Homeभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यHoroscope रविवार 19 जानेवारी ते शनिवार 25 जानेवारी 2025

Horoscope रविवार 19 जानेवारी ते शनिवार 25 जानेवारी 2025

Subscribe

मेष ः- सरळमार्गी यश मिळवण्यासाठी गोड बोलून कार्यभाग साधणे अधिक हितकारक ठरणार आहे. आरोग्याबाबत हा काळ संवेदनशील आहे हे विसरून चालणार नाही. योग्य मार्गाने विचार करून योग्य व्यक्तीच्या सहवासाने केलेली वाटचाल आपल्याला प्रगतीकडे निश्चितपणे घेऊन जाऊ शकेल. कौटुंबिक जीवनात ‘जैसे थे’ परिस्थितीच ठेवणे योग्य ठरेल. वैवाहिक जीवनातील वादविवादाला फाटे फुटणार नाहीत याची दक्षता घ्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही याची दक्षता घ्या. आपली आर्थिक बाजू सावरता येईल. अनावश्यक खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. कोर्टाची कामे सध्या लांबणीवर टाका. शुभ दि. २२, २५

वृषभ ः- आपले कलागुण आणि कौशल्याला चांगली संधी प्राप्त होऊ शकेल. बौद्धिक क्षेत्राला उत्तम वाव मिळू शकेल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेणे शक्य होईल. नोकरी-व्यवसायातील स्थैर्यासाठी प्रयत्नांना यश मिळेल. घरगुती वादाच्या प्रसंगाचे बाहेर पडसाद पडणार नाहीत याची दक्षता घ्या. भावी काळातील आर्थिक बाजू भक्कम करून त्याचा योग्य उपयोग करता येणे शक्य होईल. वैवाहिक जीवनात काही प्रश्न निर्माण झाले तरी त्यातून मार्ग काढता येईल. प्रकृतीची पथ्ये पाळा. वस्तूच्या खरेदीची प्रलोभने टाळण्याचा प्रयत्न करा. नोकरीत काही नव्या जबाबदार्‍या येण्याची शक्यता राहील. शुभ दि. २०, २१

मिथुन ः- आपल्या अंगी असलेल्या सहनशीलतेचा उपयोग करून घेता येईल. आर्थिक व्यवहारात अधिक लक्ष घालून फायदा कसा जास्त होईल याकडे लक्ष पुरवावे. व्यापारात वृद्धी करणार्‍या गोष्टींचा विचार करून मिळणार्‍या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. आपणास चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल. प्रसिद्धीचे वलय प्राप्त होईल. आर्थिक बाजू सावरता येईल. आपल्या प्रतिष्ठेत भर पाडू शकाल. कौटुंबिक जीवनातील येणारे वादविवाद कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांशी मिळते-जुळते घ्या. प्रकृती जपा. मुलांच्या शिक्षणाबाबत चांगला मार्ग काढता येईल. आपल्या प्रयत्नांना बर्‍यापैकी प्रतिसाद मिळेल. शुभ दि. १९, २४

कर्क ः- स्वतःच्या कलागुणांवर विश्वास ठेवून कार्य करण्याचा प्रयत्न कराल. सध्या कोणतीही मोठी आव्हाने स्वीकारू नका. आपल्या अंगीच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. नोकरदारांनी कोणालाही दुखावू नये. सरळ मार्ग अवलंबणे सर्व दृष्टीने चांगले राहील. नको त्या प्रलोभनांपासून दूर राहा. आपल्या कर्तृत्वाला चांगला प्रतिसाद मिळेल. प्रवासाचे योग येतील. आर्थिक बाजू सावरता येईल. एखादा मोठा व्यवहार लाभदायक ठरेल. नोकरीत आपली कसोटी लागणार आहे. आपल्या वैवाहिक जीवनात काहीसा ताणतणाव राहण्याची शक्यता राहील. आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची दक्षता घ्या. शुभ दि. २२, २३

सिंह ः- व्यवसायात दबदबा निर्माण करू शकाल. आपल्या कामाचा व्याप व आवकही वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक व्यासपीठावर वाहवा होईल. आपल्या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद मिळेल. उत्तम काम हीच आपली यशाची पावती राहणार आहे. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. कुणावरही फाजील विश्वास टाकू नका. प्रकृतीच्या कुरबुरी सतावण्याची शक्यता आहे. कोणाचीही नाराजी पत्करू नका. आप्तेष्ठांच्या गाठीभेटीचे योग येतील. सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करावा. शुभ दि. २०, २४

कन्या ः- नोकरदारांना बढतीसंबंधात काही दिवस धीर धरावा लागणार आहे. आर्थिक बाबतीत अपेक्षित भर पडू शकणार आहे. नव्या गोष्टी करण्याच्या फंदात न पडणेच योग्य ठरेल. बौद्धिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक जीवनात काही आनंदाच्या क्षणांचा आनंद घेऊ शकाल. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना चांगला वाव मिळून आर्थिक लाभही घेता येईल. व्यापारात प्रगती करता येईल. सकारात्मक दृष्टिकोन व प्रयत्नांनी आपण यशाची वाटचाल करू शकाल. झोकून देऊन काम करण्याची तयारी ठेवा. दैनंदिन कार्यात गोड बोलून काम करून घेण्याचे धोरण स्वीकारणेच योग्य ठरेल. शुभ दि. २३, २५
तूळ ः- नोकरी-व्यवसायात अनुकूलता लाभणार असून आपले प्रभाव क्षेत्र वृद्धिंगत होईल. कामकाजाचे वेळापत्रक आखून त्याची अंमलबजावणी करावी. फार मोठे प्रवास सध्या टाळावेत. काही महत्त्वाचे व्यवहार आपण मार्गी लावू शकाल. आपल्या कर्तृत्वाला पोषक वातावरण राहील. वरिष्ठांची मर्जी राखता येईल आणि चांगल्या कार्याची वाहवा मिळेल. चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. स्वतःच्या कष्टाने जे मिळेल त्यावर विश्वास ठेवून वागणे आपल्यासाठी हितकारक ठरणार आहे. मुलांचा एखादा प्रश्न मार्गी लावता येणे शक्य होईल. मित्रमंडळींकडून अपेक्षित मदतीचा हात मिळू शकेल. शुभ दि. १९, २४

वृश्चिक ः- नोकरी-व्यवसायात लक्ष देणे अधिक हितकारक ठरेल. आध्यात्मिक क्षेत्रात असणार्‍यांना एखादा चांगला अनुभव येऊ शकेल. दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील. भावंडांच्या बाबतीत काहीसा त्रास सहन करावा लागेल. घरच्या पाठिंब्यावर अवलंबून राहू नका, स्वयंसिद्ध व्हा. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. सध्या जनसंपर्कापासून दूर राहणेच हितकारक ठरणार आहे. नोकरीत बरीचशी सुलभता जाणवेल. आर्थिक बाजू सावरता येईल. अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळण्याचे प्रसंग अनुभवू शकाल. काही सुखद धक्के मिळण्याची शक्यता राहील. शुभ दि. २१, २२

धनु ः- तुमच्या कार्यक्षेत्रात काही आव्हानांचा सामना करावा लागेल. नवीन अनुभव मिळण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. तुमच्यावर अधिक जबाबदारी येऊ शकते. काही मोठ्या निर्णयांची आवश्यकता असेल. सामाजिक आणि व्यावसायिक बाबतीत प्रगती होईल. प्रेमाच्या बाबतीत अधिक संवेदनशील राहू शकता. शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. प्रेम आणि नातेसंबंधांत सामंजस्य राखण्याचा प्रयत्न करा.
विचारांची स्पष्टता आणि मानसिक संतुलन महत्त्वाचे ठरेल. मानसिक शांतता राखण्यासाठी आराम करणं महत्त्वाचं ठरेल. अनावश्यक खर्च टाळा. शुभ दि. १९, २०

मकर ः- कौटुंबिक जीवनात आपला खर्‍या अर्थाने कस लागणार आहे. आपल्या हातून आर्थिक चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. कौटुंबिक मतभेद त्वरित मिटवा. आपल्या हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवा. नव्या गोष्टी शिकायला मिळाल्याने आपल्या अंगी असलेल्या कौशल्यात भर पडेल. नोकरीत स्वतःचा दबदबा निर्माण करण्याची संधी आपणास मिळेल. आर्थिक बाजू सावरता येईल. प्रवासाचे योग येतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. कामकाजात गुंतून राहणेच हितकारक ठरणार आहे. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. सामाजिक क्षेत्रात मानमरातब मिळण्याची संधी प्राप्त होईल. शुभ दि. २२, २५

कुंभ ः- कौटुंबिक जीवनात सामंजस्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक बाबतीत काही नवे निर्णय घेणे आवश्यक ठरेल. तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. इतरांशी उत्तम संवाद साधता येईल. आर्थिक स्थितीत बर्‍यापैकी सुधारणा होईल. प्रेमाच्या बाबतीत समजूतदारपणा आणि सामंजस्य आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्यांचे समाधान करण्यासाठी योग्य उपाय शोधा. आपल्या हितशत्रूंची धास्ती बाळगण्याचे कारण नाही. नव्या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष द्या. नोकरदारांनी नव्या कामात अधिक लक्ष द्यावे. वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. मुलांचे प्रश्न सामोपचाराने सोडवू शकाल. शुभ दि. २०, २४

मीन ः- आपले सहकारी व वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील ज्येष्ठांशी होणारे मतभेद व गैरसमज वाढण्याची शक्यता असल्याने याबाबत अधिक दक्ष राहा. मुलांच्या प्रगतीच्या वार्तांनी घरातील वातावरण चांगले राहील. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. नव्या व्यक्तींच्या परिचयाचा लाभ घेता येईल. विनाकारण सर्वांना मदतीचा हात पुढे करू नका. नोकरी-व्यवसायात मिळणार्‍या संधीचा योग्य उपयोग करून लाभ घेता येईल. कुटुंबातील जटील प्रश्न लांबणीवर टाकणेच योग्य ठरेल. मेहनतीने उद्दिष्ट गाठू शकाल, कायदा मात्र कटाक्षाने पाळा. कोर्टाच्या प्रकरणात सामोपचाराने तडजोड करणेच ठीक राहील. शुभ दि. २३, २५