मेष ः- आपल्या आवडत्या विषयास वेळ देण्याचा आपला मानस राहील. कलाक्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक मतभेद बर्याचदा गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असल्याने वेळीच सामोपचाराने ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. मनात योजलेल्या गोष्टींना पूरक वातावरण उपलब्ध होईल. क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना यशाची अपेक्षा ठेवता येईल. धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. स्पर्धा परीक्षेत आत्मविश्वासाने भाग घेऊन यशाची वाट सुलभ करण्याची मानसिकता राहील. प्रकृतीमान ठीक असले तरी खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. शुभ दि. ३, ८
वृषभ ः- प्रत्येक व्यक्तीची मर्जी सांभाळणे शक्य होणार नाही, पण आपल्याबद्दल गैरसमज होणार नाहीत याची काळजी घेणे हितकारक राहील. हाती घेतलेल्या नवीन योजनांना अपेक्षित गती मिळू लागेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याअगोदर त्याची साधक-बाधक चौकशी करूनच निर्णय घ्यावा. आपले स्वत:चे अवलोकन केल्यास उपयुक्त ठरेल. कायद्याचे पालन कटाक्षाने करा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळू शकेल. अध्ययनात यशाची अपेक्षा ठेवू शकाल. मोठ्या खरेदीचे बेत आखाल. अनावश्यक खर्च टाळा. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. कामाचा उत्साह वाढीस लागेल. शुभ दि. ५, ६
मिथुन ः- आपल्या स्वभावात संतुलन ठेवून वागण्याचा प्रयत्न केल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य करणे शक्य होईल. भविष्याची चिंता न करता वर्तमानातील गोष्टींचा आनंद घ्यावा. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्ठांच्या गाठीभेटी होतील. धार्मिक कार्यात सहभागी होता येईल. व्यापाराला चालना मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आपले म्हणणे पुढे दामटू नका. काही जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा. गरजू लोकांना मदत करणे हितकारक ठरू शकते. व्यापारात प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना उत्तम काळ असून अध्ययनात यशाची अपेक्षा ठेवू शकाल. शुभ दि. २,३
कर्क ः- आपल्या कौटुंबिक जबाबदार्या वाढण्याची शक्यता असल्याने त्यांना प्राधान्य द्यावे लागेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. कुठलीही प्रलोभने टाळा. विद्यार्थ्यांनी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचा अवलंब केल्यास योग्य उपयोग होऊ शकेल. शेतीविषयक कामात प्रगती करता येईल. नोकरदारांनी आपल्या वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारणे हितकारक असून वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आपल्या आवडीच्या क्षेत्रात आगेकूच करण्याची संधी मिळेल. आपली आर्थिक बाजू सावरता येईल. जागेसंबंधीच्या प्रश्नांना चालना मिळेल. शुभ दि. ६, ८
सिंह ः- शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून योग्य समन्वयाने नियोजित गोष्टी साध्य करू शकाल. स्थावर गोष्टींबाबत योग्य मार्ग मिळेल. कामाचा उत्साह राहील. हितशत्रूंना संधी देऊ नका. प्रकृतीबाबत खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. विद्यार्थ्यांनी अधिक श्रम घ्यावेत. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून अपेक्षित मदत मिळेल. विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. नोकरी-व्यवसायात पुष्कळशा गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. सध्या धाडसी निर्णय घेण्याचे शक्यतो टाळा. सार्वजनिक क्षेत्रात अधिक सक्रिय राहू शकाल. शुभ दि. २,७
कन्या ः- काही नव्या जबाबदार्या अंगावर पडण्याची शक्यता आहे. नव्या व्यक्तीचा परिचय संभवतो. धार्मिक कार्याचा आनंद घ्याल. प्रकृतीमान ठीक असले तरी खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. नातेसंबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहा. मागचा-पुढचा विचार करूनच पुढचे पाऊल उचला. कोणत्याही प्रलोभनात अडकू नका. नोकरदारांना दिलासा मिळू शकेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आपली कामाची ऊर्जाशक्ती वाढलेली दिसेल. काही नव्या गोष्टी शिकण्याचा आपला प्रयत्न राहील. सरकारी नियमांचे पालन करा. अनावश्यक खर्च टाळा. कामाचे योग्य नियोजन करा. शुभ दि. ३, ५
तुळ ः- नोकरी, व्यवसायात आगेकूच करता येईल. हितशत्रूंच्या कारवायांबाबत सध्या चिंता करू नये. आपला आत्मविश्वास वाढीस लागेल. वेळप्रसंगी ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. प्रवासात सावधानता बाळगावी. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. जीवनशैलीत काही बदल करू शकाल. निर्णय प्रक्रियेत वास्तवाचे भान ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्या कामाचे योग्य नियोजन करून ते अमलात आणणे महत्त्वाचे असणार आहे. जोडीदाराची साथ मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. आपल्या वागण्यात नम्रता ठेवणे हितकारक ठरू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन रमवण्याचा प्रयत्न करावा. शुभ दि. २,४
वृश्चिक ः- अडथळ्यांना धीराने, विचाराने सामोरे जाऊन त्यातून योग्य मार्गावर जाण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. नोकरीत काहीसा दिलासा मिळेल. राजकीय क्षेत्रात आपला जम बसेल. आपली बलस्थाने कोणती आहेत याचा आढावा घेऊन त्याचा पाठपुरावा करणे योग्य राहील. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. वैवाहिक जोडीदाराची अपेक्षित मदत मिळेल. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याची पद्धत अवलंबावी. प्रवासात सावधानता बाळगा. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. कोणत्याही प्रलोभनात अडकू नका. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा. बोलताना शब्दांवर योग्य नियंत्रण ठेवल्यास आपली बाजू उत्तम राहील. शुभ दि. ६, ७
धनु ः- आपले सहकारी, कौटुंबिक ज्येष्ठ व्यक्ती यांना आपल्या कार्यात समाविष्ट करून घेतल्यास आपल्या नियोजित कार्यात यशाचा मार्ग सुकर होऊ शकेल. मानापमानाच्या किरकोळ गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नये. प्रवासाचे बेत साध्य करता येतील. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. काही घटना आपणास त्रास देऊ शकतात. त्यांना जास्त महत्त्व न देता धैर्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करा. माणसांची पारख करा. नव्या प्रस्तावांना चालना मिळू शकेल. कलाक्षेत्रात अग्रेसर राहण्याची संधी प्राप्त होईल. काही शुभ संकेत मिळतील. जोडीदाराच्या नात्यात परिपक्वता येईल. काही जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. शुभ दि. २,५
मकर ः- नियोजनपूर्वक काम करण्याचा प्रयत्न केल्यास आपण बर्याचशा गोष्टी साध्य करू शकाल. वेळेचा योग्य उपयोग करा आणि कामाचा निपटारा करून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात आपण आगेकूच करू शकाल. विद्यार्थ्यांना अध्ययनात यशाची अपेक्षा ठेवता येईल. परिश्रम करण्यास टाळाटाळ करू नका. आपल्या रागावर योग्य नियंत्रण ठेवणे हितकारक ठरणार आहे. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक बाजू ठीक राहील. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. मुलांबाबत एखादा ठोस निर्णय घ्यावा लागेल. सरकारी नियमांचे व कायद्याचे कटाक्षाने पालन करणे आपल्या दृष्टीने हितकारक ठरणार आहे. शुभ दि. ४, ८
कुंभ ः- प्रत्येक कामात दुसर्याचा हातभार लागतो हे ओळखून सर्वांना एकत्रित होऊन कामाचा निपटारा करणे हितकारक ठरू शकते. महत्त्वाच्या कामी ज्येष्ठांचा, वडीलधार्या मंडळींचा सल्ला बर्याचदा मोलाचा ठरतो. या गोष्टीचे अनुकरण केल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य करू शकाल. नोकरदार जिद्द, विवेक व कल्पकतेचा वापर करून यश मिळवू शकता. विद्यार्थ्यांनी अध्ययनात अधिक परिश्रम घेणे योग्य राहील. वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. नियोजनपूर्वक काम करा. कुटुंबाकडून चांगली साथ मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे आवश्यक राहील. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवावे. शुभ दि. ३, ६
मीन ः- आपल्या कामकाजाला चांगला प्रतिसाद मिळेल. चांगल्या कामाची थाप आपल्या पाठीवर पडण्याची शक्यता राहील. आर्थिक बाबतीत नेहमी सावध राहा. कोणावरही फाजील विश्वास टाकू नका. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. आपण दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करावा. आप्तेष्ठांच्या गाठीभेटीचे योग येतील. क्षुल्लक कारणाने घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करू शकाल. आपल्या बोलण्यात आणि वागण्यात सामंजस्य, नम्रपणा असणे हितकारक ठरणार आहे. यशाच्या मार्गावर वाटचाल करणे शक्य होईल. नको त्या प्रलोभनात अडकू नका. शुभ दि. २,५