घरICC WC 2023अंतिम सामन्यांत नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे ठरले; अक्रमने सांगितले टीम इंडियाच्या पराभवाचे कारण

अंतिम सामन्यांत नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे ठरले; अक्रमने सांगितले टीम इंडियाच्या पराभवाचे कारण

Subscribe

विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

नवी दिल्ली : विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यांत रविवारी (19 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारताच्या पराभवाने केवळ चाहतेच नाही तर माजी दिग्गजांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने नाणेफेकबाबत मत व्यक्त केले आणि नाणेफेक गमावणे भारताचे दुर्दैव असल्याचे मान्य केले. वसीम अक्रम म्हणाला की, फायनलसारख्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणे महत्त्वाची ठरणे हे मोठ्या सामन्यांसाठी चांगले नसल्याचे स्पष्ट मत अक्रमने व्यक्त केले आहे. (Winning the toss proved crucial in the finals Akram said the reason for Team Indias defeat)

विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला. भारताच्या पराभवाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले, फायनलपूर्वी सर्वांनी भारताला विश्वविजेता म्हणूनच घोषित केले होते. पण ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. याशिवाय फलंदाजीत ट्रॅव्हिस हेड आणि लॅबुशेन यांनी दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले. ट्रॅव्हिस हेडला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा : ‘लेडीलक’ का कमाल; कमिन्सआधी धोनी आणि ‘या’ कर्णधारांसोबतही हेच घडलं

दिवस-रात्र खेळल्या जाणाऱ्या सामन्यावरही ठेवले बोट

दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना सामन्यात समान संधी मिळायला हवी. नाणेफेकीवर खेळाचा निर्णय घेतला जाऊ नये. मला माहीत आहे की दिवस-रात्रीच्या सामन्यामुळे अधिक चाहते स्टेडियमवर येतील. टीव्ही टेलिकास्टचा अधिक फायदा होईल. जास्तीत जास्त लोक टीव्हीवर मॅच बघतील. प्रेक्षकसंख्या वाढेल. पण एवढा खेळ केल्यानंतर मॅचमध्ये टॉस महत्त्वाचा ठरला तर नुकसानच आहे. दोन्ही संघ खूप मेहनत केल्यावर अंतिम फेरीत पोहोचतात तेव्हा दोन्ही संघाना समान खेळाचे मैदान मिळायला हवे असेही मत अक्रमने व्यक्त केले.

- Advertisement -

हेही वाचा : BCCI: भारतीय संघासोबतच राहुल द्रविडचा प्रवासही संपला? लवकरच मोठी घोषणा

आता प्लेऑफ आयोजित करण्याची वेळ आली आहे

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना वसीम पुढे म्हणाला की, मैदानावर, खेळपट्टीवर जर दव पडण्याची समस्या असेल, तर तुम्ही दिवसाचे सामने आयोजित केले पाहिजेत, स्टेडियम झाकण्याचा विचार केला पाहिजे. काहीतरी केले पाहिजे, जर तुम्हाला दोन्ही संघांना समान खेळाचे मैदान द्यायचे असेल तर हे करणे जरुरीचे आहे. पुढे तो म्हणाला की, उपांत्य फेरीपेक्षा प्लेऑफ आयोजित करण्याचा विचार करणे चांगले आहे. कारण जर वाईट दिवस असेल तर सर्वोत्तम संघ स्पर्धेतून बाहेर पडतो. मला वाटते की आता प्लेऑफ आयोजित करण्याची वेळ आली असल्याचेही मत त्याने यावेळी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -