घरIPL 2020IPL Betting : आयपीएलच्या मॅचेस ठरल्या बुकींसाठी बुस्टर! २२ जण अटकेत!

IPL Betting : आयपीएलच्या मॅचेस ठरल्या बुकींसाठी बुस्टर! २२ जण अटकेत!

Subscribe

कोरोना लॉकडाऊनच्या काळात IPL चे सामने म्हणजे सामान्यांसाठी सकारात्मकतेचा, ऊर्जेचा डोस ठरेल, असं म्हटलं जात होतं. IPL 2020 स्पर्धा सुरू झाल्यानंतर तसं चित्र देखील दिसू लागलं. मात्र, त्यासोबतच आयपीएलचे सामने हे देशातल्या आणि परदेशातल्या देखील बुकींसाठी बूस्टर ठरला आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून देशभरात सट्टेबाजीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामध्ये काही जणांना गुन्हे अन्वेषण विभागानं अटक देखील केली आहे. यामध्ये प्रामुख्याने बंगळुरू आणि दिल्लीमध्ये केलेल्या कारवाईचा समावेश आहे. या कारवाईमध्ये आत्तापर्यंत एकूण २२ जणांना अटक करण्यात आली आहे. आयपीएलमधल्या वेगवेगळ्या टीम्सवर बेटिंग लावल्याचं या प्रकरणांच्या तपासातून समोर आलं आहे.

दिल्लीतून १७ जणांना अटक

शुक्रवारी झालेल्या कारवाईत पहिल्यांदा दिल्लीच्या डेव्हिल व्हिलेजमधून १७ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर या ठिकाणी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यातल्या सामन्यावर बेटिंग सुरु असल्याचं दिसून आलं होतं. घटनास्थळावरून पोलिसांनी ६ वॉकीटॉकी, मोबाईल फोन, टीव्ही सेट, वायरलेस इंटरनेट राऊटर, ८१ हजार रोख, पत्त्यांचे १० सेट, सट्टेबाजीचे ५ चार्ट असं साहित्य जप्त केलं आहे. दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

- Advertisement -

बंगळुरूत ४ लाखांची रोकड जप्त

दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी बंगळुरूमध्ये कारवाई केली आहे. बंगळुरूमध्ये सीसीबीने छापा टाकून तब्बल ४ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ७ ऑक्टोबर रोजी झालेली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या मॅचवर सट्टा लावण्यात आल्याचं पोलिसांना समजलं होतं. त्यानुसार केलेल्या या कारवाईत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -