घरICC WC 2023राजकीय नेत्यांकडून भारतीय संघाला 'विजयी भव!' च्या भरभरून शुभेच्छा

राजकीय नेत्यांकडून भारतीय संघाला ‘विजयी भव!’ च्या भरभरून शुभेच्छा

Subscribe

भारताने तिसऱ्यांदा विश्वचषक विजयी व्हावा, यासाठी सर्व भारतीय विविध माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. राजकीय नेत्यांनी सुद्धा भारतीय खेळाडूंना विजयी भव! च्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा (ICC ODI WORLD CUP 2023) अंतिम सामना भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Austrelia) यांच्यात आज (ता. 19 नोव्हेंबर) होणार आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी 2003 साली विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते आणि ऑस्ट्रेलियाने एकतर्फी सामना जिंकला होता. परंतु यावेळी भारतीय संघाला 20 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. भारतीय संघ आतापर्यंत सर्व 10 सामने जिंकून अपराजित राहीला असून अंतिम फेरीतही भारतीय संघच विजयी होणार असल्याचा विश्वास सर्वच क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त करण्यात आला आहे. (Best wishes from political leaders to the Indian team for victory)

हेही वाचा – विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा

- Advertisement -

आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मोठी धावसंख्या उभी करून कांगारूच्या संघाला पराभूत करण्याची संधी आहे. भारताने तिसऱ्यांदा विश्वचषक विजयी व्हावा, यासाठी सर्व भारतीय विविध माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. यासाठी देशातील कानाकोपऱ्यात होमहवन, पूजा-अर्चा सुरू आहेत. पुण्यात तर कर्णधार रोहित शर्मा याच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. राजकीय नेत्यांनी सुद्धा भारतीय खेळाडूंना विजयी भव! च्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांनी आपल्या X या सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांनी शुभेच्छा देत म्हटले आहे की, “आज भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना खेळणार आहे. इंदिरा गांधी सांगायच्या की, हा खेळ देशातील करोडो लोकांना बंधुत्वाच्या एका धाग्यामध्ये बांधून ठेवतो. या धाग्यामध्ये एक आशा आहे, एक विश्वास आहे. एका प्रार्थनेसाठी लाखो लोक एकत्र येतात. 1983 पासून खेळाप्रती करोडो लोकांची भावना आजही तशीच आहे. आज जेव्हा संपूर्ण देश एका आवाजात टीम इंडियाचा जयजयकार करत आहे, तेव्हा मला इंदिराजींनी सांगितलेली ही सुंदर गोष्ट आठवली. भारत जिंकणार, जय हिंद”, असे लिहित प्रियंका गांधी यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

 तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ऑल द बेस्ट टीम इंडिया” असे पोस्ट केले आहे.

बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनी X या सोशल मीडियावर शुभेच्छा देत लिहिले आहे की, “इतिहास घडणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर #CricketWorldCup फायनल्समध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन टायटन्समध्ये होणारी ही टक्कर ही एक विद्युतीय रोलरकोस्टर असणार आहे. या सामन्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.”

तसेच, “भारतीय क्रिकेट संघाला विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!” असे लिहित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून X या सोशल मीडियावरून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -