Homeभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यHoroscope : रविवार 5 जानेवारी ते शनिवार 11 जानेवारी 2025

Horoscope : रविवार 5 जानेवारी ते शनिवार 11 जानेवारी 2025

Subscribe

मेष :- आपल्या कार्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाजू सुधारेल. व्यापारात प्रगती कराल. लेखकवर्गाला हा काळ चांगला राहील. आपली प्रकृती जपा. बौद्धिक क्षेत्राला चांगला वाव मिळेल. आपले अंदाज योग्य निघतील. शब्द नेहमी अतिशय जपून वापरा. आपला स्पष्टपणा काही काळ बाजूला ठेवा. सामंजस्याने एकूण परिस्थिती हाताळा. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. निराश न होता धिराने कामाला लागा व आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अध्ययनात प्रगती व यश मिळवता येईल. आपले नियोजित कार्य आणि उपक्रम सुरू ठेवता येतील. शुभ दि. 8,10

वृषभ:- नोकरी-व्यवसायातील कामाचा व्याप वाढीला लागेल. काही चांगल्या गोष्टी पेरून ठेवल्यास त्याचा भावी काळात उपयोग होऊ शकेल. आपले प्रयत्न कारणी लागू शकतील. विरोधकांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्या. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. थोरामोठ्यांचा सहवास लाभेल. नव्या परिचयातून आपला व्यवसायाचा विस्तार करणे सोपे होईल. कला क्षेत्रात उत्तम प्रगती साधता येईल. प्रवासाचे बेत साध्य होतील. कला, विज्ञान, शिक्षण, व्यापार अशा क्षेत्रांत प्रगती साधता येईल व आर्थिक बाजू सावरता येईल. कोर्टकचेरीच्या कामात सफलता जाणवेल. नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे. शुभ दि. 5,6

- Advertisement -

मिथुन:- नव्या ओळखींचा व्यवसाय-उद्योगासाठी उपयोग करून घेता येईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. आपल्या कार्याचे कौतुक होईल. महिलांना आपल्या मनाप्रमाणे खरेदी करता येईल. प्रवासाचे योग येतील. कामकाजात व्यग्र राहाल. प्रकृतीची पथ्ये पाळा. आर्थिक व्यवहारात सावध राहा. नको ती प्रलोभने टाळा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. कला, साहित्य, नोकरी, जनसंपर्क अशा क्षेत्रांत उत्तम कार्य करण्याची संधी मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईगडबड टाळा. प्रवासात सावध राहा. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. शुभ दि. 8,11

कर्क:- कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप पाडू शकाल. आपण प्रत्येक कृतीत तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास पुष्कळसे प्रश्न सोपे होऊ शकतील. कोणताही प्रश्न प्रतिष्ठेचा, मीपणाचा करणे हितकारक ठरणार नाही हे लक्षात ठेवा. आपली आर्थिक बाजू सुधारेल. आपल्या बोलण्यात सामंजस्याची झालर असणे आवश्यक ठरेल. गोड बोलण्याने आपल्या कार्यात सहजता मिळेल. व्यापार, कृषी, नोकरी, विज्ञान, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत आपण बाजी मारू शकाल. आपल्या कृतीतून गैरसमज होणार नाहीत याची खबरदारी घ्या. नको त्या प्रलोभनात अडकू नका. अचानक प्रवास संभवतो. शुभ दि. 7,10

- Advertisement -

सिंह:- आपल्या अंगी असलेल्या कर्तृत्वाला वाव मिळेल. जागेचे प्रश्न, कौटुंबिक समस्यांतून मार्ग काढता येईल. भावनाप्रधान न राहता वस्तुस्थितीचा विचार करून वागण्याचा प्रयत्न करा. नोकरी, व्यवसाय, राजकारण, कला क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. आपली प्रकृती जपा. कोणालाही शब्द अथवा आश्वासने देऊ नका. आपले कार्य साध्य होण्यासाठी गोड बोलून कार्यभाग साधण्याचे धोरण स्वीकारा. घरगुती प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवहाराच्या बाबतीत कोणावरही संपूर्ण विश्वास न ठेवता त्याची शहानिशा करावी. नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा. शुभ दि. 9, 10

कन्या:- आपल्या प्रयत्नांनी, चिकाटीने, सत्प्रवृत्तीने आपण आपले कार्य साध्य करू शकाल. यशाची घोडदौड सुरू राहील. आर्थिक बाजू सावरता येईल. आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवता येईल. आपल्या विरोधकांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळेल. कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या दिशेने आपण पुढे सरकू शकाल. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. प्रकृतीची पथ्ये पाळा. काही चांगल्या सुखद गोष्टी घडण्याचा आनंद मिळेल. नवे परिचय लाभदायक ठरतील. नको त्या प्रलोभनांना मात्र भुलू नका. आपल्या जबाबदार्‍या पार पाडू शकाल. शुभ दि. 6, 11

तूळ:- बौद्धिक क्षेत्राला उत्तम वाव मिळू शकेल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेणे शक्य होईल. भावी काळातील आर्थिक बाजू भक्कम करून त्याचा योग्य उपयोग करता येणे शक्य होईल. वैवाहिक जीवनातील वादविवादाला फाटे फुटणार नाहीत याची दक्षता घ्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही याची दक्षता घ्या. नव्या परिचयाचा लाभ घेता येईल. बोलण्याचा प्रभाव इतरांवर पाडाल. अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. अडचणीतून मार्ग काढावा लागणार आहे. आर्थिक बाजू सावरता येईल. स्पर्धा, साहसी कृत्ये यांपासून दूर राहा. प्रवासात सावध राहा. आर्थिक व्यवहारात सतर्क राहा. शुभ दि. 5, 8

वृश्चिक:- भावी काळासाठीच्या योजना आखता येतील. गैरसमज, हटवादीपणा यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. नव्या व्यवहारामध्ये कागदपत्रे, व्यावहारिक गोष्टी याचा पूर्ण विचार करूनच त्याचा मागोवा घ्यावा. उधारी वसूल करण्यावर अधिक भर देऊन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करावा. सध्या मोठी आव्हाने स्वीकारणे टाळा. आपल्या बौद्धिक गोष्टींना उत्तम चालना मिळेल. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. चांगल्या घटनांनी काहीसे समाधान मिळू शकेल. समाजात आपली प्रतिमा चांगली ठेवता येईल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्याल. शुभ दि. 10, 11

धनु:- योग्य व्यक्तीच्या सहवासाने केलेली वाटचाल आपल्याला प्रगतीकडे निश्चितपणे घेऊन जाऊ शकेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात ‘जैसे थे’ परिस्थितीच ठेवणे योग्य ठरेल. आर्थिक बाजू सावरता येईल. आवक वाढली जाण्याची शक्यता असली तरी अनावश्यक खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. कोर्टाची कामे सध्या लांबणीवर टाका. वैवाहिक जीवनात काही प्रश्न निर्माण झाले तरी त्यातून मार्ग काढता येईल. प्रकृतीची पथ्ये पाळा. नोकरी-व्यवसायातील स्थैर्यासाठी आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेणेच उचित ठरेल. आपल्या अंगी असलेल्या सहनशीलतेचा उपयोग करून घेता येईल. शुभ दि. 7, 9

मकर:- नोकरीत आपल्या आवडीचे काम मिळण्याची संधी प्राप्त होईल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. नको त्या प्रलोभनात अडकू नका. प्रकृतीची पथ्ये पाळा. कामात एकाग्रपणा ठेवा. आपल्या यशाचा मार्ग अधिक सुकर होईल. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. घरातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागू शकतील. विरोधकांच्या कारवायांवर मात्र बारीक नजर ठेवा. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक व्यवहारात सतर्क राहा. जीवनात काही चांगल्या गोष्टी घडतील. आपल्या कलागुणांना, कौशल्याला चांगली संधी प्राप्त होऊ शकेल. नव्या वास्तूच्या स्वप्नपूर्तीस बँकेकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ दि. 5, 8

कुंभ:- मुलांकडून शैक्षणिक क्षेत्रातील सुवार्ता समजतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. सरळमार्गी यश मिळवण्यासाठी गोड बोलून कार्यभाग साधणे अधिक हितकारक ठरणार आहे. आरोग्याबाबत हा काळ संवेदनशील आहे हे विसरून चालणार नाही. प्रकृतीबाबत हयगय करू नये. आर्थिक बाजू सावरता येईल. अनपेक्षित होणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. घरगुती वादाच्या प्रसंगाचे बाहेर पडसाद पडणार नाहीत याची दक्षता घ्या. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. नोकरीत काही नव्या जबाबदार्‍या येण्याची शक्यता राहील. प्रयत्नांना प्रतिसाद मिळेल. आपल्या प्रतिष्ठेत भर पाडू शकाल. शुभ दि. 9, 10

मीन:- नोकरी-व्यवसायात अनुकूलता लाभणार असून वादविवादात अडकून न पडता येणार्‍या प्रश्नांना तयारीने सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रातील आपले अंदाज अचूक निघतील. व्यवहारात फायदा होण्याची शक्यता राहील. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. सरळ मार्ग अवलंबणे सर्व दृष्टीने चांगले राहील. आपले प्रभाव क्षेत्र वृद्धिंगत होईल. कामकाजाचे वेळापत्रक आखून त्याची अंमलबजावणी करावी. काही महत्त्वाचे व्यवहार आपण मार्गी लावू शकाल. आपल्या प्रयत्नांना बर्‍यापैकी प्रतिसाद मिळेल. संघर्षातून मिळणार्‍या यशाचे मोल फार मोठे असते याची प्रचिती येईल. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. शुभ दि. 7, 11

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -