मुंबई : विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सध्या अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या सामन्यासाठी संपूर्ण देशातील नामांकित व्यक्तींनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या असताना दुसरीकडे मात्र, भारताचे दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा यांनी वेगळेच ट्वीट केले आहे. त्यांचे ते ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. (IND Vs AUS Final I am not watching the India vs Australia match Who said that? read-)
भारतीय उद्योजक आनंद महिंद्रा हे आजचा टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पाहत नाहीत. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली असून, त्याचे कारणही सांगितले आहे.
No, no, I am not planning to watch the match (my service to the nation 🙂) But I will, indeed, be wearing this jersey and installing myself in a hermetically sealed chamber with no contact with the outside world until someone knocks and tells me we’ve won… pic.twitter.com/HhMENqORp1
— anand mahindra (@anandmahindra) November 19, 2023
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्वीटर) अकाऊंटवर पोस्टमध्ये निळ्या जर्सीची छायाचित्रे शेअर केली आणि स्वत: ला एका सीलबंद चेंबरमध्ये बंदीस्त केले, जेथे बाहेरील जगाशी संपर्क होणार नाही अशीही व्यवस्था त्यांनी केली आहे. ते या पोस्टमध्ये पुढे लिहतात की, जोपर्यंत कोणीतरी दरवाजा ठोठाऊन मला सांगत नाही की आम्ही जिंकलो…लिहले आहे.
एकदिवशी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे, जिथे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक फायनलपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी X (पूर्वीचे ट्वीटर) वर लिहिले की, टीम इंडियाला शुभेच्छा. 140 कोटी भारतीय तुमचा जयजयकार करत आहेत. पुढे त्यांनी लिहले की, तुम्ही चमकले, चांगले खेळा आणि खिलाडूवृत्तीची भावना कायम ठेवा. मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स अंतिम सामना पाहणार आहेत.
हेही वाचा : PHOTO : अंतिम सामना पाहण्यासाठी पोहचली अनुष्का; आधी वाजवल्या टाळ्या अन्…
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावेळी बिग बींची पोस्ट झाली होती व्हायरल
याच विश्वचषका दरम्यान भारतविरुद्ध न्यूझीलंड सामन्यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी मी जेव्हा सामना पाहत नाही तेव्हाच भारत जिंकतो अशी पोस्ट केली होती. अशाच काहीशा समजुतीने आनंद महिंद्रा यांनी सुद्धा खास पोस्ट केली आहे.
हेही वाचा : LIVE IND vs AUS WC Final: फलंदाजाच्या फ्लॉप शोनंतर गोलंदाजांकडून चमत्काराची अपेक्षा; 241 धावांचे…
ऑस्ट्रेलियापुढे 241 धावांचे लक्ष
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ 50 षटकांत 240 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 षटकात 241 धावा करायच्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट पडल्या आहेत. मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड क्रीजवर आहेत.