Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यHoroscope : रविवार 10 नोव्हेंबर ते शनिवार 16 नोव्हेंबर 2024

Horoscope : रविवार 10 नोव्हेंबर ते शनिवार 16 नोव्हेंबर 2024

Subscribe

मेष :- जी खडतर वाटचाल तुम्ही पार केली, त्याचे चांगले फळ नजरेच्या टप्प्यात येईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर झालेल्या अन्यायाचे निराकरण करतील. घरातील कामात धावपळ होईल. क्षुल्लक कारणाने मन अस्थिर राहील. घरातील व्यक्ती तुमची मदत करतील. प्रकृतीची काळजी घ्यावी. घरात आनंदाची बातमी मिळेल. डावपेच यशस्वी होतील. काळाची गरज म्हणून कार्यपद्धतीत बदल करणे क्रमप्राप्त होईल. एकंदरीत कामकाज मनाप्रमाणे राहील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेस जिंकता येईल. जिद्दीने काम पूर्ण करा. संशोधन कार्यात यश येईल. विद्यार्थीवर्गाने अभ्यासात आळस करू नये. शुभ दि. 12, 14

वृषभ :- नोकरीमध्ये स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. तुमचा मूडही स्वच्छंदी आणि आनंदी असेल. तुमच्या बुद्धीला सतत काहीतरी खाद्य लागते. तसे ते मिळाल्यामुळे तुम्ही खूश असाल. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. घरातील कामे न केल्याने जीवनसाथी, मुलांची नाराजी होऊ शकते. घरात किरकोळ वाद होईल. खर्च वाढेल. नातलगांना मदत करावी लागेल. धावपळ होईल. राजकीय-सामाजिक कार्यात लोक तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. सामूहिक कामामध्ये पुढाकार घ्याल. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे काम तुम्हाला करावेसे वाटेल. शुभ दि. 13, 14

- Advertisement -

मिथुन :- घरात किरकोळ अडचणी येतील. मूड परत येण्यास वेळ लागेल. धंद्यात चांगली प्रगती होईल. नवीन लोकांची ओळख होईल. आप्तेष्ट, मित्र यांचा सहवास मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत तयार कराल. नोकरीत तुमचा प्रभाव राहील. राजकीय-सामाजिक कार्यात योजना मार्गी लावा. वरिष्ठांच्या समवेत चर्चा सफल होईल. संशोधन कार्यात अडचणी येतील. लोकांच्या सहवासात गेल्यावरच तुम्हाला त्यांच्या गरजा समजतील. त्यावर उपाय करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवे काम मनासारखे असेल. संगीतात चांगली धून मिळेल. विद्यार्थी वर्गाने आळस न करता अभ्यासात लक्ष द्यावे. परीक्षेसाठी तयारी करा. शुभ दि. 10, 15

कर्क :- आपल्या जीवनसाथीची मर्जी राखाल. घरातील खरेदी करण्यासाठी जावे लागेल. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतीलच असा विचार करू नका. नोकरवर्गाकडून गोड बोलून आपले काम करून घ्या. बौद्धिक चातुर्य वापरा. शक्यतो वादविवाद आणि संताप टाळा. नोकरीत आपणास वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. जवळचे लोक मदत करण्यास येणे कठीण होईल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे कौतुक होईल. आपणास कामाचे आश्वासन मिळेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. कोर्टाच्या सर्व गोष्टी जमून येतील, तरी एखादी त्रुटी राहील. घरामध्ये न टाळता येणारे खर्च वाढतील. विद्यार्थी वर्गाने उद्धटपणे वागू नये. शुभ दि. 14, 15

- Advertisement -

सिंह:- व्यवसाय-उद्योगामध्ये एखाद्या नावीन्यपूर्ण कल्पनेचा तुम्ही उपयोग कराल. कलाकार आणि खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात बरीच मागणी राहील. रोजच्या कामात तुम्हाला कंटाळा येईल. उदास वाटेल. आळस केल्यास कामे रेंगाळतील. एखादी दिलासा देणारी घटना घडेल. कला क्षेत्रात रमाल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. संसारात शुभ समाचार मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची लोकप्रियता वाढेल. योजनांना गती देता येईल. विरोधक तुम्हाला खचवण्याचा प्रयत्न करतील. धंद्यात मोठे काम मिळेल. मौल्यवान वस्तू खरेदी करताना सावध राहा. क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवे मित्र मिळतील. शुभ दि. 11, 16

कन्या :- आपल्या घरात ठरवलेला कार्यक्रम पूर्ण करू शकाल. धंद्यात चांगली वाढ होईल. आप्तेष्टांची भेट होईल. रेंगाळत राहिलेले धंद्यातील काम पूर्ण करू शकाल. व्यवसायात मोठे कंत्राट घेता येईल. घरातील किरकोळ समस्या सोडवता येतील. कामात तुमच्यावर दबाव राहील. आपल्यावर आरोप होईल. कामात चूक करू नका. खाण्याची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात क्षुल्लक तणाव होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा उत्साह वाढेल. योजनांना पूर्ण करता येईल. सप्ताहाच्या शेवटी किरकोळ वाद संभवतो. प्रेमाला चालना मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. विद्यार्थीवर्गाला चांगले यश मिळेल. शुभ दि. 15, 16

तूळ :- राहून गेलेली कामे पूर्ण करता येतील. कामाचा उत्साह राहील. नातेवाईकांची कामे यथासांग होतील. धंद्यात जम बसेल. तुमचे स्वप्न पूर्ण होईल. प्रयत्न करा. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. प्रकृतीची पथ्ये पाळा. धीराने कठीण परिस्थिती हाताळा. अडचणीतूनच मार्ग काढावा लागणार आहे. नको त्या जाळ्यात अडकणार नाही याची दक्षता घ्या. धंद्यात जास्त मेहनत घ्या. प्रकृतीत सुधारणा होईल. राजकीय-सामाजिक कार्याला दिशा मिळेल. वरिष्ठ तुम्हास जबाबदारी देतील. कला-क्रीडा क्षेत्रात तुम्ही स्पर्धा जिंकाल. प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे शिक्षणात प्राविण्य मिळेल. शुभ दि. 13, 14

वृश्चिक :- दीर्घकाळानंतर तुमच्या आनंदी आणि स्वच्छंदी स्वभावाला पूरक असे वातावरण लाभणार आहे. त्याचा तुम्ही फायदा उठवाल. सामाजिक कामात तुमचा अंदाज बरोबर येईल. खरेदी करण्याचा मूड राहील. भेट घेण्यात यश मिळेल. धंद्यात फायदा होईल. व्यवसायात कुणाबरोबर बोलताना रागावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. नोकरीत काम वेळेत पूर्ण करा. खाण्याची काळजी घ्या. मनावर एखाद्या प्रसंगाचे दडपण येईल. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घ्यावी लागेल. घरातील व्यक्तीबरोबर तडजोड करा. धावपळ होईल. कला-क्रीडा स्पर्धेत मागे राहाल. संशोधनाच्या कामात अडचणी येतील. शुभ दि. 10, 16

धनु :- नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. आर्थिक बाजू सावरता येईल. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. कला क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे बेत साध्य होतील. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. कामाचा व्याप वाढेल. चूक महागात पडेल. अचानक कामात बदल करावा लागेल. महत्त्वाची वस्तू नीट ठेवा. धंद्यातील महत्त्वाचा निर्णय घेता येईल. विरोधकांच्या कारवायांवर कडक नजर ठेवा. वरिष्ठांशी वाद टाळा. प्रकृतीच्या कुरबुरी उद्भवू शकतात. मोठे काम मिळवा. आळस केल्यास संधी जाईल. राजकीय-सामाजिक कार्यात योजना पूर्ण करण्याच्या मागे लागा. सहकार्य मिळेल. कोर्ट केस संपवता येईल. शुभ दि. 13, 15

मकर :- कला, विज्ञान, शिक्षण, व्यापार अशा क्षेत्रात प्रगती साधता येईल. आपले नियोजित कार्य व उपक्रम सुरू ठेवता येतील. सर्व बाबतीत सावध राहावे लागणार आहे. खर्च वाढेल. आर्थिक व्यवहारात सतर्कता, प्रकृतीची पथ्ये पाळणे अशा गोष्टींची दखल घेऊन पुढील मार्ग अवलंबणे हितकारक राहील. विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईगडबड टाळा. घरगुती वादविवादात अडकून न पडता येणार्‍या प्रश्नांना तयारीने सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कोणालाही नाराज करू नये. प्रवासात सावध राहा. संधीचा लाभ घ्यावा. उज्ज्वल यश प्राप्त करणे शक्य होईल. शुभ दि. 11, 16

कुंभ :- कार्यक्षेत्रात आपण पुढे सरकू शकाल. बौद्धिक क्षेत्राला चांगला वाव मिळेल. राजकीय क्षेत्रातील आपले अंदाज योग्य निघतील. आपल्या कार्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाजू सुधारेल. व्यापारात प्रगती कराल. आर्थिक बाजू सावरता येईल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. तुमचा ठरलेला कार्यक्रम पूर्ण होईल. पाहुणे येतील. त्यांचे मनाप्रमाणे स्वागत कराल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येईल. तरीही तुमच्या प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. प्रवासात सावध राहा. अपमानास्पद घटना घडण्याची शक्यता आहे. जवळचे मित्र तुमच्या बाजूने असतील. शुभ दि. 14, 15

मीन :- आपल्या यशाचा मार्ग अधिक सुकर होईल. धार्मिक कार्यातून आपणास आनंद मिळेल. घरातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागू शकतील. विविध क्षेत्रात आघाडीवर राहाल. कामाचा वेग वाढीला लागेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. चर्चा सफल होईल. धंद्यात आपसात तणाव होऊ शकतो. जवळच्या व्यक्ती नाराज होतील. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तू सांभाळा. नोकरीत एखादी चूक होऊ शकते. सावध राहा. हिशोब नीट करा. कला-क्रीडा क्षेत्रात भावूक व्हाल. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. धावपळ होईल. अनावश्यक खर्च वाढेल. संशोधन कार्यात अपेक्षित यश मिळेल. शुभ दि. 13, 15

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -