अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळल्या गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ 50 षटकांत 240 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 षटकांत 241 धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने डाव सावरत भारतीय संघाला मात देत पुन्हा एकदा विश्वचषचकावर नाव कोरले. (IND vs AUS Final Indian team in the final match… Australia won the World Cup)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ 240 धावांत ऑलआऊट झाला. कांगारू संघाने विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 आणि विराट कोहलीने 54 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन बळी घेतले. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा : मोहम्मद शमीच्या कामगिरीवर मुख्यमंत्री आदित्यनाथही फिदा; पाच कोटींचे दिले गिफ्ट
श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार सपशेल अपयशी
भारतासाठी या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची सर्वात मोठी भागीदारी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. रोहित, कोहली आणि राहुलला चांगली सुरुवात मोठ्या डावात करता आली नाही. श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार मोठ्या क्षणी अपयशी ठरले. या विश्वचषकात भारत प्रथमच ऑलआऊट झाल्याचे पहायला मिळाले. फलंदाजीनंतर संपूर्ण जबाबदारी गोलंदाजांवर येऊन ठेपल्यानंतर मोहम्मद शमीने अंतिम सामन्यात फक्त एक विकेट घेतली.
हेही वाचा : IND vs AUS WC Final: फलंदाजाच्या फ्लॉप शोनंतर गोलंदाजांकडून चमत्काराची अपेक्षा; 241 धावांचे आव्हान
ऑस्ट्रेलियाचा 3 बाद 162 धावा
ऑस्ट्रेलियाने 28 षटकात 3 विकेट गमावत 162 धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड 84 आणि मार्नस लॅबुशेन 34 धावांवर नाबाद होते. दोघांनी चौथ्या विकेटसाठी खूप मोठ्या धावांची भागीदारी केली.
ट्रॅव्हिस हेडची खेळी निर्णायक
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ 50 षटकांत 240 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट गमावत 241 धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने 137 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मारांश लॅबुशेनने नाबाद 58 धावा केल्या. मिचेल मार्श 15 धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला होता.
सहाव्यांदा ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकावर ताबा
1987
1999
2003
2007
2015
2023*