Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य : रविवार १ सप्टेंबर ते शनिवार ७ सप्टेंबर २०२४

राशीभविष्य : रविवार १ सप्टेंबर ते शनिवार ७ सप्टेंबर २०२४

Subscribe

मेष ः- आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. एकंदरीत पाहता वैवाहिक जीवनात आनंददायी प्रसंगाने मानसिक समाधानाचे क्षण येतील. कामात झोकून देण्याचा मार्ग अधिक सुखकर व यशदायी ठरेल. धंद्यात चर्चा करताना बोलण्यातून गैरसमज होऊ शकतो. काम मिळवणे महत्त्वाचे ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढवण्यासाठी नेटाने प्रयत्न करा. तुम्हाला प्रयत्नाने यश खेचता येईल. घरातील वाद मिटेल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रसिद्धी मिळेल. ओळखी होतील. कोर्ट केस मिटवण्याचा प्रयत्न करू शकाल. शोधकार्यात यशस्वी व्हाल. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. शिक्षणात प्रगती होईल. शुभ दि. ४, ६

वृषभ ः- नव्या व्यवहारात फायदा होण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या कुरूबुरी सतावू शकतात. कोणाचीही नाराजी पत्करू नका. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आपल्या बर्‍याच अपेक्षा पूर्ण होऊ शकतील. धंद्यात तुमचा जम बसेल. नवी सुधारणा करता येईल. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात पद्धतशीर कार्य करा. मांडणी करा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. घरातील समस्या कमी होतील. घर, जमीन घेण्याचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. नोकरीत चांगला फायदेशीर बदल करता येईल. कोर्ट केसमध्ये सप्ताहाच्या मध्यावर अडथळा येऊ शकतो.
शोधकार्यात यश मिळेल. विद्यार्थीवर्गाला मोठे यश मिळेल. शुभ दि. १, ५

- Advertisement -

मिथुन ः- आर्थिक व्यवहारात झालेले गैरसमज दूर करता येतील. ज्येष्ठांच्या सल्ल्याने काही मोठे व्यवहार मार्गी लावता येतील. आपल्या गोड बोलण्याने आपला कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण आपले उद्दिष्ट गाठू शकाल. धंद्यात फायदेशीर काम मिळेल. प्रयत्नांचा जोर वाढवा. कायद्याचे पालन करा. मागील येणे वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रामाणिकपणे कामे करा. लोकांच्या खर्‍या समस्या ओळखून कार्य करा. दौर्‍यात यश मिळेल. संसारात जीवनसाथी, मुले यांच्या प्रगतीची बातमी मिळेल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकदार यश मिळवाल. नवीन आश्वासन मिळेल. शुभ दि. २, ७

कर्क ः- सरकारदप्तरी असणारी कामे मार्गी लागतील. स्वतःचाच दुराग्रह चालू ठेवणे अहितकारक राहील. आर्थिकदृष्ठ्या हा आठवडा फार मोठ्या उलाढालीचा नसला तरी उधारीची वसुली व रोखीचे व्यवहार यातून आपणास अपेक्षित गोष्टी साध्य करणे शक्य होईल. वैवाहिक जीवनात बरीचशी शांतता लाभू शकेल. गुंतवणूकदार मिळतील. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. लोकप्रियता मिळेल. दौर्‍यात सहकारी मदत करतील. योजनांना गती देऊन कामे करा. संसारात आनंदाची बातमी कळेल. घर, वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कोर्ट केस लवकर संपवणे ठीक राहील. शोधकार्यात यश येईल. शुभ दि. ६, ७

- Advertisement -

सिंह ः- घरातील मोठ्यांचा सल्ला आपल्या दैनिक व्यवहारासाठी व भावी काळासाठी मोलाचा ठरणार आहे. जागेसंबंधीच्या प्रश्नांना सुलभता येईल. वाहन खरेदीबाबतही चालना मिळेल. पथ्ये मात्र पाळा. धंद्यात कराराची बोलणी करताना वाद होईल. गैरसमज होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या विचारांना सर्वांच्या सहमतीने पुढे नेता येईल. प्रतिष्ठा वाढेल. लोकांच्या उपयोगी येतील अशी कामे करता येतील. संसारातील वाद मिटवण्याची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. प्रसिद्धी मिळेल. कोर्ट केसमध्ये प्रयत्नाने यश मिळवता येईल. शिक्षणात प्रगती होईल. आत्मविश्वासाने कामे करून आपले जीवन सुधारा. शुभ दि. १, ७

कन्या ः- सामाजिक क्षेत्रात मानमरातब मिळण्याची संधी प्राप्त होईल. आर्थिक फायद्यापेक्षा अन्य फायद्यांचा लाभ घेता येईल. प्रवास योग संभवतात. नोकरी-व्यवसायात मिळणार्‍या संधीचा योग्य उपयोग करून आपला लाभ करून घेता येईल. रागावर ताबा ठेवा. कायद्याचे उल्लंघन होईल असे कृत्य करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात नम्रतेने वागा. लोकांना कमी लेखू नका. तुमच्या प्रसिद्धीचा फायदा तिसरीच व्यक्ती घेईल. संसारात जबाबदारी वाढेल. घरातील वृद्धांसाठी धावपळ कराल. कलह टाळावा. कला-क्रीडा स्पर्धेत टिकून राहणे महत्त्वाचे ठरेल. खोट्या प्रेमाच्या मागे धावू नका. शिक्षणात आळस करू नका. शुभ दि. ३, ४

तूळ ः- एकूण ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे राहील. आपल्या प्रवासाद्वारे अर्थप्राप्तीचे योग येतील. पत्रव्यवहाराद्वारे अपेक्षित गोष्टींना चालना मिळेल. आपल्या अनुभवाने मिळालेल्या अंदाजाचा योग्यपणे वापर करता येईल. काम मिळवणे कठीण पडेल. तुम्हाला नम्रपणे तुमचे विचार समोरच्या व्यक्तीला पटवून द्यावे लागतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांची कामे करावी लागतील. राजकीय-सामाजिक कार्यात तत्परता ठेवावी लागेल. सहनशीलता ठेवा, तरच प्रतिष्ठा वाढेल. कायदा मात्र कटाक्षाने पाळा. कला-क्रीडा क्षेत्रात अधिक मेहनत घ्या. कोर्ट केसमध्ये बेसावध राहू नका. शोधकार्य जिद्दीने पूर्ण करा. शिक्षणात पुढे जाल. शुभ दि. २, ५

वृश्चिक ः- आपले सहकारी आणि वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवा. घरातील ज्येष्ठांशी होणारे मतभेद व गैरसमज वाढण्याची शक्यता असल्याने याबाबत अधिक दक्ष राहा. मुलांच्या प्रगतीच्या वार्तांनी घरातील वातावरण चांगले राहील. धंद्यात पुढे जाण्याची संधी शोधता येईल. ओळखीचा उपयोग होईल. मोठ्या व्यक्ती मदत करतील. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना गती मिळेल. आपणास लोकप्रियता मिळेल. सप्ताहाच्या मध्यावर किरकोळ मतभेद होऊ शकतील. नोकरीत तुमचा प्रभाव दिसून येईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. शुभ दि. ३, ६

धनु ः- वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. मुलांचे प्रश्न सामोपचाराने सोडवू शकाल. आर्थिक बाजू सावरता येईल. धंद्यातील समस्या सोडवता येईल. आपल्याबद्दल गैरसमज होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. पैसा मिळेल. नवे काम लवकर शोधा. नोकरीतील वातावरण सुधारेल. वरिष्ठ कौतुक करतील असे काम कराल. काही चुकीच्या शब्दांतून वादाच्या प्रसंगाचे वारे वाहू शकतात. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांच्या मागे लागून काम पूर्ण कराल. कायद्याचे भान ठेवा. संसारातील अडचणी कमी होतील. प्रतिष्ठा वाढेल. कोर्ट केस यशाकडे जात आहे असे दिसेल. शोधकार्यातील तणाव कमी होईल. शिक्षणात प्रगती होईल. शुभ दि. १, ३

मकर ः- नोकरी-व्यवसायात आपणास लाभ घेता येणे शक्य होईल. व्यापारात येणार्‍या संधीचा लाभ घेतल्याने अपेक्षित नफा मिळवता येईल. प्रवासाचे योग संभवतात. नव्या क्षेत्रांचा व व्यक्तींचा परिचय होईल. धंद्यातील समस्या कमी करण्याचा प्रयत्न करा. कुठेही दादागिरीची भाषा वापरू नका. मैत्रीच्या भावनेतून वागा. बोलल्याने कामे होतील. राजकीय-सामाजिक कार्यात गुप्त शत्रू त्रस्त करण्याचा प्रयत्न करतील. रागावर ताबा ठेवा. नव्या गोष्टी शिकायला मिळाल्याने आपल्या अंगी असलेल्या कौशल्यात भर पडेल. प्रतिष्ठा लाभेल. कला-क्रीडा स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल. दूरचा प्रवास करण्याचे योग येतील. शुभ दि. ४, ७

कुंभ ः- सहमतीच्या विचारधारेतून आर्थिक बाबतीत चांगले व्यवहार करू शकाल. नोकरदारांना बढतीसंदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकेल. तुमचा उत्साह वाढेल अशी घटना धंद्यात घडेल. नवे काम मिळेल. बोलताना सावध राहा. थकबाकी वसूल कराल. राजकीय-सामाजिक कार्यात नवे डावपेच टाकता येतील. योजनांसाठी पद्धतशीर वेळ काढता येईल. कार्याला वेग द्या. संसारातील नाराजी, गैरसमज दूर करू शकाल. घर, वाहन इत्यादी खरेदीचा विचार कराल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मोठ्या कामाचे आश्वासन मिळेल. कोर्ट केस संपवण्याचा प्रयत्न करा. शोधकार्यात पूर्णपणे यश मिळेल. शिक्षणात चांगली प्रगती होईल. शुभ दि. २, ५

मीन ः आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. नव्या व्यक्तींच्या परिचयाचा लाभ घेता येईल. वादविवादाला जास्त महत्त्व देऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात काम करताना खंबीर राहा. अहंकारीपणा करू नका. नोकरीत वरिष्ठांच्या दबावाखाली राहावे लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. कोर्ट केस जिंकणे सोपे नाही. जिद्द ठेवा. वाटाघाटीवरून समस्या निर्माण होऊ शकतात. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. आपली आर्थिक बाजू सावरता येईल. कामकाजात गुंतून राहणेच हितकारक ठरणार आहे. शोधकार्यात बुद्धी वापरा. शिक्षणात मन स्थिर ठेवा. यशस्वी व्हाल. अपेक्षित गोष्टींना चालना मिळेल. शुभ दि. ३, ७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -