DC vs RR : राजस्थानची पराभवाची मालिका सुरूच; दिल्लीचा राजस्थानवर दणदणीत विजय

राजस्थानच्या पदरी पुन्हा एकदा पराभव आला.

राजस्थान रॉयल्सची आयपीएलच्या तेराव्या हंगामातील खराब कामगिरी सुरूच आहे. शारजावर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला ४६ धावांनी पराभूत केलं. दिल्लीच्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थाननस सर्वबाद १३८ धावाच केल्या. नवख्या यशस्वी जयस्वालने एका बाजू धरून ठेवली मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे राजस्थानच्या पदरी पुन्हा एकदा पराभव आला.

दिल्लीच्या १८५ धावांचा पाठलाग करताना राजस्थानला तिसऱ्याच षटकात बतलरच्या रुपात पहिला धक्का बसला. अश्विनच्या गोलंदाजीवर शिखर धवनने त्याचा अप्रतिम झेल घेतला. बटलरनंतर मैदानावर आलेला राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोठा फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. स्मिथने १७ चेंडूत २४ धावा केल्या. संजू सॅमसन आणि लोमरोर स्वस्तात बाद झाले. अखेरच्या षटकांमध्ये राहुल तेवातीयाने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात त्याला यश आलं नाही. राहुल तेवातीयाने २९ चेंडूत ३८ धावा केल्या. दिल्लीने २० षटकात सर्वबाद १३८ धावाच केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून रबाडा, अश्विन आणि स्टोयनिसने प्रत्येकी २ तर अक्षर पटेल, नॉर्टजेने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत १८४ पर्यंत मजल मारली. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघेही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. आर्चरने धवनला ५ धावांवर तर पृथ्वी शॉला १९ धावांवर माघारी धाडले. सलामीवीर बाद झाल्यावर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर देखील ठराविक अंतराने बाद झाले. हेटमायर आणि मार्कस स्टॉयनीस या दोन परदेशी खेळाडूंनी दिल्लीच्या संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोठा वाटा उचलला. या दोघांच्या तडाखेबंद खेळीच्या बळावर दिल्लीने ८ बाद १८४ धावा कुटल्या आणि राजस्थानला मोठं आव्हान दिलं. राजस्थानकडून जोफ्रा आर्चारने ३ तर त्यागी, टाय आणि तेवातीयाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.


हद्द झाली! धोनीच्या मुलीला सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी