घरICC WC 2023India Vs Netherlands: भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना थोड्याच वेळात, भारताचे 9व्या विजयाकडे...

India Vs Netherlands: भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना थोड्याच वेळात, भारताचे 9व्या विजयाकडे लक्ष

Subscribe

भारत विरुद्ध नेदरलँड्स वर्ल्ड कप 2023 चा 45 वा सामना आज म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध नेदरलँड सामन्याने लीग टप्पा संपेल.

बंगळुरू: भारत विरुद्ध नेदरलँड्स वर्ल्ड कप 2023 चा 45 वा सामना आज म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध नेदरलँड सामन्याने लीग टप्पा संपेल. शनिवारी रात्री पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडल्याने उपांत्य फेरीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. भारताशिवाय दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना किवींशी म्हणजेच न्यूझीलंडसोबत होणार आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना 5 वेळचा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. भारताला उपांत्य फेरीपूर्वी सराव करण्याची ही शेवटची संधी असेल. (India Vs Netherlands India vs Netherlands match soon India eyes 9th win)

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स दोनदा भिडले आहेत आणि या दोन्ही वेळा भारताने विजय मिळवला आहे. 2003 मध्ये टीम इंडियाने नेदरलँडचा 68 धावांनी तर 2011 मध्ये 5 विकेटने पराभव केला होता.

- Advertisement -

सामना जिंकणं नेदरलँडसाठी गरजेचं

विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान व्यतिरिक्त टॉप-7 संघांना चॅम्पियन ट्रॉफी 2023 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं यजमानपद पाकिस्तानकडे असल्याने त्यांनी आधीच या स्पर्धेत प्रवेश केला आहे. सध्या पॉइंट टेबलमध्ये नेदरलँड्स शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे संघाला आजचा सामान कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल.

प्रसिद्ध कृष्णाला मिळणार संधी?

भारतीय संघ उपांत्य फेरीपूर्वी कोणताीह धोरणात्मक प्रयोग करणार नसल्याचं, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं. पण, या सामन्याकडे उपांत्य फेरीचा सराव सामना म्हणून पाहिल्यास काही खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे. टीम इंडिया आज जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देऊ शकते आणि प्लेइंग-11 मध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

भारतीय संघाची प्लेइंग-11

टीम इंडिया: रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/ आर अश्विन, जसप्रीत बुमराह / प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

(हेही वाचा: शेवटच्या सामन्यात बांगलादेशची तुफान फटकेबाजी; कांगारूंना दिले 307 धावांचे लक्ष्य )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -