नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानचा प्रवास जवळपास संपला आहे. पाकिस्तानी संघाला उपांत्य फेरी गाठणे अशक्य आहे. शेवटच्या चार संघामध्ये प्रवेश करायचा असेल तर इंग्लंडला शेवटच्या सामन्यात किमान 287 धावांनी पराभूत करावे लागेल किंवा धावांचा पाठलाग करताना 3.4 षटकात लक्ष्य गाठावे लागेल. या दोन्ही परिस्थिती अशक्य आहेत. अशा स्थितीत पाकिस्तान उपांत्य फेरीतून बाहेर पडणार हे निश्चित मानले जात आहे. पाकिस्तान संघ विश्वचषकातून बाहेर पडल्याने सोशल मीडियातून त्या संघाची खिल्ली उडवली जात आहे. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आघाडीवर आहे. (Pakistan teams journey to World Cup halted Sehawag said- Pakistan Zinda Bhag)
पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का गुरुवारी (9 नोव्हेंबर) रात्री बसला, जेव्हा न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला. जर न्यूझीलंडने मोठा विजय नोंदवला नसता, तर पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी काही आशा उरल्या असत्या, परंतु आता स्पर्धेतील त्यांचा पुढील प्रवास अशक्य आहे.
हेही वाचा : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय होईल? उज्ज्वल निकम यांचे सूचक वक्तव्य
सोशल मीडियावर नुसता मीम्सचा पाऊस
गुरुवारी रात्रीपासून भारतीय क्रिकेट चाहते पाकिस्तानच्या या अवस्थेचा आनंद घेत आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघावर अनेक मीम्स बनवले जात आहेत. काहीजण लिहित आहेत की, पाकिस्तान कराची विमानतळासाठी पात्र ठरला आहे, तर काहींनी पाकिस्तानी खेळाडूंना पीठ देऊन मायदेशी परतताना दाखवले आहे. सर्वात खास प्रतिक्रिया वीरेंद्र सेहवागकडून आली आहे. त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने पाकिस्तान ‘झिंदाबाद’ ऐवजी पाकिस्तान ‘जिंदा भाग’ असे लिहिले आहे.
हेही वाचा : Breaking : डॉ. संजीव ठाकूर यांची उचलबांगडी; ललित पाटील प्रकरण आलं अंगलट?
पाकिस्तान संघाची अवस्था वाईट
पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासूनच सुमार कामगिरी करताना दिसून आला. अशातच आता पाकिस्तानचा शेवटचा गट सामना शनिवारी (11 नोव्हेंबर) कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर इंग्लंडशी होणार आहे. यामध्ये पाकिस्तान संघाला मोठ्या धावसंख्येने इंग्लंडवर विजय मिळवावा लागणार आहे. परंतू ते अशक्य असणार आहे. याआधीच पाकिस्तान संघात मोठी उलाढाल झाली असून, ती म्हणजे पाकिस्तान संघाचा मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. आता पाकिस्तान संघ पराभूत होऊन मायदेशी परतल्यावर त्यांना पाकिस्तानी क्रिकेटरसिकांच्या टीकेला उत्तर द्यावे लागणार आहे.