HomeICC WC 2023ODI World Cup 2023 : 12 वर्षांनंतर विश्वचषकात पुनरागमन करणाऱ्या संघासोबत भारताचा...

ODI World Cup 2023 : 12 वर्षांनंतर विश्वचषकात पुनरागमन करणाऱ्या संघासोबत भारताचा उद्या सराव सामना

Subscribe

नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी (ODI World CUp 2023) प्रत्येक संघ सराव सामने खेळताना दिसत आहे. उद्या भारतीय संघ (Indian Team) विश्वचषक मोहिमेपूर्वी तिरुवनंतपुरम येथे तब्बल 12 वर्षांनी विश्वचषक सामन्यात पुनरागमन करणाऱ्या नेदरलँडसोबत (Netherlands) सराव सामना खेळणार आहे. नेदरलँड्स संघाने वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा पराभव करत पाचव्यांदा विश्वचषकासाठी क्वालिफाय केले आहे. (ODI World Cup 2023 Indias warm up match today against the team making a comeback to the World Cup after 12 years)

हेही वाचा – Asian Games : भारताने रचला इतिहास; आठव्या दिवशी विक्रमी पदक जिंकताना 13 वर्षं जुना विक्रम मोडला

भारतीय संघाचा गुवाहाटी येथील इंग्लंडसोबतचा पहिला सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडसारख्या तगड्या संघासोबत सरावाची संधी मिळाली नाही. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर पावसाला सुरूवात झाली आणि त्यानंतर पाऊस थांबत नसल्यामुळे अखेर सामना रद्द करावा लागला होता. त्यामुळे उद्या भारतीय संघ तिरुअनंतपुरममध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात कसून सराव करताना दिसणार आहे. भारतीय खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी आज चांगला सराव करतील जेणेकरून त्यांना विश्वचषक मोहिमेची सुरुवात चांगली करता येईल.

भारतीय संघ वरचढ

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 3 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी ठरला आहे. 12 जुलै 1996 रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 19 धावांनी विजय मिळवला होता. 13 जुलै 1996 रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 156 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. 27 ऑक्टोबर 2012 रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 9 धावांनी विजय मिळवला होता.

हेही वाचा – सरासरी 80 वर्षांच्या आयुष्यात आपण सर्वाधिक वेळ कुठे घालवतो? धक्कादायक आकडेवारी आली समोर

नेदरलँड संघाची विश्वचषकातील कामगिरी 

नेदरलँड्स संघाने वेस्ट इंडिज संघाचा पराभव करत 2011 नंतर तब्बल 12 वर्षांनी विश्वचषकात पाचव्यांदा पुनरागमन केले आहे. नेदरलँड्स  संघाने 1996 मध्ये पहिल्यांदा विश्वचषकाचे तिकिट मिळवले होते. त्यानंतर 2003, 2007 आणि 2011 अशा सलग तीन विश्वचषकासाठी नेदरलँड्स संघाने प्रवेश मिळवला होता, पंरतु त्यांना साखळी फेरीतून पुढे जाता आले नाही. आतापर्यंत नेदरलँड्स संघाने चार विश्वचषकात 20 सामने खेळले आहेत, यामध्ये त्यांना 18 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतात झालेल्या 2011 च्या विश्वचषकात नेदरलँड्स संघाला सहा सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे भारतात होणाऱ्या यंदाच्या विश्वचषक नऊ साखळी सामने खेळताना किती जिंकणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले असेल.