अहमदाबाद : विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना गुजरातमधील अहमदाबादमध्ये खेळल्या जात आहे. संपूर्ण देशभर क्रिकेट फिवर चढलेला असताना भाजपच्या एका नेत्याने या सामन्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांचे ते वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे. (IND Vs AUS Final BJP leaders big statement on India vs Australia match said…)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वकप स्पर्धेचा अंतिम सामना सुरू असून, जो तो या सामन्यावर आपले मत व्यक्त करत आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनीसुद्धा भाष्य केलं असून, ते म्हणाले की, आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणारा सामना हा भारत जिंकणार असून, या सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
राजकारण्यांवरही क्रिकेट फिवर
भारतात दोन गोष्टींचे वेड आहे. एक म्हणजे चित्रपट आणि दुसरे म्हणजे क्रिकेट. याच क्रिकेटवेड्या देशातील राजकीय नेत्यांवरही आजच्या दिवशी क्रिकेट फिवर दिसून आला. राजकीय नेत्यांनी सुद्धा भारतीय खेळाडूंना विजयी भव! च्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांनी आपल्या X या सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : पॅलेस्टिन समर्थक घुसला मैदानात, विराटचा धरला हात; अहमदाबाद स्टेडियममध्ये खळबळ
प्रियंका गांधींनी सांगितल्या आजी इंदिरा गांधीच्या आठवणी
काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांनी शुभेच्छा देत म्हटले आहे की, “आज भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना खेळणार आहे. इंदिरा गांधी सांगायच्या की, हा खेळ देशातील करोडो लोकांना बंधुत्वाच्या एका धाग्यामध्ये बांधून ठेवतो. या धाग्यामध्ये एक आशा आहे, एक विश्वास आहे. एका प्रार्थनेसाठी लाखो लोक एकत्र येतात. 1983 पासून खेळाप्रती करोडो लोकांची भावना आजही तशीच आहे. आज जेव्हा संपूर्ण देश एका आवाजात टीम इंडियाचा जयजयकार करत आहे, तेव्हा मला इंदिराजींनी सांगितलेली ही सुंदर गोष्ट आठवली. भारत जिंकणार, जय हिंद”, असे लिहित प्रियंका गांधी यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : LIVE IND vs AUS WC Final : भारताला मोठा धक्का, विराट कोहली बोल्ड, टीम…
अमित शहांनीही दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा
भाजपच्या नेत्यांकडून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचासुद्धा समावेश असून, त्यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहले की, आपल्या टीम इंडियाने विश्वचषकामधील सर्व सामने जिंकत एक रेकॉर्ड तयार केले. भारतातील 140 कोटी जनता टीम इंडियाच्या समर्थनार्थ उभे असून, त्यांना विश्वचषक जिंकण्यासाठी शुभेच्छा.