घरICC WC 2023ICC WC 2023 Final: अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल? जाणून...

ICC WC 2023 Final: अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल? जाणून घ्या

Subscribe

अंतिम सामन्याच्या दिवशी पाऊस पडला तर काय होईल? मग कोणता संघ जगज्जेता मानला जाईल? आयसीसीने वर्ल्ड कप फायनल आणि पावसाबाबत काय नियम केले आहेत? खरं तर, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसामुळे सामना झाला नाही तर कदाचित विजेतेपदावर परिणाम होणार नाही. आयसीसीने वर्ल्ड कप फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे.

अहमदाबाद: IND Vs AUS Final WC 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. विश्वचषकाचा विजेता रविवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला जगाला कळेल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगणार आहे. जगभरातील सर्व क्रिकेट चाहते या दिवसाची वाट पाहत आहेत. टीम इंडिया या विश्वचषकात खूप मजबूत असल्याचं दिसत आहे आणि भारत तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. (ICC WC 2023 Final What if the final is rained out find out)

अंतिम सामन्याच्या दिवशी पाऊस पडला तर काय होईल? मग कोणता संघ जगज्जेता मानला जाईल? आयसीसीने वर्ल्ड कप फायनल आणि पावसाबाबत काय नियम केले आहेत? खरं तर, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसामुळे सामना झाला नाही तर कदाचित विजेतेपदावर परिणाम होणार नाही. आयसीसीने वर्ल्ड कप फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे.

- Advertisement -

आयसीसीने राखीव दिवसाची केली व्यवस्था

आयसीसीच्या रिझर्व्ह डेच्या नियमानुसार पावसामुळे 19 नोव्हेंबरला खेळ होऊ शकला नाही तर तो दुसऱ्या दिवशी खेळला जाईल. याशिवाय पहिल्या दिवशी पावसामुळे जिथे खेळ थांबला होता, त्याच ठिकाणाहून दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला खेळ पुन्हा सुरू केला जाईल. उदाहरणार्थ, रविवारी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त 22 षटकेच खेळता आली आणि पावसामुळे त्या दिवशी खेळ झाला नाही, तर राखीव दिवशी 22 षटकांपासून पुन्हा खेळ सुरू होईल.

अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. अशा प्रकारे दोन्ही संघ आता विजेतेपदाच्या लढतीत भिडणार आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: डीपफेक हा भारताला भेडसावत असलेला सर्वात मोठा धोका; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -