भारतात आज यावेळी लागणार चंद्रग्रहण, मुंबईचा टायमिंग काय?

धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या घटनेला अशुभ मानले जाते. तसेच याकाळात शुभ आणि मांगलिक कार्य करण्यास मनाई करण्यात येते. ग्रहणाच्या प्रभावाने जीव-जंतूंपासून मानव जातीवर देखील त्याचा परिणाम होतो. आज म्हणजेच, 8 नोव्हेंबर 2022 रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण कोणत्याही महिन्यातील पौर्णिमा तिथीला लागते.

भारतीय वेळेनुसार, वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांपासून सुरु होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी समाप्त होणार. तसेच चंद्रग्रहणाचा सूतक काळ सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार असून संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी समाप्त होणार.

तसेच मुंबईमध्ये हे चंद्रग्रहण संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 18 मिनिटांपर्यंत असणार आहे.

चंद्रग्रहणाच्या काळात करु नका ‘हे’ काम

  • चंद्रग्रहणाच्या वेळी फक्त वृद्ध, गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलं सोडल्यास सर्व लोकांनी ग्रहण काळात झोपू नये, काही खाऊ-पिऊ नये.
  • या काळात गर्भवती स्त्रियांनी एका जागी बसावे.
  • सोबतच हनुमान चालिसेचं पठण करावे. यामुळे ग्रहणाचा वाईट परिणाम त्यांच्यावर पडणार नाही.
  • आजारी व्यक्तींनी ग्रहणामध्ये कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. फक्त ग्रहण काळात काहीही खाऊ नये.
  • घरातील पिण्याच्या पाण्यामध्ये, दूधामध्ये ग्रहण लागण्यापूर्वीच तुळशीचे पान टाकून ठेवावे.
  • ग्रहण काळात सर्वांनी देवी-देवतेच्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे पठण करणं शुभ मानलं जातं.
  • तसेच ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करु नये शिवाय कोणतीही खरेदी करु नये.
  • ग्रहणादरम्यान, दात साफ करणं, केस विचरण्यास देखील मनाई केली जाते.

हेही वाचा :

खग्रास चंद्रग्रहणात करा ‘या’ एका अद्भुत मंत्राचा जप अन् पाहा चमत्कार