घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार ४ जून ते शनिवार १० जून २०२३

राशीभविष्य रविवार ४ जून ते शनिवार १० जून २०२३

Subscribe

मेष : या सप्ताहात मिथुन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर अडचण येईल. वाद होईल. तणाव वाढवू नका. धंद्यात प्रगती होईल. रागावर ताबा ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिमा उजळेल. लोकसंग्रह वाढेल. थोरा-मोठ्यांचा परिचय होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. सर्व सोपे नाही. प्रयत्नाने साध्य करता येईल. घरातील कामे होतील. जवळची माणसे मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन लोकांशी ओळख होईल. उत्साह वाढेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल.
शुभ दि. ४, ८

वृषभ : या सप्ताहात मिथुनेत सूर्य प्रवेश, सूर्य, गुरू प्रतियुती होत आहे. धंद्यात समस्या आली तरी काम मिळेल. फायदा होईल. भागीदाराशी वाद होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या मध्यावर विरोध होईल. तुम्हाला मिळालेले यश इतरांना बोचेल. प्रतिष्ठा राहील. नोकरीत प्रगती होईल. घर, वाहन, घेण्याचा विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन ओळखीमुळे काम मिळण्याचा फायदा होईल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. संशोधनाच्या कामात तप्तरता दाखवा. वरिष्ठांची मदत घेता येईल. विद्यार्थी वर्गाला मागे राहण्याची गरज नाही. परदेशात जाण्याचा प्रयत्न करता येईल. शुभ दि. ५, ९

- Advertisement -

मिथुन : या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश करीत आहे. चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमची प्रतिष्ठा जपा. जवळचे लोक अडथळे आणतील. गुप्त कारवाया होतील. घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. आर्थिक व्यवहारात सावध रहा. कला-क्रीडा क्षेत्रात तुमच्याबद्दल नाराजी व्यक्त होऊ शकते. मैत्रीत दुरावा येईल. संशोधनाच्या कामात दगदग होईल. नोकरीत कायद्याचे पालन करूनच निर्णय घ्या. कोर्ट केस जिंकणे कठीण आहे. विद्यार्थी वर्गाने चिकाटी कायम ठेवून अभ्यास करावा. चांगली संगत सोडू नये. शुभ दि. ६, १०

कर्क : मिथुन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठांना तुमचे विचार लवकर सांगून टाका. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. घरातील समस्या सोडवता येईल. मनाचा उत्साह राहील. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन लोकांचा परिचय होईल. प्रेमाला चालना मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. संशोधनाचे काम याच सप्ताहात संपवा. गुप्तशत्रूंची कारस्थाने ओळखून ठेवा. त्याचा पुढे उपयोग होईल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. कायदा मोडू नये. शुभ दि. ४, ७

- Advertisement -

सिंह : या सप्ताहात मिथुनेत सूर्य प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात चांगली संधी दवडू नका. मेहनत घ्या. मोठे काम मिळेल. घर, जमिनीसंबंधी काम करून घ्या. ओळखीचा उपयोग त्यासाठी करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व टिकून राहील. वाटाघाटीची चर्चा वेळच्या वेळी करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. थकबाकी वसूल करा. नोकरीत प्रगती होईल. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. विद्यार्थी वर्गाने मौज-मजा कमी करून अभ्यासात लक्ष द्यावे. तरच पुढे जाल. शुभ दि. ५, ८

कन्या : या सप्ताहात मिथुन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला क्षुल्लक वादविवाद होईल. धंद्यात दुर्लक्ष करू नका. जम बसवता येईल. थकबाकी वसूल करा. घरातील समस्या कमी होईल. गैरसमज दूर करण्याची संधी राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला मिळेल. लोकांची कामे करून लोकप्रियता वाढेल. वाटाघाटीत यश मिळेल. पद मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन ओळखी होतील. नवे काम मिळेल. साहित्याला नवा विषय मिळेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. मनाप्रमाणे बदली करून घेता येईल. विद्यार्थी वर्गाने परीक्षा द्यावी. आळस करू नये. शुभ दि. ६, ९

तूळ : या सप्ताहात मिथुन राशीत प्रवेश करणारा सूर्य तुमच्या कार्यात यश देणारा ठरेल. तरीही संयम ठेवा. उतावळेपणा कुठेही करू नका. चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसवा. पैसे योग्य ठिकाणी गुंतवा. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव होईल. मनावर दडपण येईल. यशासंंबंधी शंका येईल. पद मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात वादविवाद होईल. मैत्रीत गैरसमज होईल. अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार करताना काळजी घ्या. प्रेमात फसगत होईल. पोलिसी संशोधन कार्यात मेहनत घ्यावी लागेल. शनिवारी तुम्हाला चांगली खबर मिळेल. शुभ दि. ७, १०

वृश्चिक : या सप्ताहात मिथुनेत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला महत्त्वाचे काम करून घ्या. नंतर अडचणी येतील. धंद्यातसुद्धा तडजोड करावी लागेल. नवे कंत्राट मिळवण्याचा जिद्दीने प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक कार्यात यश मिळेल. वाटाघाटीची चर्चा चांगली होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. मोठे आश्वासन मिळेल. कोर्ट केस जिंकता येईल. बेसावध राहू नका. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने ऐषोआरामात वेळ घालवू नये. अभ्यास करावा. घरातील कामे लवकर पूर्ण करा. शुभ दि. ४, ६

धनु : या सप्ताहात मिथुनेत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. तुमचा आत्मविश्वास शाबूत राहील, परंतु अडचणी येतील. क्षुल्लक वाद वाढवू नका. मोठेपणाची भाषा कुठेही करून उपयोगी ठरणार नाही. धंद्यात मोठे काम घेता येईल. घरातील व्यक्तींची नाराजी होऊ शकते. वाटाघाटीचा प्रश्न मार्गी लावा. राजकीय-सामाजिक कार्यात संमिश्र वातावरण राहील. विरोधक तुमच्याशी अरेरावीने वागतील. यश सोपे नाही. प्रतिष्ठा सांभाळा. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. संशोधनाच्या कामात मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थी वर्गाने नम्रपणे वागावे. शुभ दि. ५, ७

मकर : या सप्ताहात मिथुनेत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धावपळ जास्त होईल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. धंद्यात मेहनत घ्या, तरच काम मिळेल. वादाला जास्त महत्त्व देऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात सुरुवातीलाच कामे करा. दौर्‍यात यश मिळेल. तुमचे बोलणे कडवट वाटेल. संसारात एखादी चांगली बातमी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. विरोधकांना चेतावणी देण्यापेक्षा लोकांना आपलेसे करा. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. परदेशात नोकरी मिळू शकेल. विद्यार्थी पुढे जातील. शुभ दि. ६, ८

कुंभ : या सप्ताहात मिथुन राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध युती होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर राजकीय सामाजिक कार्यात तणाव निर्माण होईल. तुमच्या विरोधात विधान केले जाईल. धंद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. घरातील व्यक्तींसाठी वेळ द्यावा लागेल. खर्च वाढेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. प्रवासात घाई करू नका. वाहन हळू चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर मोठा व्यवहार करणे ठीक नाही. त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. संशोधनाच्या कामात मेहनत वाढेल. विद्यार्थ्यांनी वेळ फुकट न घालवता अभ्यासात लक्ष द्यावे.
शुभ दि. ७, ९

मीन : या सप्ताहात मिथुनेत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. प्रगतीची संधी तुम्हाला मिळेल. रागावर ताबा ठेवा. मेहनत घ्या. धंद्यात मोठे काम मिळेल. कायद्यात रहा. नवीन ओळखीमुळे फायदेशीर कामे मिळतील. राजकीय-सामजिक कार्यात उत्साह वाढेल. मोठ्या लोकांचे सहाय्य मिळेल. पद मिळेल. लोकप्रियता वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. आर्थिक लाभ होईल. संशोधनात प्रगती होईल. नोकरीत चांगला बदल होईल. परदेशात जाण्याची संधी शोधा. कोर्ट केस जिंकाल. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे यश मिळेल. विवाहासाठी योग्य स्थळे मिळतील. शुभ दि. ८, १०

- Advertisment -