घरICC WC 2023Fact Check: ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांनी कमिन्सचं अभिनंदन न केल्याचा व्हिडीओ व्हायरल; मात्र, सत्य काही वेगळेच..

Fact Check: ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांनी कमिन्सचं अभिनंदन न केल्याचा व्हिडीओ व्हायरल; मात्र, सत्य काही वेगळेच..

Subscribe

सामन्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यानंतर नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

अहमदाबाद : ऑस्ट्रेलियाने भारताला अंतिम सामन्यात हरवत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. या अंतिम सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला आयोजित रंगारंग कार्यक्रमात विश्वचषक करंडक देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्सदेखील हजर होते. मात्र, व्हायरल व्हिडीओमध्ये पंतप्रधानांनी करंडक दिल्यानंतर ते ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्सला घेऊन गेले असे दिसत आहे. मात्र, फॅक्ट चेकनंतर या व्हिडीओमागील सत्यता समोर आली असून, त्यावेळी नेमकं काय घडलं ते समोर आलं आहे. (Fact Check Video of Deputy Prime Minister of Australia not congratulating Cummins goes viral However the truth is somewhat different)

सामन्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यानंतर नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये ते पॅट कमिन्ससोबत उभे राहतात आणि नंतर स्टेजवरून खाली उतरतात. तर मोदी रिचर्ड मार्ल्स यांनासुद्धा फॉलो करण्याचे संकेतही देतात. असा व्हिडीओ शेअर करणाऱ्यांनी दावा केला की, नरेंद्र मोदींनी विश्वचषक करंडक दिल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचे अभिनंदन करू दिले नाही. पण या व्हायरल व्हिडिओमागील सत्य काही वेगळेच आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ICC WC 2023 : विराटचा चाहता ‘फ्री पॅलेस्टाइन’ टी-शर्ट घालून मैदानावर; दहशतवादी पन्नूकडून लाखोंचे बक्षीस

एडीट करून शेअर करण्यात आला व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. विश्वचषक करंडक देताना नरेंद्र मोदींनी पॅट कमिन्सशीही संवाद साधला. त्यानंतर दोघांनीही हस्तांदोलन केले. स्टेजवरून खाली आल्यानंतर त्याने खाली उभ्या असलेल्या इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंशीही हस्तांदोलन केले. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतरच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू त्यांच्या कॅप्टनसोबत सेलिब्रेशन करण्यासाठी मंचावर पोहोचले.

- Advertisement -

हेही वाचा : WC 2023 : पराभवानंतर भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी ड्रेसिंग रुममध्ये

गुणतालिकेत नेदरलॅंड्सच्या खाली होता ऑस्ट्रेलियाचा संघ

पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत सुरुवात खराब झाली होती. सुरुवातीचे दोन सामने हरल्यानंतर ते गुणतालिकेत नेदरलँड्सच्या खाली होते. पण तिथून सलग 7 सामने जिंकत त्यांनी जोरदार मुसंडी मारली. उपांत्य फेरीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात त्यांनी भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -