मेष – महत्त्वाचा निर्णय घेताना आपल्या तर्कबुद्धीचा वापर करा. नको त्या प्रलोभनात अडकू नका. राजकारण, क्रीडा, शिक्षण अशा क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी मिळेल. प्रकृतीमान ठीक असले तरी योग्य ती पथ्ये पाळावीत. वैवाहिक जोडीदाराची मर्जी सांभाळा. वरिष्ठांना खूश करू शकाल. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवणे हितकारक ठरणार आहे. रागावर नियंत्रणात ठेवा. शब्दाला प्रत्युत्तर देऊन वादविवाद वाढवू नका. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. घरगुती वातावरण वादासारख्या प्रसंगांनी बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवासाचे योग येतील. अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. शुभ दि. 18, 21
वृषभ – आपल्या श्रमाला भाग्याची साथ मिळाल्याने कार्याची ध्येयपूर्ती साधता येईल. आपल्या अनुभवाचा योग्य उपयोग केल्यास व कार्याचे नवे तंत्र अंगीकारल्यास आपण यशाच्या मार्गावर पाऊलवाट करू शकाल. छोट्या प्रवासाची संधी प्राप्त होईल. आपल्या कार्यात अपेक्षित सहाय्य मिळू शकेल. आर्थिक उलाढाली वाढू शकतील. सरकारी अधिकारी, व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीची संधी प्राप्त होण्याची शक्यता राहील. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. प्रकृतीमान ठीक असले तरी मोसमी त्रासांपासून सावध राहा. वैवाहिक जोडीदाराच्या कल्पनांचा विचार करा. आर्थिक बाजू सावरता येईल. शुभ दि. 16, 20
मिथुन – काही भाग्यवंतांना बढतीचे संकेत मिळू शकतील. व्यापारात प्रगती साधता येईल. बोलताना भाषेवर योग्य नियंत्रण असणे हितकारक राहू शकते. कोणालाही नाराज करू नका. आर्थिक गुंतवणूक करू शकाल. अपेक्षितांकडून अपेक्षित मदतीचा हात मिळू शकेल. विद्यार्थ्यांना अध्ययनात यशाची अपेक्षा ठेवता येईल. प्रकृतीबाबत नियमित व्यायाम व योगाचा उपयोग करा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आपला अहंकारी स्वभाव टाळल्यास आपली शान वाढविता येईल. आपापसातील गैरसमज आपण कटाक्षाने टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. सकारात्मक दृष्टिकोनाचा चांगला लाभ मिळेल. शुभ दि. 19, 20
कर्क – आपले कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होईल. करमणुकीच्या कामांचा आस्वाद घेता येईल. आर्थिक बाजू सावरता येईल. वैवाहिक जोडीदाराचे, मुलांचे व ज्येष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. मेहनतीच्या जोरावर बर्याचशा गोष्टी व काही नियोजित कामे यशस्वी कराल. कामाचा उत्साह राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आपल्या बोलण्याची इतरांवर छाप पाडून कार्यक्षेत्रात आपले ध्येय गाठू शकाल. प्रलोभनांना बळी पडू नका. विरोधकांच्या ससेमिर्याची सध्या चिंता करू नका. शुभ दि. 17, 21
सिंह – परिश्रमातून आपल्या कार्याची वृद्धी करण्याचा आपला मनोदय राहील व पर्यायाने आपल्या कर्तृत्वाला उजाळा मिळू शकेल. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळू शकेल. व्यापार- उद्योगात प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. नव्या योजनांना चालना मिळेल. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. कौटुंबिक वादापासून दूर राहणे इष्ट ठरेल. घरासंबंधीच्या प्रश्नांना चालना मिळेल. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे म्हणजे गैरसमजाला वाव मिळणार नाही. येणार्या अडचणींना आणि प्रसंगाला धैर्याने सामोरे जा. जोडीदाराची अपेक्षित मदत मिळेल. शुभ दि. 20, 22
कन्या – धार्मिक कार्यात सहभाग राहील. प्रवासाचे योग येतील. येणार्या अडथळ्यांतून मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. परदेशी कामात उत्तम प्रगतीची अपेक्षा बाळगू शकाल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील, पण पथ्ये पाळावीत. राजकीय क्षेत्रात जम बसवू शकाल. आवडीच्या क्षेत्रात प्रगती कराल. घरात एकोप्याचे, आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक बाबतीत सावधानता बाळगणे हितकारक ठरू शकते. विचारपूर्वक निर्णय घेणेच योग्य ठरेल. आपले बजेट बिघडणार नाही याची दक्षता घ्या. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. प्रकृतीमान सर्वसाधारण असल्याने मोसमी त्रासांपासून सावध राहा. शुभ दि. 17, 18
तुळ – अधिकाधिक कामे पार पाडण्याचा आपला मनोदय राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येणे शक्य होईल. नव्या योजना बनवण्याचा आपला प्रयत्न राहील. समाजातील आपले वास्तव्य छान राहील. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. आपल्या परिश्रमाचे फळ मिळू शकेल. आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता राहील. कामाच्या व्यापामुळे घरातील लोकांना कमी वेळ द्याल. प्रकृतीस्वास्थ्य ठीक असले तरी नियमित व्यायाम आणि योगाचा अवलंब करावा. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करणे चांगले ठरेल. शुभ दि. 20,22
वृश्चिक – नोकरी-व्यवसायात अनुकूलता व नशिबाची साथ मिळाल्याने आपले उद्दिष्ट साध्य करू शकाल. कामकाजाबाबत कोणावरही अवलंबून न राहता स्वयंसिद्ध होऊन सकारात्मक दृष्टीने काम करणे महत्त्वाचे ठरणार आहे. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते धोरण स्वीकारावे. क्रीडा व राजकीय क्षेत्रात प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. घरातील ज्येष्ठांच्या सहकार्याचा लाभ घेता येईल. मदतीचा हात मिळाल्यास अवश्य लाभ घ्या. नवे संबंध जोडण्याची संधी मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नात्यातील संबंध चांगले राहतील. एखाद्या गोष्टीवरून तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. शुभ दि. 17, 18
धनु – आपणास विविध क्षेत्रात प्रगतीची पावले टाकता येतील. विशेषतः विविध व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक बाजू सावरता येईल. आपले प्रकृतीस्वास्थ्य ठीक असले तरी खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. कामाचा उत्साह राहील, पण अतिउत्साह टाळा. नात्याबाबत संमिश्र फलदायी काळ राहील. कलाकार, साहित्यिक, तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम काळ आहे, त्याचा लाभ घ्यावा. वैचारिक क्षेत्र विस्तारू शकाल. जोडीदाराच्या मताचा आदर करा. नोकरदारांना दिलासा मिळेल. घरगुती वातावरण सलोख्याचे राहील याची दक्षता घ्यावी. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. शुभ दि. 19,21
मकर – कोणतेही कार्य प्रतिष्ठेचे न मानता पार पाडण्याचे धोरण स्वीकारावे. आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल. वैवाहिक जोडीदाराची चांगली साथ मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने प्रथमपासून खर्चावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नको त्या प्रलोभनात अडकू नका. अचानक कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या. जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवू शकाल. हितशत्रूंना संधी देऊ नका. सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा. संयमाने कामे पार पाडावीत. शुभ दि. 17, 20
कुंभ – आपल्याकडून योग्य तर्हेने बिनचूक काम होते का? याचे अवलोकन करणे हितकारक ठरू शकते. सतत सत्संगतीत राहणे, सरळ मार्गांनी कामे करणे अशा गोष्टींची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेणे योग्य राहील. प्रकृतीबाबत जागरूक राहावे. नोकरी-व्यवसायात अनुकूलता मिळू लागेल. पुष्कळशी कामे पूर्ण करण्याचा आपला मानस राहील. हाती घेतलेल्या कामात आपली शान शाबूत ठेवाल. कला, व्यापार, नोकरी आदी क्षेत्रांत आपण आपले वर्चस्व दाखवू शकाल. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्रवासाचे योग येतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. शुभ दि. 18, 21
मीन – आपल्या मेहनतीने आपण अपेक्षित गोष्टी साध्य करू शकाल. आप्तेष्ठांच्या गाठीभेटीचे योग येतील. कलाक्षेत्राला उत्तम प्रोत्साहन मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. आपली सामाजिक क्षेत्रातील उंची वृद्धिंगत होण्याची संधी मिळेल. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. धार्मिक कार्यात अधिक रस घ्याल. कोणावरही फाजील विश्वास टाकू नका. परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घ्या. महत्त्वाच्या कामात आपली कसोटी लागणार आहे. कोर्टदरबारीची कामे लांबणीवर टाकणेच हितकारक राहील. खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी. शुभ दि. 16,19