घरICC WC 2023ICC WC 2023 : पाकिस्तान काही सुधारेना! भारतीय संघावर पुन्हा गंभीर आरोप,...

ICC WC 2023 : पाकिस्तान काही सुधारेना! भारतीय संघावर पुन्हा गंभीर आरोप, केला विचित्र दावा

Subscribe

पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्तने भारत-न्यूझीलंड सामन्यात झाले्ल्या टॉसवरून एक विचित्र दावा केला आहे. काल खेळवल्या गेलेल्या न्यूझीलंड आणि भारताच्या सामन्याच्या वेळीचा टॉस उडवितानाचा व्हिडीओ सिकंदर बख्त यांनी X या सोशल मीडियावर व्हायरल केला आहे

मुंबई : भारतीय संघाने विश्वचषकात चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. भारताने आतापर्यंतचे सर्वच्या सर्व म्हणजेच 10 सामने जिंकले आहेत. काल (ता. 15 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला न्यूझीलंड विरोधातील सामना विजयी होत भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या शिलेदारांनी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. पंरतु, या सामन्यात करण्यात आलेल्या टॉसवरून पाकिस्तानी संघाच्या खेळाडूने विचित्र दावा करत एका नव्या वादाला सुरुवात केली आहे. (ICC WC 2023: Pakistan again makes serious allegations against the Indian team)

हेही वाचा – IND vs NZ : भारतीय संघाचा विजय वादात; न्यूझीलंड मीडियाकडून खेळपट्टीसंदर्भात आरोप

- Advertisement -

पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्तने भारत-न्यूझीलंड सामन्यात झाले्ल्या टॉसवरून एक विचित्र दावा केला आहे. काल खेळवल्या गेलेल्या न्यूझीलंड आणि भारताच्या सामन्याच्या वेळीचा टॉस उडवितानाचा व्हिडीओ सिकंदर बख्त यांनी X या सोशल मीडियावर व्हायरल केला आहे आणि म्हटले आहे की, रोहित शर्मा नाणेफेक करताना मुद्दामहून नामे दूर फेकत आहे. यात काही तरी गडबड आहे. या व्हिडीओसोबत सिकंदर याने रोहित शर्माचे नाणेफेक करतानाचे इतर व्हिडीओ सुद्धा पोस्ट केले आहेत.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त याने पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला की, नाणेफेकीच्या वेळेचा व्हिडिओ दाखवता येईल का, हे पाहा जेव्हा रोहित शर्मा नाणेफेक करतो तेव्हा तो नाणे दूर फेकून देतो आणि दुसरा कर्णधार कधीही जाऊन पाहत नाही की, नाणे कोणत्या बाजूने पडले किंवा कोणाच्या बाजूने पडले? यात काहीतरी गडबड आहे. रोहित शर्मा नाणेफेक जिंकण्यासाठी जाणूनबुजून नाणे दूर फेकत असल्याचा आरोपही बख्त याच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

भारतीय संघाने अंतिम फेरीत स्थान निश्चित केल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत BCCI आणि भारतीय संघावर पाकिस्तानकडून अनेक आरोप करण्यात आले आहे. सिकंदर बख्त याच्याशिवाय एका पाकिस्तानी चाहत्याचाही एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो व्यक्ती म्हणतोय की, रोहित शर्मा मुद्दाम नाणे दूर फेकतो आणि त्यानंतर मॅच रेफ्री भारताने टॉस जिंकला असे सांगतो, यात काहीतरी गडबड आहे. त्यामुळे पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडू असोत किंवा तिथले नागरिक असो हे काही सुधारणार नाही, असेच आता म्हणावे लागणार आहे.

याआधी सुद्धा भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यावरून पाकिस्तानकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीवर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू हसन रझा याने प्रश्न उपस्थित केले होते. एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना हसन रझा म्हणाला की, यावर्षी अनेक गोष्टी भारताच्या बाजूने गेल्या आहेत. मग ते रिव्यू असो किंवा आणखी काही. मोहम्मद शमी आणि सिराजची गोलंदाजी पाहा. आम्ही पण एकेकाळी खेळायचो. तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग व्हायचा. पण इथे काही तरी वेगळे होत आहे? मला असे वाटते की चेंडू बदलला जात आहे. आयसीसी त्यांना चेंडू देत आहे की, बीसीसीआय त्यांना देत आहे हे माहीत नाही. परंतु आयसीसीने याठिकाणी काय चालले आहे ते पहावे, अशी मागणी हसन रझाने केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -