Maharashtra Assembly Election 2024
घरICC WC 2023IND Vs NED: नेदरलँड्सविरुद्ध 9 खेळाडूंनी का केली गोलंदाजी? रोहित शर्माने...

IND Vs NED: नेदरलँड्सविरुद्ध 9 खेळाडूंनी का केली गोलंदाजी? रोहित शर्माने सांगितलं कारण…

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाने सर्व लीग सामने जिंकून आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने विजयी मोहीम सुरू ठेवली आहे.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने सर्व लीग सामने जिंकून आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने विजयी मोहीम सुरू ठेवली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 विकेट्स गमावच 410 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 47.5 षटकांत 250 धावांवर सर्वबाद झाला. (ICC WC 2023 IND Vs NED Why 9 players bowled against Netherlands Rohit Sharma said because )

भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्यासाठी विजयी मोहीम सुरू ठेवली आहे. सलग 8 विजय नोंदवल्यानंतर, नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा सामना खेळलेल्या टीम इंडियाने 160 धावांचा मोठा विजय मिळवून लीग टप्पा पूर्ण केला. श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या स्फोटक शतकी खेळीच्या जोरावर भारताने 4 विकेट्सवर 410 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सने झुंज देण्याचा प्रयत्न केला पण संपूर्ण संघ 250 धावांपर्यंतच मर्यादित राहिला. या सामन्यात टीम इंडियाच्या कर्णधाराने एक-दोन नव्हे तर 9 गोलंदाजांना संधी दिली, ज्यामध्ये तो स्वतःही सहभागी आहे.

- Advertisement -

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी नेदरलँड्सविरुद्ध गोलंदाजीत हात आजमावला. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहितला याबाबत विचारले असता तो म्हणाला, जेव्हा तुमच्याकडे फक्त 5 गोलंदाज असतात, तेव्हा तुम्ही तुमच्या संघात काही पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करता. आज आमच्याकडे 9 पर्याय होते. आजचा सामना ज्यामध्ये आम्ही काही गोष्टी करून पाहिल्या, हे खूप महत्त्वाचे आहे. बॉलिंग युनिट म्हणून आम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत होतो. यातून काय साध्य करता येईल हे पाहायचे होते.

विराट आणि रोहितने विकेट्स घेतल्या

भारतीय संघाच्या मुख्य गोलंदाजांव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नेदरलँडविरुद्ध गोलंदाजी केली. दोघांना 1-1 विकेटही मिळाली. विराट कोहलीने 3 षटकांत 13 धावा देऊन 1 बळी घेतला तर कर्णधार रोहितने केवळ 5 चेंडू टाकले आणि 1 बळी घेतला.  त्त्याने या एका विकेटसाठी नेदरलॅंड संघाला 7 धावा दिल्या आणि पाचव्या चेंडूवर षटकात मारण्याच्या तयारीत असणाऱ्या फलंदाजाचा झेल पकडत नेदरलँड संघाचा शेवटचा विकेट घेतला.

- Advertisement -

(हेही वाचा: IND vs NED : विश्वचषकचषक स्पर्धेत भारतीय संघाची नवमी; नेदरलँड संघाचा 160 धावांनी पराभव )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -