Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य : रविवार २४ नोव्हेंबर ते शनिवार ३० नोव्हेंबर २०२४

राशीभविष्य : रविवार २४ नोव्हेंबर ते शनिवार ३० नोव्हेंबर २०२४

Subscribe

मेष ः- गोड बोलण्याने आपल्या कार्याला सहजता मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. धंद्यात चांगला फायदा होईल. तणाव मिटवण्यात यश मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला मानाचे स्थान मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्याकडे जबाबदारी देतील. घर, जमीन यासंबंधी समस्या मिटवता येईल. शेअर्समध्ये सावधपणे निर्णय घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात सौम्य धोरण ठेवा. आठवड्याच्या शेवटी शुभ समाचार मिळेल. कोर्ट केसमध्ये झगडून यश मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. बढती-बदलीची शक्यता निर्माण होईल. शुभ दि. २२, २६

वृषभ ः- आपले नियोजित कार्य व उपक्रम सुरू ठेवता येतील. खर्च वाढेल. आर्थिक व्यवहारात सतर्कता, प्रकृतीची पथ्ये पाळणे अशा गोष्टींची दखल घेऊन पुढील मार्ग अवलंबणे हितकारक राहील. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रवासात सावध राहा. आपली आर्थिक बाजू सुधारेल. व्यापारात प्रगती कराल. लेखकवर्गाला चांगला काळ राहील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामात तुम्हाला मदत करतील. अनेक क्षेत्रात आपली यशाची घोडदौड सुरू राहील. आपल्या अपेक्षा पूर्ण होण्याचा हा काळ राहील. नव्या परिचयाचा लाभ घेता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती द्यावी लागेल. कायद्याचे पालन करा. शुभ दि. २४, २७

- Advertisement -

मिथुन ः- कला क्षेत्रात उत्तम यश संपादन करता येईल. प्रवासाचे योग येतील. आपल्या शांत व स्थितप्रज्ञतेने आपली बाजू सावरता येईल. धंद्यात मेहनत घ्या. काम मिळवा. थकबाकी ठेवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व टिकवता येईल. नवीन कल्पना सुचेल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. सप्ताहाच्या मध्यावर कुणीतरी अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रयत्न करेल. घरगुती कामे होतील. जवळचे लोक तुमच्या बाजूने उभे राहतील. क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन ओळखीतून काम मिळू शकेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. संशोधनात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळेल. शुभ दि. २५, २८

कर्क ः- कला, विज्ञान, शिक्षण, व्यापार अशा क्षेत्रात प्रगती साधून आर्थिक बाजू सावरता येईल. कोर्टकचेरीच्या कामात सफलता जाणवेल. अध्ययनात प्रगती व यश मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकसंग्रह मोठा करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. घरातील ताणतणाव कमी होईल. सप्ताहाच्या शेवटी अचानक खर्च निर्माण होऊ शकतो. कायद्याचे पालन करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. कोर्ट केस, मतभेद शक्यतो लवकर संपवा. विद्यार्थ्यांनी योग्य तोच अभ्यासक्रम निवडावा. वेळेला अधिक महत्त्व द्यावे. शुभ दि. २३, २४

- Advertisement -

सिंह ः- आपणास विविध क्षेत्रातील प्रगतीची संधी प्राप्त होईल. उज्ज्वल यश प्राप्त करणे शक्य होईल. तुमच्या मनावर एखादे दडपण आल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल. नेहमी संयमाने वागा. प्रश्न सोडवता येईल. धंद्यातील समस्या सोडवाल. सुखद गोष्टी घडल्याचा आनंद मिळेल. नवे परिचय लाभदायक ठरतील. नको त्या प्रलोभनांना भुलू नका. मोठे काम घेऊन ठेवा. मागील येणे वसूल कराल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा टिकवता येईल. लोकसंग्रह वाढवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. चांगल्या लोकांचा सहवास लाभेल. प्रवासात घाई करू नका. संशोधनात प्रगती होईल. घरातील माणसे मदत करतील. शुभ दि. २४, २९

कन्या ः-आपल्या कार्याच्या कक्षा रुंदावतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मुलांकडून शैक्षणिक क्षेत्रातील सुवार्ता समजतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. इतरांवर प्रभाव पाडाल. धंद्यात तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. भागीदाराशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. गोड बोलून काम करा. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व राहील. तुमच्याशी वाटाघाटीच्या प्रश्नावर मतभेद होऊ शकतात. परिस्थिती सावरून घेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन ओळख उत्साहवर्धक ठरेल. मागील येणे वसूल कराल. संसारातील वाद मिटवता येईल. संशोधनाच्या कामात पुढे जाल. नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. शुभ दि. २३, २८

तूळ ः- आपल्या प्रयत्नांनी आपण आपले कार्य साध्य करू शकाल. आर्थिक बाजू सावरता येईल. आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवता येईल. विरोधकांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्या. नोकरीत कामाचा आणि वरिष्ठांचा दबाव राहील. कायद्याचे उल्लंघन करू नका. धंद्यात सुधारणा होईल. मोठे काम मिळेल. थकबाकी वसूल कराल. राजकीय-सामाजिक कार्यात काही लोक तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. घरातील कामे वाढतील. धावपळ होईल. घाईत शेअर्सचा अंदाज घेऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात तडजोड करावी लागेल. नवीन ओळखीवर एकदम विश्वास टाकू नका. योग्य संगत ठेवावी. शुभ दि. २२, २७

वृश्चिक ः- व्यापार-उद्योगाला चालना मिळेल. आपल्या जबाबदार्‍या पार पाडू शकाल. चांगल्या घटनांनी समाधान मिळू शकेल. धंद्यात जम बसेल. क्षुल्लक कारणावरून वाद झाला तरी त्याकडे दुर्लक्ष करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठित लोकांच्या सहवासात राहाल. मैत्रीत क्षुल्लक वाद निर्माण होईल. घरगुती कामे रेंगाळू शकतात. राजकीय उलाढालीत तुम्हाला स्थान मिळू शकेल. संसारातील समस्या सोडवाल. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. घर, जमीन, खरेदी-विक्रीत फायदा होईल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. योग्य ठिकाणी गुंतवणूक होऊ शकेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. ठरवलेले स्वप्न पूर्ण होईल. शुभ दि. २४, २६

धनु ः- आपल्या अंगी असलेल्या कर्तृत्वाला वाव मिळेल. जागेचे प्रश्न, कौटुंबिक समस्यांतून मार्ग काढता येईल. भावनाप्रधान न राहता वस्तुस्थितीचा विचार करून वागण्याचा प्रयत्न करा. मन खंबीर राहील. अडचणीवर मात करावी लागेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखू नका. तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न होईल. धंद्यात लक्ष द्या. मोठे कंत्राट मिळवता येईल. कोर्ट केस जिंकणे सोपे राहील. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्याल. प्रसिद्धीसाठी झगडावे लागेल. नोकरीत यशस्वीपणे काम कराल. वरिष्ठांचा दबाव आणि पाठिंबाही राहील. संयम ठेवा. संशोधनाच्या कामात जिद्द ठेवा. शुभ दि. २७, २८

मकर ः- संसारात शुभ समाचार मिळेल. नोकरीत प्रभाव पडेल. योग्य ठिकाणी बदली करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संशोधनाच्या कामात जास्त धावपळ होईल. स्पर्धा जिंकाल, परदेशात जाण्याची संधी मिळेल. गैरसमजापासून दूर राहा. तुमचा आत्मविश्वास शाबूत राहील. धंद्यात समस्या येऊ शकते. कामगारांचा तुटवडा होऊ शकतो. प्रश्न मात्र सोडवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे मांडता येतील. प्रतिष्ठा राहील. नेहमी आपलेच घोडे पुढे दामटू नका. बोलताना वेळेचे भान ठेवा. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. मानसिक शांती व स्थिरता लाभू शकेल. विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग मिळेल. शुभ दि. २५, २७

कुंभ ः- विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. धंद्यात जम बसेल. रागावर ताबा ठेवा. विचलित होऊ नका. घर, जमीन खरेदी-विक्री करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात अधिकार मिळेल. योजना तयार कराल. दौरे यशस्वी होतील. तुमचा प्रभाव दाखवता येईल. कौटुंबिक कलहाचे प्रसंग उद्भवू शकतात. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनतीने यश मिळेल. आर्थिक व्यवहारात सतर्क राहा. संयम, सामंजस्य, समजूतदारपणा यांचा योग्य समन्वय साधावा. कोर्ट केस संपवता येईल. नोकरीत चांगला फायदा होईल. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. नोकरी-व्यवसायात नम्रपणे बोलावे. शुभ दि. २६, २८

मीन ः-कला-क्रीडा क्षेत्रात आपली प्रगती होईल. मोठे लोक मदत करतील. कौतुक होईल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल. विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. संशोधनाच्या कामात यश मिळेल. कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा याचा योग्य विचार विद्यार्थ्यांनी करावा. धंद्यात अडचण निर्माण होईल. नोकर, भागीदार वाद करतील. नम्रपणे समस्या सोडवाल. बोलताना सावध राहा. विद्यार्थी वर्गाने नवीन प्रवेश अर्ज नीटपणे भरावा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. सप्ताहाच्या शेवटी जवळचे लोक शुभ समाचार देतील. नातलगांना मदत करावी लागेल. सामंजस्याने परिस्थिती हाताळा. शुभ दि. २५, ३०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -