घरICC WC 2023चालणे तर सोडाच धड उभंही राहता न येणाऱ्या मॅक्सवेलला का नाही मिळाला...

चालणे तर सोडाच धड उभंही राहता न येणाऱ्या मॅक्सवेलला का नाही मिळाला रनर? वाचा-

Subscribe

अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळविल्या गेला.

मुंबई : विश्वचषक 2023 मध्ये अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलच्या अफगाणिस्तानविरुद्ध 201 धावांच्या नाबाद खेळीमुळे ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. यावेळी मॅक्सवेल दुखापतग्रस्त होऊनही मैदानावर खेळत राहिला, पण तरीही पंचांनी त्याला रनर दिला नाही. खरं तर, आयसीसीच्या नियमांनुसार आता कोणताही जखमी खेळाडू फलंदाजी करताना धावपटूची मागणी करू शकत नाही. (Why didnt Maxwell who couldnt even walk let alone stand get a runner read)

अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळविल्या गेला. सामन्यादरम्यान मॅक्सवेलला दुखापतीचा सामना करावा लागला आणि प्रत्येक षटकात पिचवर धावणे अधिक आव्हानात्मक बनले, तेव्हा प्रेक्षकांना आश्चर्य वाटू लागले की, त्याला धावपटू (रनर) का दिला नाही.

- Advertisement -

या खेळाडूंना मिळाला होता रनर

हा अधिकार पूर्वी इतर अनेक फलंदाजांना मिळत होता. मात्र 2003 च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धच्या 98 धावांच्या खेळी दरम्यान वीरेंद्र सेहवाग जगजाहीरपणे सचिन तेंडुलकरसाठी रनर म्हणून मैदानात उतरला होता. तर विरेंद्र सेहवागच्या 175 धावांच्या खेळीवेळी गौतम गंभीर सेहवागसाठी रनर म्हणून मैदानात उतरला होता. 2011 च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्याबरोबर चार वर्षांपूर्वी युवराज सिंग बांगला टायगर्सविरुद्ध एमएस धोनीसाठी रनर म्हणून आला होता.

हेही वाचा : नितीश कुमारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर महिला आयोग Action मोडवर; विधानसभा अध्यक्षांना नोटीस

- Advertisement -

यामुळे नाही मिळाला मॅक्सवेलला रनर

मॅक्सवेलने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यांत रनर का घेतला नाही यामागील कारण सोपे आहे. कारण, 2011 मध्ये रनर देण्याचा नियमच ठेवला नाही. ICC कार्यकारी समितीने एक निर्णय जारी करून एकदिवशीय सामन्यांमध्ये जखमी फलंदाजांना धावपटू देण्याची परंपरा बंद केली आहे. ICC कार्यकारी समितीने 2011 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये जखमी फलंदाजांसाठी धावपटू न देण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा : OBC ना आरक्षण देणाऱ्या अध्यादेशाविरोधीतील याचिकेवर सुनावणी पुढील वर्षांत; सरकारला अल्टिमेटम

हे दिले होते आयसीसीने कारण

रनर न देण्याचा हा निर्णय शिफारशींचा एक भाग होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की, यामुळे खेळामध्ये खूप व्यत्यय येतो आणि वेळ वाया जातो. हा नियम फक्त आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी लागू आहे. स्थानिक क्रिकेट सामन्यांसाठी रनरचा नियम तसाच ठेवण्यात आला आहे. त्यावेळी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -