घरICC WC 2023शेवटच्या सामन्यात बांगलादेशची तुफान फटकेबाजी; कांगारूंना दिले 307 धावांचे लक्ष्य

शेवटच्या सामन्यात बांगलादेशची तुफान फटकेबाजी; कांगारूंना दिले 307 धावांचे लक्ष्य

Subscribe

भारतात सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात आज शनिवारी (11 नोव्हेंबर) दोन महत्वाचे सामने होत आहेत.

पुणे : विश्वचषक 2023 मधील शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेश संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी केल्याचे बघायला मिळाले. बांगलादेश संघाने तगड्या ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी 307 धावांचे लक्ष्य दिले असून, आतापर्यंच्या कामगिरीच्या तुलनेत बांगलादेश संघाची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. (Bangladesh batting storm in last match Kangaroos were given a target of 307 runs)

भारतात सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात आज शनिवारी (11 नोव्हेंबर) दोन महत्वाचे सामने होत आहेत. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असून, या सामन्यात बांगलादेश संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 307 धावांचे लक्ष्य दिले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. तनजीद हसन आणि लिटन दास यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली.

- Advertisement -

हेही वाचा : शरद पवारांनी भाजपसोबत यावं ही तर ‘दादां’ची इच्छा; अपक्ष आमदाराच्या दाव्यामुळे खळबळ

ग्लेन मॅक्सवेलला दिली विश्रांती

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला बांगलादेशविरुदच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क यांना विश्रांती देण्यात आली आहे. या दोघांच्या जागी स्टीव्ह स्मिथ आणि सीन अॅबॉटचा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशने तीन बदल केले. दुखापतग्रस्त कर्णधार शाकिब अल हसन, शोरीफुल इस्लाम आणि तंजीम हसन शाकिब या सामन्यात खेळत नाहीत. त्यांच्या जागी मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन आणि नसुम अहमद यांना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले. शाकिबच्या अनुपस्थितीत नजमुल हुसेन शांतो बांगलादेशचे कर्णधारपद सांभाळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भाजपाचं मराठी प्रेम हे पुतना मावशीचं; दीपोत्सवाच्या कार्यक्रमावरून भाजप-मनसेत जुंपली

बांगलादेश संघातील फलंदाजांची कामगिरी

बांगलादेशकडून ओपनिंगला उतरलेल्या तांझिद हसन आणि लिटन दास या दोघांनी प्रत्येकी 36 धावा केल्या. कर्णधार नजमूल शांतो याने 45 धावांची खेळी केली. तॉहिद हृदॉय याने सर्वाधिक 74 धावा केल्या. महमदुल्लाह यानेही 32 धावांची खेळी उभारली. विकेटकीपर मुशफिकुर रहिम याने 21 धावांचं योगदान दिलं. मेहदी हसन मिराज 29 धावा करुन आऊट झाला. तर नसून अहमद याने 7 रन्स केल्या. तर मेहदी हसन 2 आणि तास्किन अहमद 0 वर नाबाद परतले. ऑस्ट्रेलियाकडून सिन एबोट आणि एडम झॅम्पा या जोडीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मार्क्स स्टोयनिस याने 1 विकेट घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -