घरICC WC 2023IND vs NZ : महेंद्रसिंग धोनीचे 10 वर्ष जुने ट्वीट होतेय व्हायरल;...

IND vs NZ : महेंद्रसिंग धोनीचे 10 वर्ष जुने ट्वीट होतेय व्हायरल; रवींद्र जडेजाबद्दल असे काय म्हटले?

Subscribe

नवी दिल्ली : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत (ICC World Cup 2023) भारतीय संघाने (India) न्यूझीलंडचा (New zealand) पराभव करत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला आहे. बुधवारी (15 नोव्हेंबर) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stedium) पार पडलेल्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि श्रेयस अय्यर  (Shreyas Iyer) यांच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) 7 विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला 10 षटके टाकताना एकही विकेट मिळाली नाही. याशिवाय त्याने सामन्यात तीन झेल सोडले. असे असतानाही रवींद्र जडेजा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आला आहे. (IND vs NZ Mahendra Singh Dhonis 10 year old tweet goes viral What was said about Ravindra Jadeja)

हेही वाचा – ICC World Cup 2023 : “साहबने बोला हैं…”; विश्वचषक अंतिम सामन्याआधी राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत

- Advertisement -

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 397 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. 39 धावा संघाने आपल्या 2 विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी संघाला सावरले. दोघांनी संघाची धावसंख्या 220 पर्यंत नेली. त्यामुळे भारतीय संघावर प्रचंड तणाव होता. अशातच कर्णधार केन विल्यमसन बाद झाला आणि लगेचच टॉम लॅथमही बाद झाला. पण डेरिल मिचेलसोबत पाचव्या क्रमांकावर आलेल्या ग्लेन फिलिप्स पुन्हा भागिदारी केली. त्यामुळे भारताच्या पुन्हा अडचणी वाढू लागल्या. अशातच 43 व्या षटकात सामना भारताच्या बाजूने फिरला.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs NZ : भारतीय संघाचा विजय वादात; न्यूझीलंड मीडियाकडून खेळपट्टीसंदर्भात आरोप

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने लाँग ऑफमध्ये ग्लेन फिलिप्सचा झेल घेतला. झेल पकडल्यानंतर जडेजा चेंडू घेऊन मागे गेला आणि सीमारेषेपासून काही अंतरावर जाऊन बसला. यानंतर मैदानावर आलेल्या मार्क चॅपमनने कुलदीप यादवच्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने स्वीप शॉट खेळला. परंतु चेंडू पुन्हा एकदा रवींद्र जडेजाच्या हातात जाऊन स्थिरावला. यानंतर आक्रमक फलंदाजी करणाऱ्या डॅरिल मिशेलला मोहम्मद शमीने सामन्यातील 46 वे षटक बाद  केले. पुन्हा एकदा चेंडू थेट जडेजाच्या हातात जाऊन स्थिरावला. जणू काही तिन्ही वेळेला जडेजा जिथे आहे तिथेच चेंडू गेल्याचे पाहायला मिळाले. यानंतर महेंद्रसिंग धोनीचे दहा वर्षांपूर्वीचे ट्वीट प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

धोनीच्या ट्वीटमध्ये काय?

महेंद्र सिंह धोनीने 9 एप्रिल 2013 रोजी केलेले ट्वीट व्हायरल होताना दिसत आहे. या ट्वीटमध्ये धोनीने म्हटले की, “सर जडेजा कॅच पकडण्यासाठी अजिबात धावाधाव करत नाहीत. कारण चेंडू स्वत:हून त्याला शोधत येतो आणि त्यांच्या हातात स्थिरावतो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -