अहमदाबाद : विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू असताना एक घटना घडली. विराट कोहलीच्या एका चाहत्याने स्टेडियमची सुरक्षा भेदत थेट मैदानात प्रवेश केला. एवढेच नाही त्याने चक्क विराट कोहलीची गळाभेटही घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नेमकं काय घडतेय हे कुणालाच काही कळत नव्हते. काही वेळाने सुरक्षा रक्षकाने त्या फॅन्सला मैदानाबाहेर काढले. फायनल सामन्यादरम्यान मैदानात घुसलेल्या व्यक्तीला अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.(Palestine supporters entered the field, holding Virats hand Excitement at the Ahmedabad Stadium)
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यादरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी त्रुटी दिसून आली. अहमदाबाद स्टेडियममध्ये 1 लाख 30 हजार प्रेक्षक उपस्थित होते. याची सर्वांना आधीच कल्पना होती. त्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, एका चाहत्याने पूर्ण सुरक्षा झुगारून मैदानात प्रवेश केला. ही घटना भारतीय डावाच्या 14 व्या षटकात घडली. त्यावेळी विराट कोहली आणि के.एल. राहुल मैदानावर होते तर एडम झम्पा गोलंदाजी करत होता.
गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाला असून, भारत तीन बाद 130 धावांवर पोहचला आहे. विराट कोहली आणि के. एल. राहुल सध्या धावगती पुढे ढकलत आहेत. मात्र, या सामन्या दरम्यान विराट कोहलीच्या एका चाहत्याने स्टेडियमची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था झुगारत मैदानात प्रवेश केला आणि विराटच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकानी अलर्ट होत त्या चाहत्याला ताब्यात घेऊन त्याला मैदानातून बाहेर काढले. यामुळे काहीकाळ सामना थांबविण्यात आला होता.
त्याच्या टी-शर्टवर पॅलेस्टाइन झेंडा
विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात प्रवेश करणाऱ्या त्या व्यक्तीने टी-शर्ट घातलेले होते. त्या टी-शर्टवर पॅलेस्टाइनचा ध्वज होता. एवढेच नव्हे तर पॅलेस्टाइनला स्वतंत्र करा असे घोषवाक्य सुद्धा लिहलेले होते. एकुणच हा चाहता प्रदर्शन करण्याच्या मनसुभ्यानेच मैदानात आल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. हा चाहता जेव्हा मैदानात पोहचला तेव्हा विराट कोहली त्याला पाहून फक्त हसत होता. त्यानंतर विराट ऑस्ट्रेलियाचा कर्णधारा पॅट कमिन्ससोबत काही चर्चा करतानाही दिसला.
हेही वाचा : LIVE IND VS AUS WC FINAL : भारताला मोठा धक्का, विराट कोहली बोल्ड, टीम इंडिया 4 बाद 148
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये अंतिम सामना खेळल्या जात असून, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची खराब सुरुवात झाली. भारताने झटपट तीन विकेट गमावल्या.
हेही वाचा : 1 हजारच्या बदल्यात 1300 रुपये दिले; त्यानंतर महिलेला बसला धक्का, बँक खात्यातून स्कॅमरने 36…
भारताने दोन तर ऑस्ट्रेलियाने जिंकले पाच वर्ल्ड कप
भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरला आहे. याआधी भारताने 1983, 2011 चा विश्वचषक जिंकला आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने 1987, 1999, 2003, 2007 आणि 2017 असे एकूण पाच विश्वचषक जिंकले आहेत.