने वागणेच ठीक राहील. प्रवासाचे योग येतील. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहाल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. धार्मिक कार्यात रस घ्याल. आपल्या योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करा. कोणालाही जामीन राहू नका. शुभ दि. ४, ७

तुळ :- टीमवर्कमध्ये काम केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. वेळेवर काम करणे आणि वेळेवर विश्रांती घेणे खूप महत्त्वाचे आहे. कामात व्यस्त असल्यामुळे तुम्ही कुटुंबाला कमी वेळ देऊ शकाल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पोटाची काळजी घ्यावी लागेल. कायदा व नियमांचे पालन कटाक्षाने करा. आदरणीय व्यक्ती आल्यास त्यांचे आदरातिथ्य करायला कमी करू नका. काही नवीन खर्च समोर येतील. जास्त काम करावे लागेल. भावंडांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. व्यवसायात काही सावधगिरी बाळगावी लागेल. उधारीवर जास्त माल देऊ नये. शुभ दि. २, ५

वृश्चिक :- आपल्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. कायदा व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. खर्चाचे प्रमाण फार वाढणार आहे. तेव्हा प्रथमपासूनच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. हितशत्रूंची चिंता करण्याचे कारण नाही, ते गप्प बसतील. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळू शकेल. कोणत्याही प्रलोभनांना भुलू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा व योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. शुभ दि. ७, ८

धनु :- काही घरगुती प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता राहील, तेव्हा सामंजस्याने परिस्थिती हाताळा. मुलांकडून काही शुभ संकेत मिळण्याची शक्यता राहील. गैरसमजापासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. साहसी कृत्ये टाळा. प्रॉपर्टीची कामे अतिशय विचारपूर्वक करावीत. प्रकृतीबाबत चालढकलपणा करू नये. सर्वांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारणेच योग्य ठरेल. आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करा व आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या मागण्या वाढतील. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. मुलांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्ठांच्या गाठीभेटीचे योग येतील. शुभ दि. २, ६

मकर :- आपल्या योग्य प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळू शकेल. आर्थिक बाजू सावरता येईल. कुटुंबात आनंदाचे वारे वाहतील. आपल्या नियोजित कार्यात विशेष लक्ष द्यावे. वैवाहिक जीवनात गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या. जोडीदाराचा किंवा भागीदाराचा सल्ला मोलाचा राहील. सध्या विरोधकांची धास्ती बाळगण्याचे कारण नाही. त्यांचा विरोध थिटा पडेल. मुलांची प्रगती आपणास सुखावणारी राहील. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते धोरण स्वीकारणेच हितकारक ठरू शकेल. व्यापारीवर्गाने अंधविश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करण्याचे टाळावे. कला क्षेत्राला उत्तम वाव मिळेल. शुभ दि. ५, ८

कुंभ :- नोकरदारांना दिलासा मिळेल. बौद्धिक क्षेत्राला चांगला वाव मिळेल. अचानक प्रवास योग संभवतात. नको त्या प्रलोभनात अडकू नका. आपल्या प्रयत्नांना बर्‍यापैकी प्रतिसाद मिळेल. आपल्या व्यवसायाचा व्यापक विचार करून आपण संथ गतीने पण ठामपणे पुढे जात राहाल. दाम्पत्य जीवन सुखकारक राहील. घरासंबंधीची कामे मार्गी लागतील. कोर्टकचेरीच्या कामात सफलता मिळू शकते. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा. आर्थिक बाजू ठीक राहील. कौटुंबिक वातावरण वादासारख्या गोष्टींनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या. शेतीविषयक कामे मार्गी लागतील. कामाचे नियोजन करणे हितकारक राहील. शुभ दि. २, ७

मीन :- कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. अहंकारापासून दूर राहा. त्यापासून नुकसान होऊ शकते. व्यापारात प्रगतीची संधी प्राप्त होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. आपल्या हितशत्रूंबद्दल चिंता करू नका, पण त्यांना संधी देऊ नका. गोड बोलून कार्यभाग साधण्याचे तंत्र आत्मसात करा. काही जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. सध्या गुंतवणूक करणे टाळा. शुभ दि. ३, ५