मेष ः- तुमच्या कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी तुमचे सहकारी उपयुक्त ठरतील. परीक्षा-स्पर्धेच्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. प्रेमप्रकरणाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य सामान्य राहील. तुमच्या आरोग्याकडे आणि तुमच्या कामाकडे खूप लक्ष द्यावे लागेल. काही काळ तुमचे उत्पन्न कमी राहील आणि खर्च जास्त राहील. त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. वैयक्तिक संबंधांत गैरसमज वाढल्यामुळे नात्यांमध्ये तणाव असेल. कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका. महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी कुटुंबीयांशी सल्लामसलत करा.
वृषभ ः- तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. घरात धार्मिक-मांगलिक कार्यक्रम होतील. अभ्यासाशी संबंधित लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना तुमच्या हितचिंतकांचे मत अवश्य घ्या. तुमच्या प्रियजनांकडे दुर्लक्ष करणे टाळावे, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणार्यांना चांगल्या संधी मिळतील. आरामाशी संबंधित गोष्टींवर पैसा खर्च कराल. व्यवसायात प्रगती होईल.
मिथुन ः- कोणत्याही मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. जिवलग मित्र पूर्ण सहकार्य करतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. प्रेमसंबंधात निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. हंगामी आजारांपासून सावध राहा. दुरुस्तीशी संबंधित अचानक झालेल्या खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. विरोधक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला काही गोष्टींमध्ये खूप मेहनत करावी लागेल. गरज पडल्यास तुम्हाला जवळच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळू शकेल, ज्यामुळे तुम्ही आलेल्या प्रतिकूल परिस्थितीला सक्षमपणे तोंड देऊ शकाल.
कर्क ः- जीवनातील मोठे अडथळे दूर होतील. आजारी लोकांना दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वासाने काम कराल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. परीक्षेची तयारी करणार्या लोकांसाठी अनुकूल काळ असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ होईल. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये अपेक्षित यश मिळेल. करिअर, व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात तीव्रता राहील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. अनावश्यक वादात पडणे टाळा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकण्याऐवजी ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
सिंह ः- काही काळ अतिरिक्त मेहनत केल्यास आपली सर्व कामे पूर्ण होतील. घरातील वस्तू खरेदी करण्यावर पैसे खर्च कराल. कुटुंबातील सदस्यांशी काही मुद्यांवर वाद होऊ शकतो. विनाकारण कोर्टाच्या भानगडीत पडू नका. मालमत्तेशी संबंधित वाद होतील. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. प्रेमातील गैरसमज दूर होतील. बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. कोणत्याही योजनेत गुंतवणूक केल्यास आपणास नफा मिळू शकतो. आपणास काही अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागेल. सुखी वैवाहिक जीवनासाठी आपल्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या ः- नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटल्याने सुटकेचा नि:श्वास सोडाल. कामात व्यस्त राहण्यासोबत खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. मन, वाणी आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा विनाकारण समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. विद्यार्थ्यांचे मन विचलित होऊ शकते. जवळच्या माणसांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. इतरांच्या छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देणे टाळा. आपल्या बोलण्या-वागण्यावर नियंत्रण ठेवा. आपले अडकलेले पैसे मिळतील. मान-सन्मान वाढेल.
तुळ ः- करिअर आणि व्यवसायातील प्रवासात अपेक्षित यश मिळेल. नोकरीत उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत बनतील. वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तीची भेट फायदेशीर ठरेल. व्यवसाय वाढण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन कराल. मालमत्ता खरेदीची इच्छा पूर्ण होईल. लक्ष्य साध्य करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. आरोग्य आणि नात्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. आरोग्यामुळे काही कामात अडथळे येतील. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जोडीदाराशी असलेले गैरसमज दूर होतील. कामाचा ताण वाढल्याने वैतागू शकता. कोणताही मोठा निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या.
वृश्चिक ः-कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यवसाय वाढवण्याचा विचार करीत असाल तर इच्छा पूर्ण होईल. धार्मिक स्थळी प्रवासाची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अनेक आव्हाने येतील त्याचा स्वीकार करा. तुमच्या बुद्धीने आणि विवेकाने समस्यांवर मात कराल. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागेल. जोडीदाराशी उत्तम समन्वय राहील. मुलांकडून चांगल्या बातम्या ऐकू येतील. एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटल्याने आनंदी असाल. नात्यातील गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. घरातील गरजेच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल. गुंतवणुकीपूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्या.
धनु ः- आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कराल. नोकरदार लोकांसाठी अतिशय अनुकूल काळ आहे. जीवनात प्रगतीच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. प्रभावशाली व्यक्तीची भेट झाल्याने भविष्यात त्याचा फायदा होईल. मालमत्ता खरेदीसाठी संबंधितांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. शांत मनाने समस्या सोडवल्या तर यश नक्की मिळेल. मालमत्तेशी संबंधित वाद चिंतेचे कारण बनेल. घर आणि नोकरी यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. आपल्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आपल्या प्रेम जीवनाला एक नवीन वळण मिळेल. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
मकर ः- आपल्या कार्यक्षेत्रातील विषय संवादातून मार्गी लागतील. स्वतःच्या मुद्यावर ठाम राहून निर्णय घेतले तर चांगले परिणाम समोर येतील. घराच्या सजावटीवर पैसे खर्च कराल. आर्थिक विषयात अहंकारामुळे संघर्ष होणार नाही याची दक्षता घ्यावी. जीवनात सुखसमृद्धी प्राप्त करण्याच्या संधी मिळतील. प्रगती आणि यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. काही जबाबदार्या तुमच्या कनिष्ठांकडे सोपवल्या तर चांगले परिणाम समोर येतील. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला तुमच्या उपयोगी पडेल. कुटुंबात आपापसातील प्रेम वाढेल. आर्थिक खर्च अधिक होतील आणि गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कुंभ ः- कुटुंबातील सदस्य पुढाकार घेऊन तुमची मदत करताना दिसतील. अनावश्यक वादापासून दूर राहिलात तर चांगले परिणाम समोर येतील. अनावश्यक गोष्टींवर आपला वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे जीवनात यश मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. आपल्या सन्मानात वाढ होईल. उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टिकोनातून नियोजनाच्या मूडमध्ये असाल. कार्यक्षेत्रात घाईगडबड टाळा आणि बोलण्यावर संयम ठेवा.गुंतवणुकीतून फायदा होईल. भागीदारीत केलेली गुंतवणूक लाभदायक राहील. एखाद्या नव्या जागी प्रवासाचे नियोजन कराल. एखादी सुखद बातमी मिळेल.
मीन ः- काही नवीन शिकून हातातील प्रोजेक्टमध्ये त्याची अंमलबाजवणी केली तर यश प्राप्त होईल. एखादी भेटवस्तू मिळू शकते. आठवड्याच्या अखेरीस सुखसमृद्धीचे संयोग बनतील. समोर आलेली कठीण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी व्हाल. प्रकृतीबद्दल हलगर्जीपणा करू नका. कार्यक्षेत्रात कष्ट वाढू शकतात. आर्थिक बाबतीत खर्च अधिक होतील. अस्वस्थता वाढलेली असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात थोडी जोखीम पत्करून पुढे जाल तर चांगले परिणाम समोर येतील. अहंकारामुळे निर्माण होणारा संघर्ष टाळा. गुंतवणुकीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे सुखद अनुभव येतील.