घरICC WC 2023IND vs AUS : सामना मैदानात पाहाणं सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर; हॉटेल- ट्रॅव्हल दरात...

IND vs AUS : सामना मैदानात पाहाणं सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर; हॉटेल- ट्रॅव्हल दरात 200 टक्क्यांनी वाढ

Subscribe

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड संघावर मात करत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचलेल्या टीम इंडियाला आव्हान देणार आहे तो ऑस्ट्रेलियाचा संघ.

अहमदाबाद : तब्बल 20 वर्षांनतर ऑस्ट्रेलिया आणि भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एकमेकांशी भीडणार आहेत. 2003 च्या विश्वचषकात हे दोन्ही संघ एकमेकांशी भीडले होते. तेव्हा 20 वर्षापूर्वीचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज असून, हाच थरार अनुभवण्यासाठी क्रिकेटरसिकही उत्सूक आहेत. असे असताना मात्र, या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये हॉटेल्ससह, फ्लाइटच्या तिकिटांच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली असून, हा सामना मैदानात पाहणं सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्याची सध्या तरी स्थिती आहे. (IND vs AUS  Watching the match on the ground is beyond the reach of common people 200 percent hike in hotel-travel rates)

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड संघावर मात करत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचलेल्या टीम इंडियाला आव्हान देणार आहे तो ऑस्ट्रेलियाचा संघ. हा सामना रविवारी खेळवल्या जाणार आहे. हा सामना मैदानात पाहण्याची इच्छा मनी बाळगणाऱ्यांच्या खिशाला मात्र, चांगलाच चाप बसत असल्याची स्थिती आहे. कारण, अहमदाबादमधील हॉटेल्स सध्या बुक झाल्या असून, या त्या हॉटेल्सचे दर गगनाला भीडले आहेत. ज्या हॉटेल्समधील एका रुमचे सर्वसाधारण एका रात्रीचे भाडे 24 हजार रुपये एवढे होते ते आता वाढून 2 लाख 15 हजार एवढे झाले आहे. तर ज्या हॉटेल्सच्या एका रुमचे एका रात्रीचे भाडे एक ते दीड हजार रुपये एवढे होते ते आता वाढून 10 हजार एवढे झाले आहे. अशीच स्थिती 14 ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्या दरम्यान झाली होती. असे असले तरी अंतिम सामना पाहण्यासाठी क्रिकेटरसिक तुंबळ गर्दी करत असून, अनेकांनी तर आहे ती रक्कम मोजून हॉटेल्समधील रुम बुक केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : IND Vs AUS Final: फायनलसाठी पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित; खास एअर शोचे आयोजन

फ्लाइटच्या तिकिटात 200 ते 300 रुपयांनी वाढ

हॉटेलिंगसोबतच अनेकजण हा सामना पाहण्यासाठी देश विदेशातून गुजरातेत दाखल होत आहेत. ज्यांनी आधीच या सामन्यासाठी तिकिट आरक्षीत केले होते त्यांचं बरं परंतू आता वेळेवर गुजरातमधील अहमदाबाद गाठणाऱ्यांच्या तिकिट दरात तब्बल 200 ते 300 रुपयांनी वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ICC WC 2023: विश्वचषकाची अंतिम फेरी भारत-ऑस्ट्रेलिया; 2003 चा वचपा काढणार का?

काही क्षणातच विकल्या गेले तिकिट

रविवारी 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या अंतिम सामन्याच्या तिकिट विक्रीसाठी 13 नोव्हेंबर रोजी काही मिनिटासाठी अधिकृत संकेतस्थळ खुले करण्यात आले होते. यावेळी काही क्षणातच सर्व तिकिटं विक्री झाली होती. या सामन्यांचे सर्वात कमी दराचे तिकीट 10 हजार रुपयांच होते. तर हा अंतिम सामना पाहण्यासाठी जाण्याआधीच बुकिंग केलेले ई- तिकिट प्रिंट करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -