घरICC WC 2023पहिल्या धक्क्यातून सावरण्या आधीच श्रीलंका टीमला आणखी एक धक्का; ICC ने केले सदस्यत्त्व रद्द

पहिल्या धक्क्यातून सावरण्या आधीच श्रीलंका टीमला आणखी एक धक्का; ICC ने केले सदस्यत्त्व रद्द

Subscribe

सुरू असलेल्या विश्वचषकात सुमार प्रदर्शनामुळे श्रीलंका संघावर टीकेची झोड उठवल्या जात आहे. संघाच्या याच कामगिरीमुळे श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याची घोषणा केली होती.

नवी दिल्ली : यंदाचा विश्वचषक आपल्या शेजारील देशांच्या संघासाठी खूपच त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. एकीकडे भारतीय संघ जोरदार फॉर्म्यात असताना दुसरीकडे पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ आपल्या सुमार कामगिरीमुळे चर्चेत राहत आहेत. अशातच दोन ते तीन दिवसांपूर्वीच श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी श्रीलंकेचे क्रिकेट बोर्ड बरखास्त केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा श्रीलंका संघाला आयसीसीने दणका दिला आहे. शुक्रवारी (10 नोव्हेंबर) रोजी झालेल्या बैठकीत आयसीसीने श्रीलंकेचे सदस्यत्व रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. (Another blow to the Sri Lankan team already recovering from the first shock Membership canceled by ICC)

सुरू असलेल्या विश्वचषकात सुमार प्रदर्शनामुळे श्रीलंका संघावर टीकेची झोड उठवल्या जात आहे. संघाच्या याच कामगिरीमुळे श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याची घोषणा केली होती. यामुळे श्रीलंकेत खळबळ उडाली होती. या धक्क्यातून श्रीलंका संघ सावरण्याआधीच श्रीलंका संघाला पुन्हा एक धक्का बसला आहे. कारण, अंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सील (ICC) ने त्यांचे सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयसीसी बोर्डाची आज बैठक झाली आणि याच बैठकीत श्रीलंकेला आयसीसी सदस्यत्वातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदस्य म्हणून श्रीलंकेवर नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यामध्ये बोर्डाचे कामकाज स्वायत्त पद्धतीने चालवणे आणि बोर्डाच्या कामकाजात, किंवा क्रिकेट प्रशासनात कोणताही सरकारी हस्तक्षेप होणार नाही याची खात्री करणे समाविष्ट आहे. त्यामुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : रोहित शर्मा नाकारत होता कर्णधारपद पण…; गांगुलीने सांगितली ‘ती’ इनसाइड स्टोरी

क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा प्रस्ताव झाला होता एकमताने संमंत

श्रीलंकेच्या संसदेने गुरुवारी देशाची क्रिकेट प्रशासकीय संस्था बरखास्त करण्याचा एकमताने ठराव संमंत केला होता. आणि त्याला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. मुख्य विरोधी पक्षाचे नेते सजिथ प्रेमदासा यांनी संसदेत ‘भ्रष्ट श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) व्यवस्थापनाचे निर्मूलन’ नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला सरकारचे वरिष्ठ मंत्री निमल सिरिपाला डी सिल्वा यांनी पूर्ण पाठिंबा दिला. दोन दिवसांपूर्वी, मंगळवारी न्यायालयाने शम्मी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंकन ​​क्रिकेट व्यवस्थापनाला बहाल केले होते, परंतु असे असतानाही श्रीलंका सरकारने क्रिकेट बोर्ड बरखास्त केले. आणि सरकारचा हा निर्णय आयसीसीला आवडला नाही, जो वरिष्ठ संघटनेच्या नियमांच्या विरोधात आहे. त्यामुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कुठून येतो इतका कॉन्फिडन्स… स्पर्धेतून बाहेर पडूनही संघाला उपांत्य फेरीत नेण्याचा बाबर आझमचा दावा

विश्वचषकातून श्रीलंका बाहेर

सध्या भारतात सुरू असलेला विश्वचषक श्रीलंका संघासाठी धक्कादायक असाच राहला. विश्वचषकात संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंका सरकारने SLC अर्थक श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केली होते. विश्वचषक स्पर्धेत, श्रीलंकेने नऊपैकी सात साखळी सामने गमावले आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीची पात्रताही गमावली. शासनाच्या निर्णयानंतर मंडळाने न्यायालयात दाद मागितली आणि मंडळ पूर्ववत झाले. त्यामुळे देशाच्या क्रिकेट प्रशासकीय मंडळावरील संकट अधिकच गडद झाले. गुरुवारी संसदेत सरकार आणि विरोधकांच्या संयुक्त ठरावात एसएलसी व्यवस्थापनाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -