घरICC WC 2023World Cup 2023 : विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरीसाठी 'अशी' मिळणार बक्षिसं; आयसीसीकडून यादी जाहीर

World Cup 2023 : विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘अशी’ मिळणार बक्षिसं; आयसीसीकडून यादी जाहीर

Subscribe

World Cup 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतात (India) होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी (World Cup 2023) बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. आयसीसीने स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 82.93 कोटी रुपये ठेवली आहे. विश्वचषक स्पर्धेत पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबरला होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. उद्घाटन आणि अंतिम दोन्ही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहेत. (rewards for outstanding performance in World Cup 2023 List published by ICC)

आयसीसीने शुक्रवारी सांगितले की, विजेत्या संघाला 4 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजेच 33.17 कोटी रुपये मिळणार आहेत तर, अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 16.59 कोटी रुपयांवर समाधान मानावे लागणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये सर्व 10 संघ एकमेकांशी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळतील. गुणतालिकेत अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. 2019 मध्येही विश्वचषक स्पर्धा याच फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – world cup 2023 : विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा; 15 महिन्यांनंतर गोलंदाजाचे पुनरागमन

उपांत्य फेरीत पोहोचू न शकणार संघांना किती बक्षीस?

गट फेरीतील सामने जिंकणाऱ्या संघांनाही आयसीसी बक्षीस देणार आहे. संघांना प्रत्येक विजयासाठी 40 हजार दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 33.17 लाख रुपये मिळतील. गट टप्प्याच्या शेवटी बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या संघांना प्रत्येकी 1 लाख दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 82.92 लाख रुपये मिळतील.

- Advertisement -

कोणत्या फेरीत किती बक्षीस मिळणार?

विजेता संघ – 33.17 कोटी (चार दशलक्ष अमेरिकन डॉलर)
उपविजेता संघ – 16.59 कोटी (US$2 दशलक्ष)
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला – 6.63 कोटी (US$800,000)
गट फेरीत बाहेर पडलेल्या संघाला – 82.92 लाख (US$100,000).
गट फेरीतील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला – 33.17 लाख (US$ 40,000)

हेही वाचा – अरुणाचल प्रदेशच्या खेळाडूंबाबत चीनकडून भेदभाव; भारताकडून तीव्र निषेध, चीननेही दिली प्रतिक्रिया

विश्वचषकात एकूण 48 सामने होणार

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील 13व्या आवृत्तीत 10 संघ विश्वचषकासाठी आमनेसामने येणार आहेत. यजमान भारताव्यतिरिक्त न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्सचे संघ खेळणार आहेत. 10 संघांमध्ये एकूण 48 सामने खेळवले जातील. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी प्रत्येक संघ 46 दिवस चालणाऱ्या स्पर्धेच्या तयारीसाठी दोन सराव सामने खेळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -